शिक्षण
नोकरी
जिल्हा
अधिकारी
करियर मार्गदर्शन
माझी बारावी झाली आहे. जिल्हाधिकारी होण्यासाठी काय करावे लागणार?
3 उत्तरे
3
answers
माझी बारावी झाली आहे. जिल्हाधिकारी होण्यासाठी काय करावे लागणार?
17
Answer link
🔵 कला शाखा घ्या आणि कलेक्टर व्हा! 🔵
. कलेक्टर होण्यासाठी जी केंद्रीय लोकसेवा आयेागाची upscची परीक्षा द्यावी लागते तिला बसण्यासाठी फक्त 35टक्के गुण लागतात. शिवाय, यावर्षी तर ज्या मुलाला 25 टक्के गुण मिळतील तो देखील IASची पूर्व परीक्षा पास झालाच म्हणून समजा. मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी, बी.सी.ए., बी.बी.ए.ला जाऊन लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा सरळ कला शाखेत प्रवेश घ्या व कलेक्टर म्हणजे IAS व्हा._*
*_विश्वास नांगरे-पाटील या सुप्रसिद्ध IASअधिकार्यांचे नाव आपण ऐकलेच असेल. बारावीला 92 टक्के गुण मिळाल्यानंतरही (मेडिकल व इंजिनिअरिंगला प्रवेश मिळत असतानाही) त्यांनी कला शाखेत प्रवेश घेतला व IAS म्हणजे कलेक्टरचा गड जिंकला. आज महाराष्ट्रातील कोणत्याही डॉक्टर आणि इंजिनिअरपेक्षा विश्वास नांगरे-पाटील यांचा नाव लौकिक जास्त आहे._*
*_कला शाखेचे फायदे_*
कला शाखा ही वैद्यकीय अभियांत्रिकी शाखेसारखी खर्चिक नाही. शिवाय अभ्यासाचे तास, शिकवण्या, प्रात्यक्षिके, इंग्रजी यासारखे तगादे कला शाखेत नाहीत. शिवाय, कला शाखेतील इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, समाजशास्त्र या विषयांचा अभ्यास केला तर तो IAS च्या कामात येतो. कारण हेच विषय खअड ला आहेत. अगदी अभियांत्रिकी व वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी IAS करतात तर ते हेच विषय घेतात. कला शाखेत प्रवेश घेतल्याचा हा एक फायदा आहे.
*वेळेची बचत*
अभियांत्रिकी, वैद्यकीय, विज्ञान, कृषि व संगणकशास्त्र या विषयांत पदवी करू इच्छिणार्या विद्यार्थ्यांची दिवसभर धावपळ सुरू असते. सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत प्रॅक्टिकल्स, थेअरी असतात. त्यामुळे त्यांना पदवी परीक्षा व IAS ही समीकरणं समांतर चालविता येत नाहीत.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,या पदवी परीक्षेच्या अभ्यासाबरोबर IAS चा अभ्यास करता येत नाही. याउलट कला शाखेचे कॉलेज हे 3-4 तासांत आटोपते. कला शाखेतील विद्यार्थी उर्वरित वेळ हा IAS साठी उपयोगात आणू शकतात. मुबलक वेळ असल्यामुळे ते इतर कार्यक्रमात (वादविवाद, व्याख्याने, चर्चासत्रे, वृत्तपत्र व नियतकालिकांचे वाचन) सहज भाग घेऊ शकतात. यामुळे या फावल्या वेळाचा उपयोग ते UPSCसाठी करू शकतात. शिवाय, त्यांना कला शाखेत जे विषय शिकविले जातात तेदेखील UPSC
च्या अभ्यासक्रमाशी निगडित असतात.
