व्यवसाय व्यवसाय कल्पना

मला बिझनेस करायचा आहे. हल्ली कोणता बिझनेस जोर धरू शकतो, कल्पना द्या?

4 उत्तरे
4 answers

मला बिझनेस करायचा आहे. हल्ली कोणता बिझनेस जोर धरू शकतो, कल्पना द्या?

1
7499778848 व्हाट्सॲप करा, सगळी माहिती पुरवेल, फायद्यासहित.
उत्तर लिहिले · 26/12/2019
कर्म · 6720
1
.
               "मराठी तरुणांनो विचार तर करा"
"महाराष्ट्र मध्ये जन्मलेल्यांना काम नाही, बाहेरचे येऊन काम घेतात!" हे तर पळाले, आता प्लॅनिंग करायला घ्या हे यायच्या आत की आपण आता

- टॅक्सी चालवू शकता,

- कपड्यांना इस्त्री करू शकता,

- रंग काम, POP काम, फर्निचर करू शकता (खूप पैसा आहे यात, साईट वरचे कॉन्ट्रॅक्टर तर मस्त हाय एन्ड कार ने फिरतात, त्यांच्या कामगारांना 500 - 1500 रोज पगार आहे, ते आपापल्या स्किल वर अवलंबून असते...फक्त खूप मेहनत करावी लागते "घड्याळ घरी ठेवून", कमिटमेंट पाळाव्या लागतात, आणि सर्वात महत्वाचे, फोन उचलावे लागतात)

- पाणी पुरी विकू शकता (भरपूर पैसा आहे यात)

- कच्छि दाबेली, वडापाव विकू शकता, सॅन्डविच विकू शकता (एक हातगाडी वाला - रोज किमान 100 प्लेट विकतो x रू.15 = 1500, किमान 50% मार्जिन आहे = 750 x 30 = 22500 रु. महिना खिशात)
हे किमान आहे बरं का लक्षात ठेवा.... किमान.... तसे तर काहीजण 500-500 प्लेट विकतात रोज.... किमान
वडापाव विकणे म्हणजे काय साधे काम नाही, पुण्यातल्या वडापाव च्या गाड्यावर इन्कमटेक्सच्या रेड पडलेला पुण्याचा इतिहास आहे... माहिती आहे ना?

फळं, भाज्या विकू शकता.
पान विकू शकता, केवढं मार्जिन आहे यात...

करायचं म्हटलं तर कसाही पैसा कमवू शकतात,

आता आपला पुण्यातील कल्याण भेळ वाला, रस्त्यावर भेळ ची गाडी होती म्हणतात पूर्वी, पण क्वालिटी देऊन देऊन आज कितीतरी AC फ्रांचायजीज आहेत भेळेच्या... विचार तरी केला होता का की किमान 400 sqft AC भेळ रेस्टॉरंट???

मानकर डोसा वाले... ठिक ठिकाणी,

येवले चहा,

चितळे - यांच्या फ्रांचायजी बद्दल काय बोलणे!

बेडेकर मिसळ, श्रीकृष्ण मिसळ, काटाकीर मिसळ वाले
ज्याला ज्या पद्धतीची चव आवडते तिकडे तो मिसळ खायला जातो.

देसाई आंबेवाले, म्हणजे फळवलेच ना?
दरवर्षी फक्त...  बरं का फक्त 11000 आंबे दगडूशेठ गणपतीच्या चरणी दान करतात... 11000 आंबे दान कशाला म्हणतात??

अजून काय काय उदाहरणे देऊ???

दुर्गा कॉफी, किती फ्रांचायजी आहे यांच्या???? किती मोठे झाले???

हि सर्वच्या सर्व मराठी माणसे आहेत ना? छोट्यातुनच मोठे झाले आहेत हे सगळेच्या सगळे, आयते काही नाही मिळाले यांना, हातावर हात धरून कोणीतरी मदतीला येईल म्हणून नाही बसले... स्वतः उठले, ध्येय ठेवले, मेहनत केली, योग्य प्रकारे पैशांचे व्यवहार ठेवले, व्यवस्थित व्यवसायात इन्व्हेस्ट करून पैशाने पैसा जोडला...
फक्त तीनच नियम पाळले यांनी... #क्वालिटी #साफसफाई #वर्षानुवर्षे_तीच_चव आणि माऊथ पब्लिसिटी...

यश लगेच मिळत नाही, वेळ लागतो...
एका रात्रीत मिळालेले यश लगेच ढेपते, पण वेळ लागून मिळालेले यश कायम टिकते...

तर,
कारणं सांगत बसू नका... आणि रडत तर अजिबात बसू नका, कमी येणार नाही मदतीला...
आपल्या लोकांचा सर्वात मोठा ड्रॉ बॅक म्हणजे नेत्यांच्या मागे दादा, ताई साहेब, भाऊ, अण्णा करत वेळ घालवणे,
अरे काय सेल्फ रिस्पेक्ट प्रकार आहे की नाही???

