क्रीडा क्रिकेट मराठी भाषा

क्रिकेटला मराठीमध्ये काय म्हणतात?

4 उत्तरे
4 answers

क्रिकेटला मराठीमध्ये काय म्हणतात?

10
क्रिकेटला मराठीत चेंडूफळी म्हणतात. पण दुर्दैवाने हा शब्द सहसा वापरला जात नाही. जास्त करून एखाद्या चेंडूफळीच्या स्पर्धेवेळी या खेळाचे समालोचन जर मराठीत करायचे असेल तेव्हा हा शब्द वापरला जातो. जसे की, चेंडूधारकाने (बॉलरने) फेकलेला चेंडू फळीधारकाने (बॅट्समनने) सीमारेषेबाहेर तटावला व चार धावा मिळवल्या" वगैरे. या खेळातील बरेचसे शब्द आजच्या पिढीने ऐकले/वाचले असतील याबद्दल शंका वाटते.... यष्टी (stump), त्रिफळाचित (clean bold), चौकार (four), षटकार (sixer), खेळपट्टी (pitch), वगैरे वगैरे. पण काही म्हणा, चेंडूफळीच्या खेळाचे समालोचन मराठीत ऐकण्यात असलेली मजा इंग्लिश कॉमेंट्रीत नाही.
उत्तर लिहिले · 18/4/2018
कर्म · 91065
2
क्रिकेटला मराठीमध्ये लंब दंड गोल म्हणतात. याची सविस्तर माहिती तुम्हाला खाली मिळेल.



उत्तर लिहिले · 17/4/2018
कर्म · 220
0

cricket ला मराठीमध्ये क्रिकेटच म्हणतात. काही जण त्याला चेंडू-फळीचा खेळ असेही म्हणतात.

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 1180

Related Questions

क्रिकेट या खेळाला मराठी मध्ये काय म्हणतात?
कुस्तीसाठी खाशाबांचे शरीर बळकट होण्याची कारणे काय होती?
मतदेरी स्पर्धा प्रस्तावना?
खेळामुळे बालकांच्या कोणत्या क्षमता वाढतात?
2025 आयपीएल मध्ये CSK vs MI यांच्यातील आजचा टॉस विनर कोण?
2025 आयपीएल मध्ये, एमआय विरूद्ध सीएसके यांच्यातील आजचा टॉस विजेता कोण?
कॅनडा वि. नामिबिया याच्यातील आजची टॉस विनर टीम कोणती?