*इंग्रजीची भीती-*
कला शाखा सोडली तर इतर सर्व शाखांसाठी माध्यम म्हणून इंग्रजी माध्यम घ्यावं लागतं. कला शाखेत मात्र मराठी, हिंदी माध्यम घेता येतं. ज्या मुलांनी मराठी किंवा हिंदी माध्यमातून IASची म्हणजे कलेक्टरची परीक्षा देण्याचे ठरविले आहे त्यांनी जर कला शाखेतून मराठी किंवा हिंदी माध्यमातून परीक्षा दिली तर ते त्यांच्या फायद्याचे आहे. साधारणपणे मुलाच्या मनात इंग्रजीविषयी भीती असते, पण कला शाखेत प्रवेश घेतल्यामुळे इंग्रजीची भीती राहत नाही व कला शाखेची पदवी घेताना आपली मराठी पक्की होती.
*IAS ची मुलाखत*
कलेक्टर होण्यासाठी UPSCची जी परीक्षा होते त्यात शेवटचा टप्पा म्हणजे मुलाखत. ही मुलाखत मराठीत तसेच कोणत्याही भारतीय भाषांमध्ये देता येते. कला शाखेत प्रवेश घेतल्यामुळे व वेळ भरपूर प्राप्त होत असल्यामुळे मुलाखतीचा सराव हा चांगला रितीने करता येतो. शिक्षणही मराठी भाषेतून, परीक्षादेखील मराठी भाषेतून व मुलाखतदेखील मराठी भाषेतून असा त्रिवेणी संगम साधला गेला तर IAS पास होणे कठीण नाही.
*IAS ही व्यक्तिमत्त्वाची परीक्षा-*
कलेक्टरसाठी जी खअड ची परीक्षा आहे ती खरं तर व्यक्तिमत्त्वाची परीक्षा आहे. यात जास्त गुण मिळणार नाही. कारण या परीक्षेत तुमचं व्यक्तिमत्त्व तपासण्यात येतं. अनेकदा तर 50-51 टक्के गुण प्राप्त करणारा विद्यार्थी हा IAS टॉपर येतो. कला शाखेत प्रवेश घेतल्यामुळे कला शाखेत वेळ मिळाल्यामुळे अवांतर वाचनाला, आपले छंद वृद्धिंगत करण्यासाठी आपणास वेळ देता येतो. इतर शाखांचा व्याप इतका प्रचंड असतो की त्यात छंदाला तर दूर अति महत्त्वाच्या कामालाही वेळ काढणे कठीण असते. कला शाखेत प्रवेश घेतल्यामुळे IAS चा मार्ग सुकर होतो. कला शाखा विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व, तत्पर, तेजस्वी व तपस्वी करण्यास मदतच करते.
*ताणतणाव निर्मूलने-*
वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थी व पालक नेहमी ताणतणावात दिसून येतात. तो ताणतणाव अभ्यासाचा तर असतोच, पण आर्थिक बाबींचाही असतो, पण कला शाखेतील विद्यार्थ्यांमध्ये असा ताणतणाव दिसत नाही. उलट या कला शाखेतील विद्यार्थी हास्यवदनाने अभ्यासाला व अभ्यासेतर कार्यक्रमाला सामोरे जातात.
-प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे
____________________________

7
Answer link
दहावी बारावी नंतर UPSC- MPSC चा अभ्यास/ क्लास करावा का?--- माझ्या दृष्टीने भीती वाटावा असा प्रश्न आहे. महाराष्ट्रात आज हजारो विद्यार्थी दहावी बारावी नंतरच UPSC- MPSC चे क्लासेस लावतात. (विचार करण्यासारखी बाब – हा ट्रेंड महाराष्ट्र सोडून इतरत्र फारसा नाही,स्पर्धा परीक्षांची तयारी बरेच जण करत असतात आणि दिवसेंदिवस ही परीक्षा देणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. असे असले तरी परीक्षा देणारे सगळेच पास होत नाहीत. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी केवळ इच्छाशक्ती आणि ध्येय असून चालत नाही तर सुयोग्य दृष्टीकोन म्हणजेच Approach आणि डोळसपणे केलेली तयारी अत्यंत गरजेची असते. अभ्यास चालू करताना जर काही मुद्द्यांचा आपण विशेष विचार केला तर सुरुवातीलाच होणाऱ्या काही चुका टाळता येतील. यूपीएससी परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांने सर्वप्रथम या परीक्षेचे स्पर्धात्मक स्वरूप सविस्तरपणे जाणून घेणे आवश्यक आहे. या परीक्षेत पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत (अर्थात व्यक्तिमत्त्व चाचणी) अशा तीन वेगळ्या टप्प्यांचा समावेश असतो. यातील पूर्वपरीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची, बहुपर्यायी प्रश्नांवर आधारित आणि नकारात्मक गुणपद्धत असलेली आहे.
