सायबर गुन्हेगारी
फसवणूक कशी झाली:
- फेब्रुवारी 2025 मध्ये, सागर कारंडे यांना एका अनोळखी महिलेचा WhatsApp मेसेज आला.
- तिने त्यांना इंस्टाग्रामवरील पोस्ट्स लाइक करण्यास सांगितले आणि प्रत्येक लाइकला 150 रुपये मिळतील असे आमिष दाखवले.
- सुरुवातीला, सागर यांना काही पैसे मिळाले, ज्यामुळे त्यांचा विश्वास बसला.
- नंतर, अधिक पैसे कमावण्यासाठी त्यांना काही रक्कम गुंतवण्यास सांगण्यात आले.
- त्यानुसार, त्यांनी 27 लाख रुपये गुंतवले, पण ते पैसे काढता आले नाही.
- त्यानंतर त्यांना आणखी पैसे गुंतवण्यास भाग पाडले आणि 19 लाख रुपये तसेच कर भरण्यास सांगितले.
- अशारितीने त्यांची एकूण 61 लाख रुपयांची फसवणूक झाली.
पोलिसात तक्रार:
या घटनेवरून हे स्पष्ट होते की, ऑनलाइन फसवणूक करणारे लोक विविध प्रकारे आमिष दाखवून लोकांची फसवणूक करतात. त्यामुळे, कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या प्रलोभनांना बळी पडू नये आणि आपल्या पैशांची आणि गोपनीय माहितीची काळजी घ्यावी.
ऑनलाइन वस्तू फसवणूक झाल्यास तक्रार करण्यासाठी खालील पर्याय उपलब्ध आहेत:
-
राष्ट्रीय सायबर गुन्हे पोर्टल (National Cyber Crime Reporting Portal):
- हे भारत सरकारचे संकेतस्थळ आहे. येथे तुम्ही ऑनलाइन फसवणुकीची तक्रार नोंदवू शकता.
- संकेतस्थळ: cybercrime.gov.in
-
पोलिस स्टेशन:
- तुम्ही तुमच्या जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये जाऊन लेखी तक्रार दाखल करू शकता.
-
ग्राहक न्यायालय (Consumer Court):
- जर तुम्ही ग्राहक असाल आणि तुमच्यासोबत फसवणूक झाली असेल, तर तुम्ही ग्राहक न्यायालयात तक्रार करू शकता.
-
भारतीय रिझर्व्ह बँक (Reserve Bank of India):
- जर फसवणूक बँकेtransactions संबंधित असेल, तर तुम्ही RBI कडे तक्रार करू शकता.
तक्रार करताना तुमच्याकडे फसवणुकीचे पुरावे, जसे की transaction details, मेसेजेस, ईमेल, इत्यादी तयार ठेवा.
टीप: फसवणूक झाल्यास त्वरित तक्रार करणे महत्त्वाचे आहे.
प्राथमिकता ही केवळ चेष्टा असू शकते. सध्या असे अनेक ॲप्स आहेत की ज्याद्वारे तुम्ही तुमचा नंबर न दाखवता दुसऱ्या नंबरवरून फोन करू शकता.
या पलीकडे जर या प्रकारात खरंच काही गांभीर्य लक्षात येत असेल तर तुम्ही पोलीस स्टेशनला लेखी तक्रार दाखल करून ठेवा. तक्रारीमध्ये त्या नंबरचा उल्लेख करा.
धन्यवाद.
तुमच्या नकळत आधार कार्ड वापरून कोर्ट स्टॅम्प पेपरवर डेटा एंट्रीच्या कामासाठी नोंदणी केली गेली आहे आणि आता वकील पैसे भरण्यासाठी दबाव टाकत आहेत, अशा स्थितीत तुम्ही काय करू शकता:
1. घाबरू नका:प्रथम, घाबरू नका. शांत राहून परिस्थितीचा सामना करा.
2. माहितीची पडताळणी करा:- तुम्हाला आलेले ईमेल, मेसेज आणि फोन कॉल्सची नोंद ठेवा.
