उत्तर अभिप्राय सदस्यत्व अर्थशास्त्र

ॲक्टिव्ह मेंबर कोणाला म्हणायचे? ॲक्टिव्ह मेंबरची व्याख्या काय?

2 उत्तरे
2 answers

ॲक्टिव्ह मेंबर कोणाला म्हणायचे? ॲक्टिव्ह मेंबरची व्याख्या काय?

3
उत्तरासाठी विनंती केलीत म्हणून काही सांगतो, कारण ह्याची व्याख्या प्रत्येकाप्रमाणे बदलू ही शकते.

माझ्या मते ऍक्टिव्ह मेम्बर्स ते जे उत्तर वर सक्रिय दिसतात, रोज किंवा दोन तीन दिवसाआड का होईना, त्यांचा प्रश्न, उत्तर किंवा कंमेंट मध्ये सहभाग दिसतो. कारण प्रत्येक जण जसा वेळ मिळतो तसा उत्तर ला वेळ देतो, प्रत्येकाला नेहमी च उत्तर वापरायला मिळतेच अस नाही.

राहिला प्रश्न दुसर्या प्रश्नात विचारले की नक्की कोण, प्रश्न करणारे, उत्तर करणारे, की दोन्ही... तर त्या बाबतीत असे सांगता येईल,
जे प्रश्न विचारतात, ते तर त्यांना पडतात म्हणून विचारतात, गरजेच नाही की त्यांना इतर उत्तर यायला हवीच, म्हणजे ते नेहमी प्रश्न विचारणारे असतील, व कंमेंट मध्ये ही आभार व्यक्त करत असताना दिसत असतील किंवा नसतील, त्यांनी उत्तर ला एक स्वतःच आउटपुट दिले , म्हणजे ते उत्तर वर सक्रिय आहेत असं म्हणता येईल, नेहमी उत्तर देणारा हा तर सक्रिय असतोच आणि दोन्ही ही करणारा ही सक्रिय असतोच.

Inactive म्हणजे सक्रिय नसलेले मध्ये त्या व्यक्ती समजू शकता, ज्या उत्तर वर तर आहेत, परंतु सध्या उत्तर वापरत नाही आहेत. असे बरेच अकाउंट तुम्हाला उत्तर वर दिसले असतीलच ...
उत्तर लिहिले · 24/4/2018
कर्म · 85195
0

ॲक्टिव्ह मेंबर (Active Member) म्हणजे संस्थेचा क्रियाशील सदस्य. ॲक्टिव्ह मेंबरची व्याख्या संस्थेनुसार बदलते, परंतु काही सामान्य निकष खालीलप्रमाणे असू शकतात:

  • नियमित उपस्थिती: संस्थेच्या बैठकांना आणि कार्यक्रमांना नियमितपणे उपस्थित राहणे.
  • सहभाग: संस्थेच्या उपक्रमांमध्ये सक्रियपणे भाग घेणे आणि योगदान देणे.
  • देणगी: संस्थेला नियमितपणे आर्थिक देणगी देणे (लागू असल्यास).
  • मतदानाचा अधिकार: संस्थेच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार असणे.
  • नियमांचे पालन: संस्थेच्या नियमांचे आणि ध्येयांचे पालन करणे.

ॲक्टिव्ह मेंबर बनण्यासाठी संस्थेच्या नियमांनुसार अर्ज करावा लागतो आणि काहीवेळा चाचणी किंवा मुलाखत द्यावी लागते.

अधिक माहितीसाठी, तुम्ही तुमच्या संस्थेच्या नियमावलीचा अभ्यास करू शकता.

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 3000

Related Questions

नाममात्र सभासद आणि सहयोगी सभासद?
भाडेकरू मालकी हक्क गृहनिर्माण संस्थेत सभासदत्व कसे मिळवता येईल?