3 उत्तरे
3
answers
नगरसेवक ला इंग्रजी मध्ये काय म्हणतात?
14
Answer link
नगरसेवकास इंग्रजीत कॉर्पोरेटर म्हणतात. खरतर नगरसेवक या शब्दाला इतिहास आहे. नगरपालिकेत निवडून येणार्यांना city fathers म्हणत आणि त्यावरून नगरपिते हा शब्द मराठीत होता. १९६६ ६७ पर्यंत हा शब्द वापरला जात असे.
१९६७ साली ठाण्याच्या पलिका निवडणुकीत बाळासाहेबांनी आपली भूमिका त्यासंदर्भात मांडली, की ‘निवडून येणारा पालिकेचा सदस्य तुमचा बाप नाही, तुम्ही मतदार व नागरिक त्याचे बाप आहात. म्हणूनच बाप निवडू नका, तुमचे सेवक निवडा’ असे आवाहन बाळासाहेबांनी केले होते. शिवसेनेचे उमेदवार निवडून येतील, ते तुमचे बाप नातील, शहराचे पिते नसतील तर सेवक असतील. म्हणूनच त्यांना ‘नगरसेवक’ संबोधले जाईल.
आणि त्यानंतर मात्र हळूहळू सगळीकडे नगरसेवक हा शब्द रूढ झाला.
याच प्रमाणे महापौर या शब्दाचा इतिहास ही रंजक आहे. मेयर या शब्दला मराठी शब्द नव्हता।
सावरकरांचे अनुयायी गणपतराव नलावडे पुणे शहराचे ’मेयर’ झाले. त्यानंतर दोन दिवसांनी सावरकरांकडून अभिनंदनाचे पत्र त्यांच्याकडे आले. त्यात म्हटले होते, – “पत्र पाठवण्यास विलंब होत आहे, क्षमस्व.’मेयर’ या शब्दाला प्रतिशब्द काय असावा याचा विचार करत होतो. तो शब्द मिळाला. ’महापौर’ हा शब्द मिळाला. ’महापौर’ हा शब्द अधिक योग्य वाटतो.”
पत्र मिळताच गणपतराव नलावडे यांनी ’मेयर ऑफ पुणे’ ची पाटी काढायला लावून ’महापौर पुणे ’ अशी पाटी लावायला सांगितली.

0
Answer link
नगरसेवकाला इंग्रजीमध्ये "Councillor" (काउन्सलर) म्हणतात.
तसेच काही ठिकाणी "City Councillor" असेही म्हटले जाते.