पूर्वपरीक्षेचा हा प्राथमिक टप्पा ‘पात्रता चाचणी’ स्वरूपाचा आहे. म्हणजेच या परीक्षेत प्राप्त होणारे गुण या टप्प्यापुरतेच ग्राह्य़ धरले जातात. यात पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा परीक्षेचा पुढील प्रवास सुरू होतो. वस्तुनिष्ठ व नकारात्मक गुणपद्धतीमुळे विद्यार्थ्यांनी नेमकेपणाने आणि अचूक अभ्यास करणे अत्यावश्यक आहे. मूलभूत संकल्पना समजून घेणे, आवश्यक माहितीचे पुन:पुन्हा वाचन करणे, अभ्यास पक्का करणे, स्मरणशक्तीचा विकास करणे, प्रश्नाखालील चुकीचे पर्याय वगळून योग्य पर्यायाकडे जाण्याचे कौशल्य या आधारेच यूपीएससीच्या पूर्वपरीक्षेत यश संपादन करणे शक्य होते. थोडक्यात, पूर्वपरीक्षेचे स्वरूप लक्षात न घेता सुरू केलेला अभ्यास पुरेसा ठरणार नाही, हे लक्षात घेऊन आपल्या अभ्यासाचे धोरण निश्चित करावे.
मुख्य परीक्षा लेखी स्वरूपाची असते. हे लक्षात घेत अभ्यासात आवश्यक ते बदल करणे निकडीचे ठरते. व्यक्तिमत्त्व चाचणीच्या बाबतीतही हेच म्हणता येईल. उमेदवाराने आयोगाकडे पाठवलेली व्यक्तिगत माहिती, वैकल्पिक विषय, चालू घडामोडी आणि नागरी सेवेविषयी काही मूलभूत प्रश्न या अनुषंगाने मुलाखतीत प्रश्न विचारले जातात. मुलाखत ही संवादाच्या स्वरूपातील तोंडी परीक्षा असल्यामुळे सदस्यांनी विचारलेले प्रश्न व्यवस्थितपणे ऐकून समजून घेणे, त्याविषयी आपले मत योग्य रीतीने मुलाखत मंडळासमोर मांडणे, आपल्या आवाजाचा पोत व पातळी योग्य राखणे, औपचारिक भाषेचा वापर करणे, देहबोली आत्मविश्वासपूर्वक असणे, तसेच संभाषणात आवश्यक ती औपचारिकता राखणे या सर्वाचे भान ठेवणे गरजेचे आहे. मुलाखतीच्या स्वरूपानुसारच आपल्या तयारीला दिशा द्यावी लागते. म्हणजेच प्रत्येक टप्प्याचे वेगळेपण लक्षात घेऊन त्या प्रकारची अभ्यासपद्धतीचा अवलंब करावा लागतो.
अभ्यासक्रम समजून घ्या..