- वकिलाने पाठवलेले कागदपत्रे तपासा.
- त्या कंपनी किंवा संस्थेबद्दल इंटरनेटवर माहिती शोधा.
जोपर्यंत तुम्ही खात्रीशीरपणे हे ठरवत नाही की हे खरे आहे, तोपर्यंत कोणत्याही प्रकारे पैसे देऊ नका.
4. सायबर क्राइममध्ये तक्रार करा:- तुम्ही https://cybercrime.gov.in/ या वेबसाइटवर ऑनलाइन तक्रार दाखल करू शकता.
- जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन लेखी तक्रार दाखल करा.
- एखाद्या वकिलाचा सल्ला घ्या आणि त्यांना सर्व परिस्थिती सांगा.
- तुम्ही विनामूल्य कायदेशीर मदतीसाठी सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकता.
- तुमच्या आधार कार्डची माहिती कोणालाही देऊ नका.
- आधार कार्ड फक्त अधिकृत ठिकाणीच वापरा.
जर तुम्ही तुमच्या बँक खात्याची माहिती दिली असेल, तर तातडीने बँकेत संपर्क साधा आणि तुमचे खाते सुरक्षित करा.
हे लक्षात ठेवा की तुमची जागरूकता आणि सतर्कता तुम्हाला अशा फसवणुकीपासून वाचवू शकते.
टीप: ही फक्त माहिती आहे, कायदेशीर सल्ला नाही. अधिक माहितीसाठी तुम्ही तज्ञांचा सल्ला घ्यावा.
*_☬ ‘Extortion’ अर्थात ‘खंडणी’ हा शब्द आता तसा समाजात रुळलेला आहे. अपहरण करून खंडणी वसूल करणे अथवा एखाद्या व्यावसायिकाला व्यवसायात बाधा येऊ नये, सुरक्षा अशा कारणासाठी दर महिन्याला गुन्हेगारांना पैसे द्यावे लागणे यासारखे खंडणीचे प्रकार अनेकदा आपल्या वाचनात आलेले अथवा ऐकण्यातदेखील आलेले असतात. मात्र या खंडणीच्या गुन्ह्याने आता सोशल मीडियावरदेखील हातपाय पसरायला सुरुवात केली आहे._*
*डिजिटल शॅडो’ या तंत्रज्ञान सुरक्षा विषयात काम करणाऱया कंपनीने नुकताच जो अहवाल प्रसिद्ध केला आहे, त्याने जगभरच्याच सायबर तज्ञांमध्ये चिंता निर्माण केली आहे. ‘LinkedIn’ सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून या ‘sextortions’च्या गुन्ह्यात लोकांना कसे लुबाडले जात आहे, हे या रिपोर्टमध्ये उघड झाले आहे. यामध्ये सायबर गुन्हेगार आधी LinkedInवर नवे खाते उघडतो. त्यानंतर उच्चभ्रू वर्तुळातील लोकांना विशेषतः डॉक्टर, वकील अशा लोकांना टार्गेट करून त्यांच्याशी खास मैत्री वाढवली जाते. यानंतर त्या व्यक्तीला त्याचा वापरातला एखादा पासवर्ड सांगून त्याची इतरही सगळी गुप्त माहिती, त्याचे एखाद्या परस्त्रीबरोबर असलेले संबंध यासंदर्भातदेखील माहिती असल्याचे धमकावले जाते.. ही माहिती उघड न करण्याच्या बदल्यात त्या व्यक्तीला एखादे ऍडल्ट कंटेंट ऑनलाइन बघत असतानाचा व्हिडीओ पाठवायला सांगितला जातो. यानंतरही त्याला धमकावत पुन्हा पैसेदेखील वसूल केले जातात. यामुळेच या प्रकारच्या गुह्याला ‘sextortion’ असे नाव देण्यात आले आहे. चिंतेची गोष्ट म्हणजे या प्रकारचे गुन्हेगार हे नुसते गुन्हे करूनच थांबत नाहीयेत, तर त्यांनी हे ‘sextortions’चे गुन्हे कसे करावेत यासंदर्भात मार्गदर्शन करणारी पुस्तके तयार करून तीदेखील किरकोळ रकमेत ऑनलाइन विकायला सुरुवात केली आहे.