वाहने खरेदी कृषी शेती उपकरणे

जुन्या ट्रॅक्टरचा शोरूम कोठे भरतो?

2 उत्तरे
2 answers

जुन्या ट्रॅक्टरचा शोरूम कोठे भरतो?

5
तसं पाहिलं तर जुन्या ट्रॅक्टरचा लिलाव निमशहरी आणि ग्रामीण भागातील अॉटो फायनान्स कंपन्या किंवा ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी कर्जपुरवठा करणारी पतसंस्था किंवा बॅ॑क (यांच्याकडील कर्जाची परतफेड न केलेली ट्रॅक्टर) यांच्याकडून जाहिरात प्रसिद्ध करुन लिलाव करण्यात येतो. अशा वेळी आपण आपल्या पसंतीचा ट्रॅक्टर खरेदी करु शकता तसेच olx सारख्या साईटवर देखील विक्रीसाठी उपलब्ध असलेले ट्रॅक्टर खरेदी करु शकता.
ग्रामीण भागात साखर कारखान्यांवरील ऊस वाहतूकदार देखील ठराविक कालावधीनंतर जुना ट्रॅक्टर विकून साधारणतः दिवाळीच्या कालावधीत नवीन ट्रॅक्टर खरेदी करतात अशावेळी त्या गावातील काही लोकांना विश्वासात घेऊन त्या ट्रॅक्टरची (इंजिन विषयी) माहिती मिळवू शकता.
ट्रॅक्टरकडून खात्रीशीर उत्पन्न मिळणार असल्यास नवीन ट्रॅक्टर खरेदी करणे हे नेहमी फायदेशीर ठरते कारण जुन्या ट्रॅक्टरचा देखभालीचा खर्च जास्त असतो शिवाय त्यामुळे कामाचा घोटाळा होऊन होणारे आर्थिक नुकसान आणि मनस्ताप वेगळाच...
धन्यवाद...
उत्तर लिहिले · 9/6/2018
कर्म · 1420
0

भारतामध्ये जुन्या ट्रॅक्टरचे शोरूम तुम्हाला अनेक ठिकाणी मिळतील. काही प्रमुख ठिकाणे खालीलप्रमाणे:

  • पंजाब: पंजाबमध्ये जुन्या ट्रॅक्टरची बाजारपेठ खूप मोठी आहे. येथे तुम्हाला अनेक शोरूम आणि डीलर्स मिळतील.
  • हरियाणा: हरियाणा हे देखील ट्रॅक्टरसाठी मोठे बाजारपेठ आहे. येथे जुन्या ट्रॅक्टरची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होते.
  • उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशातही तुम्हाला जुन्या ट्रॅक्टरचे शोरूम मिळतील. खासकरून पश्चिम उत्तर प्रदेशात याची उपलब्धता अधिक आहे.
  • महाराष्ट्र: महाराष्ट्रात देखील काही ठिकाणी जुन्या ट्रॅक्टरचे शोरूम आहेत, जिथे तुम्हाला चांगले ट्रॅक्टर मिळू शकतात.

तुम्ही OLX किंवा IndiaMART सारख्या वेबसाईटवर देखील जुने ट्रॅक्टर शोधू शकता.

जवळपासचे शोरूम शोधण्यासाठी, गुगल मॅप्स (Google Maps) चा वापर करणे फायदेशीर ठरू शकते.

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 1740

Related Questions

नालगुड म्हणजे काय?
न्यू हॉलंड ट्रॅक्टर चांगला आहे का?
मला नवीन ट्रॅक्टर घ्यायचा आहे, कोणत्या कंपनीचा बेस्ट राहील कृपया सुचवा?
मला मिनी ट्रॅक्टरच्या किमती व सबसिडी याबद्दल माहिती द्यावी?
कांदा गोणी शिवण्यासाठी लागणारा कच्चा माल (बारदाना बंडल) कुठे मिळेल? लवकर कळवा, मोबाईल नंबर असल्यास द्या.
ट्रॅक्टर टायरमध्ये पाणी भरावे का?
माझ्या मित्राला शेतीच्या कामासाठी छोटा ट्रॅक्टर (24Hp) विकत घ्यायचा आहे, तर तो कोणता घ्यावा?