कला अभिनेता अभिनय प्रकार

अभिनयाचे प्रकार कोणते?

2 उत्तरे
2 answers

अभिनयाचे प्रकार कोणते?

4
☞अभिनयाचे प्रकार☜
अभिनयाचे चार प्रमुख प्रकार सांगितले आहेत -
a.आंगिक
b.वाचिक
c.सात्विक
d.आहार्य
’अभिनय’’ च्या अंतर्गत गायन,वादन,नर्तन,मंच शिल्प,काव्य,आध्यात्म,दर्शन,योग,मनोविज्ञान,प्रकृति या सगळ्यांचा समावेश असणे गरजेचे आहे आणि तरच अभिनयाद्वारे इच्छित परिणाम साधला जातो वाचिक अभिनयाचे दोन प्रकार आढळतात
लोक्धार्मी
नाट्य धर्मी
याव्दारे अभिनयाचा कस लागतो लोक्धार्मी यात वास्तववादी भूमिका करावयाची असते कि ज्या मुळे भूमिका ही जिवंत वाटली पाहिजे आणि नाट्य धर्मी मध्ये नाटकाद्वारे अभिनय साधावयाचा असतो
---------------------------------------------------------------
अभिनय म्हणजे एखाद्या व्यक्तीचा झालेला कायाप्रवेश (अभिनय करताना अपन एखादी व्यक्तिरेखा सकरतो म्हणजे त्या व्यक्तीला आपल्या मद्धे आणतो) - दिलीप प्रभावळकर.
कलाकार हा दुप्पट आयुष्य जगतो एक स्वताचे आणि दुसरे तो ज्या व्यक्तिरेखा सकरतो त्यांचे.
---------------------------------------------------------------
अभिनय -
’अभिनय’’ च्या अंतर्गत गायन,वादन,नर्तन,मंच शिल्प,काव्य,आध्यात्म,दर्शन,योग,मनोविज्ञान,प्रकृति या सगळ्यांचा समावेश असणे गरजेचे आहे आणि तरच अभिनयाद्वारे इच्छित परिणाम साधला जातो वाचिक अभिनयाचे दोन प्रकार आढळतात
लोक्धार्मी
नाट्य धर्मी
याव्दारे अभिनयाचा कस लागतो लोक्धार्मी यात वास्तववादी भूमिका करावयाची असते कि ज्या मुळे भूमिका ही जिवंत वाटली पाहिजे आणि नाट्य धर्मी मध्ये नाटकाद्वारे अभिनय साधावयाचा असतो.
आंगिक अभिनय -
आंगिक अभिनय म्हणजेच शारीरिक हालचाली, चेहरा आणि हावभाव या माध्यमातून भावना रसिकांपर्यंत पोहोचवणे.
सात्विक अभिनय -
सात्विक अभिनय म्हणजे ज्यमद्धे स्वेद, स्तंभ, कंप, अश्रु, वैवर्ण्य, रोमांच, स्वरभंग आणि प्रलय याची गणना होते.
वाचिक अभिनय -
वाचा म्हणजे वाणी,बोलणे.शब्दोचारातुन भावना व्यक्त करने म्हणजे वाचिक अभिनय.
नाट्यवाचन,कथाकथन,आकाशवाणीवरून होणारी नाट्य ही वाचिक अभिनयाची उदाहरने आहेत.
शब्दाच्या नुसत्या उच्चारावरून पत्राची ओळख झाली पाहिजे,त्यावरून त्याचे वय,व्यवसाय व मानसिक अवस्था प्रगट व्हावी.
नाट्य संस्करामद्धे वाचिक अभिनयाच्या दृष्टीने दोन महत्वाच्या गोष्टी आहेत.
* आपन श्वास घेतो त्यावेळी हवा श्वासावाटे आत घेणे ती शरीरात साठवणे,त्यासाठी दिर्घ श्वास घेउन हळू हळू तो सोडणे.
* ओंकार यामद्धे ॐ हा शब्द उच्चारायचा जितका जास्त वेळ ओंकार टिकत असेल तितका चांगला.
यामुळे स्वर लांम्बवने,आवाजात चढ़ उतार करने सुलभ जाते.
जिभेचे व्यायाम - # जीभ जास्तीत जास्त बाहेर काढून नाकाच्या शेंडयाला लावण्याचा प्रयत्न करने.
# जीभ चक्राकार फिरवने.
# जीभ ओठांवरन फिरवने
# ल,ळ असलेले शब्द भरभर पण स्पष्टपणे म्हणणे.
आहार्य अभिनय
आहार्य अभिनय हे वास्तविक पाहायला गेले तर अभिनयाचे अंग नसून रंगभूषा आणि वेशभूषा यामधून प्रगट होते. उदा. - शंकराचा गेटअप.
उत्तर लिहिले · 14/5/2018
कर्म · 20065
0

अभिनयाचे मुख्य प्रकार खालीलप्रमाणे आहेत:

  1. नैसर्गिक अभिनय (Natural Acting):

    या प्रकारात, अभिनेता शक्य तितके नैसर्गिक वागण्याचा प्रयत्न करतो. त्याचे हावभाव, बोलणे आणि देहबोली (body language) वास्तविक जीवनातील व्यक्तींसारखी असते.

  2. शैलीकृत अभिनय (Stylized Acting):

    या प्रकारात, अभिनेता विशिष्ट शैलीचा वापर करतो, जी नाट्यमय किंवा अतिशयोक्तीपूर्ण असू शकते. हे सहसा नाटकांमध्ये किंवा विशिष्ट पात्रांच्या सादरीकरणासाठी वापरले जाते.

  3. वास्तववादी अभिनय (Realistic Acting):

    या प्रकारात, अभिनेता पात्राच्या भावना आणि प्रेरणांना समजून घेऊन ते जिवंत करतो. हे पात्र वास्तविक जीवनात कसे वागेल याचा विचार करून अभिनय केला जातो.

  4. नाट्यमय अभिनय (Dramatic Acting):

    या प्रकारात, अभिनेता तीव्र भावना आणि नाट्यमय परिस्थिती सादर करतो. यात आवाज, देहबोली आणि चेहऱ्यावरील हावभाव यांचा प्रभावी वापर केला जातो.

  5. कॉमिक अभिनय (Comic Acting):

    या प्रकारात, अभिनेता विनोदी आणि हास्यास्पद पद्धतीने अभिनय करतो. लोकांचे मनोरंजन करणे आणि त्यांना हसवणे हा याचा उद्देश असतो.

याव्यतिरिक्त, अभिनयाचे माध्यम (stage, film, television) आणि नाटकाच्या प्रकारानुसार (tragedy, comedy, drama) देखील अभिनयात फरक दिसून येतो.

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 1440

Related Questions

अभिनयाचे प्रकार काय?
चित्रपटांतील अभिनयाचे प्रकार कसे स्पष्ट कराल?
अभिनयाचे प्रकार स्पष्ट कसे कराल?
अभिनयाचेे प्रकार स्‍पष्‍ट करा?
अभिनयाचे प्रकार स्पष्ट स्पष्ट करा ?
अभिनयाचे प्रकार कोणते आहेत?
अभिनयाचे प्रकार स्पष्ट करा?