भूगोल नदी नद्या

जगातील सर्वात मोठी नदी कोणती?

2 उत्तरे
2 answers

जगातील सर्वात मोठी नदी कोणती?

8
नाईल
नाईल ही आफ्रिका खंडातील प्रमुख नदी आहे. ६,६५० किलोमीटर (४,१३० मैल) इतकी लांबी असलेल्या नाईलला जगातील सर्वात लांब नदी मानण्यात येते. [१] पांढरी नाईल व निळी नाईल ह्या दोन नाईलच्या प्रमुख उपनद्या आहेत. पांढर्या नाईलचा उगम
व्हिक्टोरिया सरोवरामध्ये होतो तर निळ्या नाईलचा उगम इथियोपियामधील ताना सरोवरात होतो. सुदानमधील खार्टूम शहराजवळ ह्या दोन नद्यांचा संगम होतो व पुढील प्रवाहाला एकत्रितपणे नाईल नदी असे संबोधले जाते. साधारणपणे उत्तरेकडे वाटचाल करून नाईल नदी भूमध्य समुद्रामध्ये मिळते.
नाईलचे पाणलोट क्षेत्र सुमारे ३४ लाख वर्ग किमी एवढे असून ती इथियोपिया ,
इजिप्त , सुदान, युगांडा ,
काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक व
टांझानिया ह्या ६ देशांमधून वाहते. उत्तर आफ्रिकेतील सुदान व इजिप्त देशांमध्ये नाईल जवळजवळ पूर्णपणे वाळवंटामधून वाहते. ऐतिहासिक काळापासून इजिप्तमधील जीवन संपूर्णपणे नाईलवर अवलंबून आहे. इजिप्तमधील शहरे व गावे प्रामुख्याने नाईलच्या काठावरच वसलेली आहे व इजिप्तच्या संस्कृतीमध्ये नाईलला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
उत्तर लिहिले · 28/5/2018
कर्म · 805
0

जगातील सर्वात मोठी नदी ॲमेझॉन (Amazon) आहे.

ॲमेझॉन नदी दक्षिण अमेरिकेतून वाहते. ही नदी पाण्याच्या आकारमानानुसार जगातील सर्वात मोठी नदी आहे. ॲमेझॉन नदी सुमारे 6,992 किलोमीटर लांब आहे.

लांबीनुसार जगातील सर्वात मोठी नदी नाईल (Nile) आहे.

नाईल नदी आफ्रिकेतून वाहते आणि सुमारे 6,650 किलोमीटर लांब आहे.

ॲमेझॉन नदीच्या बेसिनमध्ये जगातील सर्वात मोठे जंगल आहे.


उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 1680

Related Questions

कोणती नदी संपूर्ण देशातून वाहते?
भारताची सर्वात लांब नदी कोणती?
अनेक जलप्रवाह एकत्र येऊन काय तयार होते?
संबळ नदीची उपनदी कोणती?
उताऱ्यात आलेल्या नदीचे नाव?
ॲमेझॉन नदी कोणत्या नदीला जाऊन मिळते?
हिमालयातून वाहणाऱ्या नद्या?