केंद्र लोकसेवा आयोगाने या दोन्ही टप्प्यांतील विषयांचा अभ्यासक्रम रीतसर नमूद केला आहे. या अभ्यासक्रमाचे बारकाईने वाचन करा आणि तो समजून घ्या. पूर्वपरीक्षेत ‘सामान्य अध्ययन’ आणि ‘नागरी सेवा कलचाचणी’ हे दोन विषय तर मुख्य परीक्षेत निबंध, सामान्य अध्ययन (चार पेपर), वैकल्पिक विषय आणि अनिवार्य इंग्रजी तसेच भारतीय भाषा या विषयांचा समावेश आहे. अभ्यासाच्या आकलनाद्वारे एखाद्या ‘विषयाची व्याप्ती’ किती आहे याचा अंदाज मांडणे शक्य होते. ‘अभ्यास व वेळेचे नियोजन’ करताना प्रत्येक विषयाच्या अभ्यासाचे आकलन पायाभूत ठरते. मुलाखतीसाठी औपचारिकपणे अभ्यासक्रम निर्धारित केलेला नसला तर वर उल्लेख केलेल्या घटकांची तयारी करणे महत्त्वाचे आहे.
प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करा.
परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यात जे विषय समाविष्ट केले आहेत, त्यावरील गेल्या पाच-सहा वर्षांतील आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करणे अत्यंत उपयुक्त ठरते. पूर्वपरीक्षेतील सामान्य अध्ययन आणि नागरी सेवा कलचाचणी या विषयांच्या किमान २०११ पासूनच्या प्रश्नपत्रिका पाहाव्यात. मुख्य परीक्षेच्या बाबतीत जरी २०१३ पासून नवी परीक्षा योजना स्वीकारली तरी सामान्य अध्ययन, वैकल्पिक विषय आणि निबंधाच्या जुन्या पद्धतीतील प्रश्नपत्रिका अभ्यासासाठी उपयुक्त ठरतात.
प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण म्हणजे प्रत्येक वर्षांची संबंधित विषयावरील प्रश्नपत्रिका बारकाईने वाचणे; प्रत्येक प्रश्न कोणत्या प्रकरणावर अथवा अभ्यास घटकावर आधारित आहे हे पाहणे; त्या प्रश्नाचे स्वरूप संकल्पनात्मक, माहितीप्रधान अथवा विश्लेषणात्मक आहे हे लक्षात घेणे; प्रश्नात चालू घडामोडींचे विविध दृष्टिकोनांविषयी अथवा संबंधित घटकाच्या भवितव्याविषयी काही विचारले आहे का हे जाणून घेणे होय. त्याखेरीज प्रश्न वर्णनात्मक, चर्चात्मक, स्पष्टीकरणात्मक, चिकित्सक, मूल्यमापनात्मक की उपाययोजनात्मक आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे. अशा रीतीने चार-पाच वर्षांच्या प्रश्नपत्रिका बारकाईने अभ्यासल्यास त्या त्या विषयाच्या ‘अभ्यासाची व्याप्ती’ ठरवणे जसे शक्य होईल तसेच अभ्यास ‘परीक्षाभिमुख’ करणे सोपे जाईल. प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणातून जे बारकावे लक्षात येतील त्याचा समावेश अभ्यासात सुरुवातीपासून करता येईल.
संदर्भपुस्तकांची यादी बनवा.
या तीन घटकांच्या तयारीसोबतच परीक्षेसाठी आवश्यक संदर्भ पुस्तकांची यादी बनवणे क्रमप्राप्त ठरते. परीक्षेचा अभ्यासक्रम आणि त्यावर विचारले जाणारे प्रश्न लक्षात घेऊनच संदर्भाची यादी निश्चित करावी. त्या दृष्टीने विचार केल्यास ‘एनसीईआरटी’ची इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, राज्यघटना, विज्ञान-तंत्रज्ञान, समाजरचना आणि आंतरराष्ट्रीय राजकारण या विषयांवरील क्रमिक पुस्तके हा प्राथमिक संदर्भ ठरतो. त्यानंतर प्रत्येक विषयासाठी किमान एक प्रमाणित संदर्भपुस्तक वाचणे महत्त्वाचे ठरते. काही वेळा दुसरा एखादा संदर्भग्रंथ वाचायचा असल्यास त्याचीही तयारी ठेवावी.
