मोबाईल अँप्स फोन आणि सिम सुरक्षा तंत्रज्ञान

मोबाईलसाठी चांगला अँटी व्हायरस कोणता?

3 उत्तरे
3 answers

मोबाईलसाठी चांगला अँटी व्हायरस कोणता?

11
मुळात मोबाईल ला अँटी व्हायरस ची गरजच काय?
ते जे काही कार्य करते, ते ते तुम्ही ही करू शकता, तेही अगदी मेमरी, रॅम, बॅटरी न वापरता!

जवळ जवळ सर्वच अँटी व्हायरस हे बॅकग्राऊंड वर काम करतात, म्हणजे रॅम गेली, बॅटरी गेली, इन्स्टल केल्याने मेमरी ही गेली.

अँड्रॉइड सिस्टीम मध्ये व्हायरस वैगरे काही पसरू शकत नाही, जर तुम्ही काळजी घेतली तर. जे अँप इन्स्टॉल करू ते प्लेस्टोर वरून घ्यावे, शिवाय तिकडे ही डोळे मिटून इन्स्टल करू नये, बरेच अँप प्ले स्टोर वरून सिक्युरिटी कारणाने काढले जातात, ते काढायच्या आधी तुम्ही इन्स्टल कराल, असंही होऊ शकत, म्हणजे इन्स्टल करताना अँप चे डेव्हलपर, अँप घेणार असलेल्या परमिशन वर वैगरे लक्ष ठेवावे, आता च्या मोबाईल मध्ये अँप इन्स्टल झाल्यानंतर ही काही परमिशन देणे बंद करता येते (xiomi redmi मध्ये settings→permission) अश्या ऑप्शन मधून काही परमिशन देणे बंद करू शकता.

दुसर म्हणजे क्लीनिंग व बॅटरी ...
Caches क्लीन करायला तर मोबाईल मध्येच ऑप्शन असतो बाकी फालतू फोल्डर्स व फाईल्स वैगरे तुम्ही File maneger/Explorer मधून डिलिट करू शकता आणि बॅटरी तर तुम्ही जशी वापरता त्या वर आहे, म्हणजे व्हायब्रेशन मोड मध्ये जास्त मेमरी जाते तर तो कमी ठेवावा, रात्री गरज नसेल तर एरोप्लेन मोड ऑन ठेवावा, लाईव्ह वॉलपेपर्स व widgets टाळावेत. ब्राईटनेस/स्क्रिन टाइमआऊट कमी ठेवावे. सेटिंग→बॅटरी मध्ये जाऊन कोणे अँप बॅटरी वापरतात त्यांना त्यांचा वापर झाला की फोर्स स्टॉप वैगरे करावे, सेटिंग → अँप्स → रनिंग अँप्स मधून विनाकारण फालतू अँप चालू असतील तर बंद करावे android, Android System मात्र चालू राहणे गरजेचे असते.

मोबाईल हरवल्यावर शोधायचं वैगरे हे तर गुगल च find my device ऑप्शन सेटिंग मध्ये असतो, सेटिंग→सिक्युरिटी/गुगल मध्ये find my device ऑप्शन मिळेल, तिथे ते ऑन ठेवा, हरवलं तर android.com/find मधून शोधू किंवा लॉक करू शकता.
उत्तर लिहिले · 14/5/2018
कर्म · 85195
2
मोबाईलला कोणत्या अँटीव्हायरसची गरज नाही, तो स्वतः डेव्हलपर आहे. अँटीव्हायरस वापरणे मोबाईलसाठी धोक्याचे आहे.
उत्तर लिहिले · 14/5/2018
कर्म · 4295
0

मोबाईलसाठी चांगला अँटीव्हायरस निवडताना काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे:

  • सुरक्षा: अँटीव्हायरस मालवेअर, व्हायरस आणि इतर धोक्यांपासून संरक्षण देण्यास सक्षम असावा.
  • वैशिष्ट्ये: अँटीव्हायरसमध्ये अँटी-थेफ्ट, ॲप लॉकिंग, डेटा बॅकअप आणि सुरक्षित ब्राउझिंग यांसारखी अतिरिक्त वैशिष्ट्ये असावी.
  • किंमत: अँटीव्हायरस विनामूल्य किंवा सशुल्क असू शकतो. तुमच्या गरजेनुसार योग्य पर्याय निवडा.
  • रेटिंग आणि पुनरावलोकने: अँटीव्हायरस निवडण्यापूर्वी वापरकर्त्यांची रेटिंग आणि पुनरावलोकने तपासा.

काही लोकप्रिय अँटीव्हायरस:

  • नॉर्टन मोबाईल सिक्युरिटी (Norton Mobile Security): हे अँटीव्हायरस प्रभावी सुरक्षा आणि वैशिष्ट्ये प्रदान करते. अधिक माहितीसाठी
  • बिटडेफेंडर मोबाईल सिक्युरिटी (Bitdefender Mobile Security): हे अँटीव्हायरस कमी किमतीत चांगली सुरक्षा देते. अधिक माहितीसाठी
  • अवास्ट मोबाईल सिक्युरिटी (Avast Mobile Security): हे अँटीव्हायरस विनामूल्य आणि सशुल्क दोन्ही आवृत्त्यांमध्ये उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी
  • कॅस्परस्की मोबाईल अँटीव्हायरस (Kaspersky Mobile Antivirus): हे अँटीव्हायरस मालवेअरपासून उत्कृष्ट संरक्षण देते. अधिक माहितीसाठी

तुमच्या गरजेनुसार आणि बजेटनुसार योग्य अँटीव्हायरस निवडा.

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 1820

Related Questions

1bet ॲप वापरू शकतो का आपण?
विमानाची लांबी व रुंदी सांगा?
बी. फार्मसी साठी बेस्ट ॲप कोणते?
बजाज कंपनीच्या १८ वॅटच्या एलईडी बल्बची किंमत किती आहे?
इलेक्ट्रिक तारांवर लाईट लावताना वायरवर काजळी न येण्याकरिता काय करावे?
सी महासेतू कार्य प्रणाली काय आहे?
पाणबुडीमधून पाण्याच्या वरचा भाग बघण्यासाठी कोणत्या प्रकारची टेलिस्कोप वापरली जाते?