बातम्या
गुन्हेगारी
सायबर गुन्हेगारी
मी मागे ऐकले होते की कोणत्या तरी देशात मुलींचे नंबर विकले जातात, हे खरे आहे का?
2 उत्तरे
2
answers
मी मागे ऐकले होते की कोणत्या तरी देशात मुलींचे नंबर विकले जातात, हे खरे आहे का?
19
Answer link
*उत्तर प्रदेशात विकले जाताहेत मुलींचे मोबाईल नंबर.
उत्तर प्रदेशात रिचार्ज करायला गेलेल्या मुलींचे नंबर विकले जातात. टपोरी गुंड लोक हे नंबर विकत घेऊन त्यांना त्रास देतात.एखादी मुलगी नवीन मोबाइल नंबर विकत घेते किंवा मोबाइलमध्ये रिचार्ज टाकण्यासाठी रिचार्ज च्या दुकानात जाते. मुलगी बघून हे रिचार्जवाले महाशय त्याची नोंद करून ठेवतात. नंतर काही टोणगे, माथेफिरू, गुंड प्रवृत्तीचे लोक हे नंबर रिचार्ज वाल्याकडून विकत घेतात. मग भलेही ही मुलगी अगदी लहान असो किंवा लग्न झालेली महिला.
नंबर विकत घेण्यासाठी त्यांना फक्त रिचार्ज वाल्याकडे जावं लागतं. म्हणायचं “भैय्या रिचार्ज”आणि तिथे पडलेलं रजिस्टर न्याहाळून आपल्याला हवा त्या मुलीचा नंबर घ्यायचा. आणि पैश्यासाठी निर्लज्ज रिचार्ज वाले तो नंबर गुंडांना विकतात मुलींच्या दिसण्यानुसार त्यांच्या नंबर ची किंमत ठरते. जर मुलगी खूप छान दिसत असेल तर तिचा नंबर रु ५०० पर्यंत विकल्या जातो. आणि जर मुलगी दिसायला साधी असेल तर तिचा नंबर अगदी रु ५० ला सहज मिळतो.
हे त्रास देणारे फोन वरून अश्लील बोलणारे बहुतेक वेळा घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करतात, WhatsApp वरून घाणेरडे फोटोज, व्हिडीओज पाठवतात आणि अश्लील शब्दात महिलांचा विनयभंग करतात. पण तक्रार करताना महिलेला आपल्या शीलाचं भान ठेवून शब्द गाळावे लागतात. त्या सांगतात “लडका उलटी सीधी बातें कर रहा था” आता ह्यात एक तर घरातल्या चौकश्या पण येतात आणि त्या अश्लील गप्पा पण येतात. ह्यात ही गुंड सुटून जातात आणि पोलीस हात वर करून म्हणतात “कोई Crime नहीं बनेगा!”पण क्रिमिनल लॉयर अवनिंदर सिंग आणि सहकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की ह्या कृत्याला कायद्याच्या चौकटीत बसवता येतं.जेव्हा एखादी स्त्री आपला मोबाईल नंबर – खाजगी माहिती रिचार्ज वाल्यासोबत शेअर करत असते तेव्हा ती त्याच्यावर विश्वास ठेवत असते. आणि आर्थिक लाभासाठी कुणाचाही विश्वासघातकरणे हा एक गुन्हा आहे. त्यासाठी कायद्यानुसार ७ वर्षांचा कारावास अशी तरतूद आहे. त्याचसोबत हे कृत्य म्हणजेच “मोबाइल वरूनकाढलेली छेड” म्हणूनही दखलपात्र गुन्हा आहे.तर आया-बहिणींनो एकतर मोबाईल नंबर चुकीच्या लोकांकडे जाऊ देऊ नका. आणि समजा अनावधानानेगेलाच तर तक्रार करायला लाजू नका!

0
Answer link
तुमच्या प्रश्नाचे उत्तर देणे माझ्यासाठी कठीण आहे, कारण मुलींचे नंबर विकले जातात की नाही याबद्दल मला निश्चित माहिती नाही.
तथापि, काही संकेतस्थळे आणि अहवाल असे सूचित करतात की काही देशांमध्ये मानवी तस्करी आणि लैंगिक शोषणासाठी मुली आणि महिलांना विकले जाते. हे अत्यंत गंभीर आणि निंदनीय आहे.
जर तुम्हाला याबद्दल अधिक माहिती हवी असेल, तर तुम्ही खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:
- UNODC: मानवी तस्करी म्हणजे काय?
- Polaris Project: मानवी तस्करी विरुद्ध लढा
जर तुम्हाला मानवी तस्करीची कोणतीही घटना निदर्शनास आली, तर कृपया स्थानिक प्रा authoritiesधिकार्यांना किंवा पोलिसांना कळवा.