लोकं बाहेरून येऊन आपल्याकडे काम करून पैसे कमवतात तर आपणच कुठेतरी कमी पडतोय का?
मेहनत सोडून एकमेकांचे पाय खेचण्यात वेळ घालवतोय का?
आणि रुबाब काय संपत नाही आपला...?

मी हे मी ते... आपल्याशी वाकडं नदीवर लाकडं यातच आपण  रुबाब मानतो... व्यवहार नीट ठेवत नाही, फोन बंद असतात, कमिटमेंट नसतात...

टॅक्स नाही भरणार तुम्ही , पुन्हा पुन्हा सांगतोय टॅक्स नाही भरला तर तुम्ही मोठेच होणार नाही कारण बँक वाले उभे पण नाही करत बिजनेस लोन लागले तर... फाईल स्ट्रॉंग करा आपली...जास्त सेविंग करा... मी माझे छोटे छोटे खर्च दाखवून टॅक्स न वाचवता उलट जास्त टॅक्स भरायचा प्रयत्न करतो कारण मला माहिती आहे मला हे ऑफिस पूरत नाहीये  आणि अजून 5 वर्षात मला किमान 4000 Sqft चे ऑफिस घ्यायचे आहे आणि माझी फाईल स्ट्रॉंग केली तर बँक उभं करेल....

दर महिन्याला 80-20 फॉर्म्युला वापरा खर्चाचा...
महिन्याचे इन्कम पैकी 20% सेविंग झालेच पाहिजे,
म्हणजे 20,000 इन्कम असेल तर किमान 4000 सेविंग झालेच पाहिजे आणि 80% म्हणजे 16000 यातच काय घराचा खर्च, लाईट फोन बिल आणि कर्ज वगैरे पाहिजे,
नाहीतर पगार 20000 आणि फोन 80000 चा...
फालतूचा रुबाब मिरवण्यापेक्षा थोडे सदाशिवपेठी बना,
फालतू खर्च नाही करत ते... लाजयचं नाही पैसे साठवताना...

हे बदलले तर काहीतरी होईल... हात पसरवायची वेळ येणार नाही...

आता चान्स आहे काम मिळवायचा परत...
उगाच मंदी बिंदी तसले काहीच नसते,
किती ही मंदी मंदी केले तरी लोकं जेवायचे , जिभेचे चोचले पुरवायचे थांबवत नाहीत... गरजेच्या वस्तू घेण्याचे थांबवत नाहीत...

आपल्या अपयशाला आपणच जबाबदार हे जेव्हा माहिती होईल तेव्हा सक्सेस मिळेल, कायमच आपल्या अपयशाचे खापर कायम दुसऱ्यांवर फोडू नका, ही काय शाळा नाहीये आजारी होतो म्हणून मार्क कमी पडले...

एकमेकांचे पाय खेचणे वृत्ती बंद करून स्वतःची रेषा मोठी करायचा प्रयत्न कराल, स्वतःची एक स्पेशालिटी बनवा, आपल्या शिवाय ऑप्शनच नको कोणाला असे, काहीतरी स्वतःला बोंडरी आखाल तर श्रीमंत व्हाल नाहीतर काय खरं नाही... रडतच बसाल काम नाही पैसे नाही करत....

आणि जरा सौजन्याने आणि गोड बोलयला शिका,
आणि खोटे बोलून लोकांना तात्पुरते खूष करण्यापेक्षा किंवा तात्पुरता खिसा भरण्यापेक्ष्या स्पष्ट बोलायला शिका, ग्राहकांना स्पष्ट बोलणारे दुकानदार जास्त आवडतात...

एक माझेच उदाहरण सांगतो...
टच वुड🙏 माझ्या स्पष्ट आणि फ्रिली बोलण्यामुळे, आणि माझ्या सर्व्हिस आणि कमिटमेंट मुळे जिथे इतर आर्किटेक्चरल डिझायनर कन्सल्टंट 5%, 8%, मॅक्स 10% फी घेतात तिथे मी 15% फिक्स फी घेतो, पुण्याचा बाहेरचे प्रोजेक्ट 20% फी... यांच्या डबल, कारण निस्वार्थी व्यवहार, लोकांचे घर करताना लाखो रुपये त्यांचे असतात आपल्याकडे, त्यात इमानदारी ठेवा, नको तिथे हात मारू नका ..माझ्या क्लाएंटला माहिती आहे माझी फी मी त्यांना वसुल करून देऊ शकतो ...टच वूड...🙏

थोडक्यात  काय? तर लोकं तुम्हाला दुप्पट पे करतात जर तुमचे व्यवहार आणि बोलणे स्पष्ट असेल आणि सर्वात महत्वाचे... कमिटमेंट आणि क्वालिटी... या सारखी मोठी इन्व्हेस्टमेंट नाही कुठली लक्षात ठेवा... आणि लोकांनी तुमच्यावर पैशांसाठी विश्वास ठेवायला खूप वर्षचा कालावधी जातो, तात्पुरता विचार कराल तर सक्सेस विसरा...

तर सांगायचा उद्देश असा,
लोहा गरम है मार दो हाथ...

