संबंध विवाह कुटुंब मानसशास्त्र भावना मानसिक स्वास्थ्य

माझं लग्न झाले पण मला कोणाविषयी प्रेम, आपुलकी वाटत नाही, अगदी माझ्या आईवडिलांबद्दल पण नाही, असे का?

3 उत्तरे
3 answers

माझं लग्न झाले पण मला कोणाविषयी प्रेम, आपुलकी वाटत नाही, अगदी माझ्या आईवडिलांबद्दल पण नाही, असे का?

28
(लग्न होणे व दुसऱ्याविषयी प्रेम, आपुलकी आईवडिलांबाबतही वाटू नये याचा काही परस्पर संबंध आहे असे मला वाटत नाही.लग्न.होण्याआधीदेखील हाच प्राँब्लेम होता का?).तुमच्या आयुष्यात असं काही घडलय का की जेव्हा तुम्हाला कोणाच्या तरीही प्रेमाच्या आधाराची गरज होती व त्यावेळी तुम्हाला कोणाकडूनही असं प्रेम मिळाले नाही, अगदी तुमच्या आईवडिलांकडूनही?तुम्ही प्रेमाला पारखे होऊनही तुम्हाला कोणी समजून घेतले नाही?आणी हे तुम्ही पुष्कळ काळ अनुभवले आहे?तसं झाल असेल तर तुमच्या मनातही कोणाविषयीही अगदी तुमच्या आईवडिलांबद्दलही प्रेमाची भावना उरली नसेल.एकप्रकारे प्रेमाबद्द्ल तुमच्या मनात तिटकारा निर्माण झाला असेल.आपुलकीची भावना नष्ट झाली असेल.तसे झाले असेल तरी कोणाविषयीही तिटकारा मात्र मनात निर्माण होता कामा नये.कारण तिटकाऱ्यामुळे मनात शत्रुत्वाची भावना निर्माण होते.शत्रुत्वाच्या भावनेतून अहं निर्माण होतो व हा अहं नात्यागोत्यांची राखरांगोळी करतो.अशा गोष्टी तुमच्या आयुष्यात घडल्या असतील तर व त्या सहनशिलतेच्या पलीकडे जात असतील तर त्या मनात दाबून ठेऊ नका.कारण अशाने तुम्हालाच मानसिक ताण निर्माण होऊन तुमचे मानसिक तसेच शारिरीक स्वास्थ्यही बिघडू शकते.तुमच्या मनातील भावना कोणापाशीतरी उघड करा.दाबून ठेवलेल्या भावना ज्वालागिरीसारख्या असतात.तुम्ही मानसोपचार तज्ञाची मदत घेऊ शकता.मी मांडलेल्या माझ्या या मतात काही चूक झिली असेल तर क्षमस्व.
उत्तर लिहिले · 31/5/2018
कर्म · 91065
16
         आपल्या जिवनात तुमच्या मनाविरुध्द घटना घडलेली दिसुन येते. त्यामुळे तुमच्यामध्ये नैराश्यातुन उदासिनता निर्माण झाली आहे. त्यामुळे आपण झालेली घटना विसरण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी वाचन,काॅमेडी फिल्म पहाणे,निसर्गरम्य ठिकाणाला भेट देणं,यासारख्या गाेष्टिमध्ये आपले मन रमवा. त्याचबरोबर रोज   सकाळी मेडीटेशन करणे, सकाळी शुध्द हवेत वाकिंग करा.
          आपल्या सर्व काैटुंबिक जबाबदा-या पार पाडा. त्यामुळे तुम्हाला समाधान मिळेल. आपल्या जोडीदारावर व कुटुंबावर विश्वास ठेवा. त्यांचे दुःख समजुन घेण्याचा प्रयत्न करा. आपोअप आपल्यामध्ये त्यांच्याविषयी प्रेम निर्माण होईल.
उत्तर लिहिले · 2/6/2018
कर्म · 1975
0
तुमच्या भावनांबद्दल मला कल्पना आहे आणि मला हे समजते की तुमच्यासाठी हा कठीण काळ आहे. असं होण्याचे काही संभाव्य कारणं आणि त्यावर विचार करण्यासाठी काही गोष्टी खालीलप्रमाणे:

1. भावनिक बधिरता (Emotional Numbness): काहीवेळा, ताण, चिंता किंवा आघात (Trauma) यामुळे भावनांवर परिणाम होतो आणि त्यामुळे भावनिक बधिरता येऊ शकते. अशा स्थितीत, व्यक्तीला कोणाबद्दलही प्रेम किंवा आपुलकी वाटत नाही.

2. नैराश्य (Depression): नैराश्यामुळे आनंद आणिconnection च्या भावना कमी होऊ शकतात. नैराश्यात, व्यक्तीला कुटुंबासह कोणाबद्दलही प्रेम वाटत नाही.

3. नातेसंबंधातील समस्या: तुमच्या वैवाहिक जीवनात काही समस्या असल्यास किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी संबंध ताणपूर्ण असल्यास, तुम्हाला त्यांच्याबद्दल प्रेम आणि आपुलकी वाटणं कमी होऊ शकतं.

4. व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्ये (Personality Traits): काही लोकांची emotional attachment style च अशी असते की त्यांना इतरांशी connect व्हायला वेळ लागतो.

5. भूतकाळातील अनुभव: बालपणीचे किंवा भूतकाळातील नकारात्मक अनुभव तुमच्या भावनिक जगात परिणाम करू शकतात.

उपाय काय करता येतील:

  • मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला: मानसोपचार तज्ज्ञ तुम्हाला तुमच्या भावनांचं विश्लेषण करायला आणि त्यांवर तोडगा काढायला मदत करू शकतात. ते तुम्हाला समुपदेशन (counseling) आणि आवश्यक उपचार देऊ शकतात.
  • स्वतःसाठी वेळ: स्वतःला वेळ द्या आणि आत्म-चिंतन करा. तुम्हाला काय आवडतं आणि कशामुळे आनंद मिळतो, यावर लक्ष केंद्रित करा.
  • छंद जोपासा: तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींमध्ये स्वतःला व्यस्त ठेवा, जसे की संगीत, चित्रकला, वाचन किंवा खेळ.
  • नियमित व्यायाम: शारीरिक हालचाल केल्याने तणाव कमी होतो आणि मनःस्थिती सुधारते.
  • ध्यान आणि श्वासोच्छ्वास व्यायाम: ‘मेडिटेशन’ आणि ‘breathing exercises’ केल्याने मानसिक शांती मिळते.

हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की प्रत्येक व्यक्तीची परिस्थिती वेगळी असते, त्यामुळे तुमच्यासाठी सर्वोत्तम उपाय शोधण्यासाठी व्यावसायिक मदत घेणे आवश्यक आहे.

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 980

Related Questions

भावनाशून्य माणसे असू शकतात का?
खरा आनंद म्हणजे काय? तुम्हाला कोणत्या गोष्टीमुळे आनंद मिळतो?
स्वतःच्या भावना समजून घ्यायला इतकं कठीण का वाटतं?
पराजय कोणाचा होतो खरा की खोट्याचा?
म्हातारीच्या तोंडावर समाधान पसरायचं कारण काय?
लेखकाला आनंद झाला कारण?
आत्म्याची साद असते, तो संवाद नसेल तर तो गोंगाटच. हे विधान तुमच्या शब्दांत १० ते १२ ओळीत स्पष्ट करा.