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,या गुह्यांसाठी मदत पुरवणाऱया लोकांना विशिष्ट रक्कमदेखील गुन्हेगारांकडून प्राप्त होत आहे. प्रतिष्ठीत व्यक्तीला टार्गेट करण्यासाठी, इतर काही खासगी माहिती, त्यांची प्रोफाईल्स या सगळ्याची माहिती मिळवून देण्यासाठीदेखील लोक नेमले जात आहेत.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=687525364978723&id=100011637976439
उत्तर प्रदेशात रिचार्ज करायला गेलेल्या मुलींचे नंबर विकले जातात. टपोरी गुंड लोक हे नंबर विकत घेऊन त्यांना त्रास देतात.एखादी मुलगी नवीन मोबाइल नंबर विकत घेते किंवा मोबाइलमध्ये रिचार्ज टाकण्यासाठी रिचार्ज च्या दुकानात जाते. मुलगी बघून हे रिचार्जवाले महाशय त्याची नोंद करून ठेवतात. नंतर काही टोणगे, माथेफिरू, गुंड प्रवृत्तीचे लोक हे नंबर रिचार्ज वाल्याकडून विकत घेतात. मग भलेही ही मुलगी अगदी लहान असो किंवा लग्न झालेली महिला.
नंबर विकत घेण्यासाठी त्यांना फक्त रिचार्ज वाल्याकडे जावं लागतं. म्हणायचं “भैय्या रिचार्ज”आणि तिथे पडलेलं रजिस्टर न्याहाळून आपल्याला हवा त्या मुलीचा नंबर घ्यायचा. आणि पैश्यासाठी निर्लज्ज रिचार्ज वाले तो नंबर गुंडांना विकतात मुलींच्या दिसण्यानुसार त्यांच्या नंबर ची किंमत ठरते. जर मुलगी खूप छान दिसत असेल तर तिचा नंबर रु ५०० पर्यंत विकल्या जातो. आणि जर मुलगी दिसायला साधी असेल तर तिचा नंबर अगदी रु ५० ला सहज मिळतो.
हे त्रास देणारे फोन वरून अश्लील बोलणारे बहुतेक वेळा घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करतात, WhatsApp वरून घाणेरडे फोटोज, व्हिडीओज पाठवतात आणि अश्लील शब्दात महिलांचा विनयभंग करतात. पण तक्रार करताना महिलेला आपल्या शीलाचं भान ठेवून शब्द गाळावे लागतात. त्या सांगतात “लडका उलटी सीधी बातें कर रहा था” आता ह्यात एक तर घरातल्या चौकश्या पण येतात आणि त्या अश्लील गप्पा पण येतात. ह्यात ही गुंड सुटून जातात आणि पोलीस हात वर करून म्हणतात “कोई Crime नहीं बनेगा!”पण क्रिमिनल लॉयर अवनिंदर सिंग आणि सहकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की ह्या कृत्याला कायद्याच्या चौकटीत बसवता येतं.जेव्हा एखादी स्त्री आपला मोबाईल नंबर – खाजगी माहिती रिचार्ज वाल्यासोबत शेअर करत असते तेव्हा ती त्याच्यावर विश्वास ठेवत असते. आणि आर्थिक लाभासाठी कुणाचाही विश्वासघातकरणे हा एक गुन्हा आहे. त्यासाठी कायद्यानुसार ७ वर्षांचा कारावास अशी तरतूद आहे. त्याचसोबत हे कृत्य म्हणजेच “मोबाइल वरूनकाढलेली छेड” म्हणूनही दखलपात्र गुन्हा आहे.तर आया-बहिणींनो एकतर मोबाईल नंबर चुकीच्या लोकांकडे जाऊ देऊ नका. आणि समजा अनावधानानेगेलाच तर तक्रार करायला लाजू नका!