औषधे आणि आरोग्य विषाणू आरोग्य

निपाह वायरस म्हणजे काय? लक्षणे काय व दक्षता कशी घ्यायची?

5 उत्तरे
5 answers

निपाह वायरस म्हणजे काय? लक्षणे काय व दक्षता कशी घ्यायची?

8
निपाह व्हायरस काय आहे? जाणून घ्या

'निपाह' या व्हायरसमुळे सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या अज्ञात इन्फेक्शनमुळे ११ जणांचा मृत्यू झाला आहे. WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संस्थेने निपाह व्हायरसमुळे हाय अलर्ट घोषित केला आहे.

👉निपाह व्हायरस काय आहे?

🔹या व्हायरसची निर्मिती अत्यंत सहज होते.

🔹प्राणी आणि माणसांमध्ये हा गंभीर आजार जन्म घेतो.

🔹हा व्हायरस वटवागुळात असतो.

🔹१९९८ मध्ये मलेशियाच्या कम्पंग सुंगाई निपाहमधून या व्हायरसचा शोध लागला होता. तेच नाव या व्हायरसला देण्यात आले.

🔹२००४ मध्ये बांग्लादेशातून काही लोकांना या व्हायरसची लागण झाली.

🔹सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अंड प्रिव्हेंशन (CDC)नुसार, निपाह व्हायरसचे इंफेक्शन एंसेफ्लाइटिसशी संबंधित आहे. त्यामुळे मेंदूचे नुकसान होते.

👉काय आहेत लक्षणं?
🔹३ ते १४ दिवसांपर्यंत ताप आणि डोकेदुखी.

🔹२४-४८ तासांत व्यक्ती कोमात जाते.

🔹इंफेक्शनच्या सुरुवातीच्या काळात श्वास घेण्यासही त्रास होतो.

🔹न्यूरोलॉजिकल समस्या निर्माण होते.

👉काय काळजी घ्याल?
🔹झाडावरुन पडलेली आणि खूप पिकलेली फळे खावू नका.

🔹या व्हायरसने पिडीत व्यक्तींच्या जवळ जावू नका.

🔹खूप ताप येत असल्यास डॉक्टरांची भेट घ्या.
उत्तर लिहिले · 25/5/2018
कर्म · 5605
5
दक्षिण भारतात निपाह या व्हायरसने संपूर्ण देशात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. केरळच्या कोझिकोड जिल्ह्यात पसरलेल्या निपाह व्हायरसच्या संसर्गाने आत्तापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जणांवर उपचार सुरु आहेत. चिंतेची बाब म्हणजे, या विषाणूवर कोणताही उपचार होत नाही. विषाणूची लागण होऊ नये यासाठी खजूर खाणे टाळले पाहिजे, त्याबरोबरच जमिनीवर पडलेली फळे खाणे टाळावे,
  जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, निपाह व्हायरस (NiV) वेगाने पसरतो, जो मनुष्य आणि प्राण्यांमध्ये गंभीर आजाराला जन्म देतो. NiV च्या बाबतीत सर्वात अगोदर 1998 साली मलेशियातील कम्पंग सुगाई निपाह येथून माहिती मिळाली होती. तेव्हापासूनच या व्हायरसला हे नाव देण्यात आले. त्यावेळी डुकरांपासून हा आजार पसरला जात होता.

मात्र नंतर ज्या ज्या ठिकाणी हा व्हायरस आढळून आला, तिथे हा व्हायरस पसरण्यामागचे कोणतेही नेमके कारण आढळून आले नाही. बांगलादेशमध्येही  २००४ साली काही लोकांना या व्हायरसची लागण झाली होती. बांगलादेशमधील या लोकांनी खजूरच्या झाडापासून मिळणारा द्रव पदार्थ खाल्ल्याचे समोर आले होते.

दरम्यान, या व्हायरसचा संसर्ग एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला झाल्याची उदाहरणे भारतातही पाहायला मिळाली आहेत. NiV मुळे श्वसन प्रक्रियेसंबंधी गंभीर आजार होतो.

मनुष्य किंवा प्राण्यांना या आजारापासून दूर ठेवण्यासाठी आतापर्यंत कोणतीही लस तयार झालेली नाही.

आजाराची लक्षणे काय?
या आजाराची लक्षणे रुग्णाला २४ ते ४८ तासामध्ये कोमात पोहोचवतात. आजाराची लागण झाल्यानंतर सुरुवातीला श्वास घेण्यासाठी त्रास होतो, तर काही रुग्णांना न्यूरोलॉजिकल समस्याही (मज्जासंस्थेसंबंधी) होते.

१९९८-९९ सालामध्ये हा आजार पसरला तेव्हा जवळपास २६५ जणांना या आजाराची लागण झाली होती, असे बोलले जाते. रुग्णालयांमध्ये दाखल झालेल्या जवळपास ४० टक्के रुग्णांना गंभीर आजार झाला होता, ज्यामुळे त्यांना वाचवता आले नाही.

सर्वसाधारणपणे वटवाघूळ, डुक्कर किंवा मनुष्यांद्वारे हा आजार पसरतो. मलेशिया आणि सिंगापूरमध्ये डुक्करांच्या माध्यमातून हा आजार पसरल्याचे समजले होते, तर भारत आणि बांगलादेशमध्ये मनुष्यांपासूनच या आजाराचा संसर्ग होण्याची भीती जास्त आहे.

काय काळजी घ्याल?
या आजारापासून दूर राहण्यासाठी खजूर, खजूरच्या झाडापासून मिळणारा द्रव पदार्थ आणि झाडाखाली पडलेली फळे खाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. शिवाय डुक्कर, आजारी घोडे किंवा इतर जनावरांपासून दूर राहणेही गरजेचे आहे.

उत्तर लिहिले · 25/5/2018
कर्म · 210095
0

निपाह वायरस (Nipah Virus) म्हणजे काय?

निपाह वायरस हा एक RNA वायरस आहे, जो पॅरामाइक्सोविरिडे कुटुंबातील हेनिपावायरस प्रजातीचा आहे. हा एक zoonotic वायरस आहे, म्हणजे तो प्राणी आणि मानव दोघांनाही संक्रमित करू शकतो.

निपाह वायरसची लक्षणे:

  • ताप
  • डोकेदुखी
  • घसा खवखवणे
  • श्वास घेण्यास त्रास होणे
  • मेंदूला सूज (encephalitis)
  • disorientation
  • confusion
  • seizures
  • loss of consciousness

निपाह वायरसची दक्षता:

  • डुकरांपासून दूर राहा.
  • आजारी व्यक्तींच्या संपर्कात येऊ नका.
  • फळे आणि भाज्या व्यवस्थित धुवून खा.
  • नियमितपणे आपले हात साबणाने धुवा.

अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

  1. जागतिक आरोग्य संघटना (WHO): Nipah virus infection
  2. रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्र (CDC): Nipah Virus
उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 1440

Related Questions

कोरोना व्हायरस कोणत्या घटकांपासून बनलेला आहे?
झिका विषाणू सर्वप्रथम 1947 साली कोठे आढळला?
हंता व्हायरस काय आहे?
व्हायरस म्हणजे काय?
कोरोना विषाणूचे नाव हे कोरोनाच का ठेवण्यात आले?
कोरोना वायरस बद्दल हे काय आहे?