यूपीएससीची तयारी करताना मराठी वर्तमानपत्रासोबतच इंग्रजीतील एक वर्तमानपत्र, काही नियतकालिके आणि भारत वार्षकिी या संदर्भसाहित्याचे वाचन करणे अत्यावश्यक आहे. अशा रीतीने ‘एनसीईआरटी’द्वारा विषयाचा संकल्पनात्मक पाया, प्रमाणित संदर्भग्रंथ याद्वारे संबंधित विषय सविस्तर समजून घेणे आणि वर्तमानपत्र, नियतकालिके यांच्या सहाय्याने चालू घडामोडींविषयक दृष्टिकोन पक्काकरणे सोपे जाते.
संदर्भसाहित्याविषयी नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवणे अत्यावश्यक ठरते, ती म्हणजे असंख्य पुस्तके वाचण्यापेक्षा त्या त्या विषयांची मूलभूत एखाद-दुसरे संदर्भपुस्तक पुन:पुन्हा वाचून तो पक्का करण्यावर भर द्यावा. त्यामुळे प्रारंभीच कोणती संदर्भपुस्तके वाचायची आहेत हे विचारपूर्वक ठरवणे महत्त्वाचे आहे.
अभ्यासाचे नियोजन
प्राथमिक तयारीतील अखेरचा मात्र तितकाच महत्त्वाचा टप्पा म्हणजे अभ्यास व वेळेचे नियोजन होय. यूपीएससी परीक्षेचे स्वरूप, विविध टप्पे, त्यातील विषय, अभ्यासक्रम, त्यासंबंधित विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे विश्लेषण आणि संदर्भपुस्तके हे घटक समजून घेत अभ्यासाचे ‘नियोजन’ करणे आवश्यक आहे.

0
Answer link
तुम्ही बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी (Collector) होण्यासाठी तुम्हाला खालील गोष्टी कराव्या लागतील:
- पदवी शिक्षण (Graduation): कोणत्याही शाखेतील पदवी तुम्हाला असणे आवश्यक आहे. त्यामुळे, तुम्ही Arts, Science, Commerce किंवा इतर कोणत्याही शाखेतील पदवी पूर्ण करा.
-
यूपीएससी परीक्षा (UPSC Exam): जिल्हाधिकारी होण्यासाठी तुम्हाला केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (Union Public Service Commission - UPSC) परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.
- पूर्व परीक्षा (Preliminary Exam): ह्या परीक्षेत दोन पेपर्स असतात - General Studies Paper I आणि General Studies Paper II (CSAT).
- मुख्य परीक्षा (Main Exam): पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला मुख्य परीक्षा द्यावी लागते. यात एकूण नऊ पेपर्स असतात, ज्यात निबंध, सामान्य अध्ययन (General Studies) आणि वैकल्पिक विषय (Optional Subjects) यांचा समावेश असतो.
- मुलाखत (Interview): मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर मुलाखतीसाठी बोलावले जाते.
-
परीक्षेची तयारी: यूपीएससी परीक्षा अत्यंत स्पर्धात्मक असते, त्यामुळे योग्य मार्गदर्शन आणि तयारी करणे आवश्यक आहे.
- अभ्यासक्रम (Syllabus): यूपीएससीच्या अभ्यासक्रमाची माहिती असणे आवश्यक आहे. UPSC Syllabus
- वेळापत्रक (Time Table): अभ्यासासाठी नियमित वेळापत्रक तयार करा आणि त्याचे पालन करा.
- संदर्भ साहित्य (Reference Material): योग्य पुस्तके आणि अभ्यास साहित्य वापरा.
- माजी प्रश्नपत्रिका (Previous Year Question Papers): मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवा.
- प्रशिक्षण (Training): यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी (Lal Bahadur Shastri National Academy of Administration - LBSNAA) मध्ये प्रशिक्षण दिले जाते.
जिल्हाधिकारी होण्यासाठी कठोर পরিশ্রম, समर्पण आणि योग्य दिशेने प्रयत्न करणे आवश्यक आहे.