मराठी तरुणांनो,

जरा प्लान करा. येणाऱ्या मे जून मधे नविन व कमी भांडवलात कमाईची संधी आहे. आणि तीही वर्षभर. फक्त आतातरी प्रेस्टीज इशू करू नका. शहरातील प्रत्येक विभागात जीवनावश्यक वस्तू विक्रीच्या गाड्या लावण्यासाठी काय करावं लागेल याची माहिती मिळवा. यापुढच्या काळात हेच रोखीचे (रोकड ) उद्योग
सामान्य मराठी माणसांना तारणार आहेत.

आतापर्यंत हे व्यवसाय ताब्यात ठेवणारे UP, बिहारी सगळे त्यांच्या घरी -गावी पळाले आहेत!
आपल्या मुलांना विनंती आहे की , घरीच आहात तर वडा, समोसा, डोसा, सांभर,इडली-चटणी, पोहे, शिरा, उपमा, उपीट असले नाष्ट्याचे पदार्थ बनवायचे घरी शिका. पाणीपुरी बद्दल पण माहिती घ्या. आई, बहीण, आज्जी यांच्या सारख्या कडून शिकून घ्या.
तुम्ही महाराष्ट्रामधल्या विविध जिल्ह्यामधले आहात. तिथे पिकणारी फळे, भाज्या, धान्य अशा वस्तू तिथल्या शेतकऱ्यांशी
(ते तुमचेच भाऊ, काका, मामा, आजोबा आहेत )संपर्क करून या वस्तूंचा नियमित पुरवठा मिळविण्याचा प्रयत्न सुरू करा. त्यांना विश्वास द्या की व्यवहारात तुम्ही तुमचा  शब्द नेहेमी पाळाल.

पुढे येणाऱ्या पावसाळ्यानंतर UP,बिहारी परत इथे यायच्या आत आपल्या तरुणांच्या
हात गाड्या लागल्या पाहिजेत. चांगली संधी चालून आली आहे. परत बोंबलू नका काम - धंदा मिळत नाही म्हणून.

दादा,आण्णा,भाऊ,भाई,
असे तुमचे काळीज असलेले  पुढारी नेते, याना सांगून त्यांच्या राजकीय ताकदीचा वापर करून मराठी तरुणांनो, खाद्यपदार्थांची, भाजीपाला -फळांची, चहा ची गाडी ,  लावायची परवानगी घ्या  महापालिकेकडून.

तरुणांनो यापुढे नोकरीच्या संधी खूप कमी होणार आहेत, ज्यांना नोकऱ्या आहेत  त्यांच्याच नोकऱ्यांची शाश्वती असणार नाहीये.
तुम्हाला उद्योग व्यवसाय करण्यावाचून गत्यंतर उरणार नाहीये. जागतिक
आर्थिक मंदी आणि कोरोना व्हायरस मुळे निर्माण झालेली आर्थिक टाळेबंदी आणि त्याचा तुमच्या मासिक उत्पन्नावर भविष्यकाळात होऊ घातलेला अनिष्ट परिणाम याचा गंभीरपणे विचार करा.
कोरोनाच्या आपत्तीचे संधीत रूपांतर करा आणि थोडंस स्वार्थी व्हा!इतके दिवस काम केलेत  ना नेत्यांचे - पक्षांचे ?आता हक्काने जागा मागा वडापावची , चहाची, भाजीपाल्याची-फळांची , हातगाडी लावायला!!
अशी संधी पुन्हा कधीच येणार नाही
चला तर मग, उठा आणि कामाला लागा...

एक हजार ते पंचवीस  हजारपर्यंत भांडवल लागणारे व्यवसाय_.*
..
१ 】चहा काॅफी करुन विकणे. पाचपट नफा.
२】 कुल्फी विकणे. घरीच केली तर तिप्पट नफा.
३ 】मासे विकणे. दिडपट नफा.
४ 】आंबे होलसेल आणून रिटेल विकणे.
५ 】तरकारी अर्थात पहाटे होलसेल भाजी खरेदी करून रिटेल विकणे दिडपट होतात
६ 】पाणीपुरी रगडा पुरी विकणे यात पैसे तिप्पट होतात
७】 कच्छी दाबेली. हातगाडी भाड्याने घ्या व चौपट नफा मिळवा. दाबेलीचे वेगळे पाव मिळतात.
८ 】वडापावची गाडी लावा. स्वस्त विकलेत तरी दिडपट नफा.
९ 】मूग भजी ची विक्री करा. घराबाहेरच स्टाॅल लावा. नंबर वन धंदा होतो. तिप्पट नफा.
१०】 ढोकळा विक्री. घरी ढोकळा बनवा. चटणी बनवा. मोठ्या स्टीलच्या डब्यात भरुन घराबाहेर किंवा मोक्याच्या ठिकाणी विका.
११ 】चाळीस रुपये किलोच्या डोश्याच्या पीठाचे वीस डोसा तयार होतात. एक डोसा वीस रुपयांना विका. सोबत भाजक्या डाळीची चटणी व बटाटा भाजी द्या. याच पीठाचे वडेसुध्दा विकता येतात.
१२】 घरीच पोळी भाजी बनवुन कस्टमरला ऑफिस पोच डबा पोहोचवा.
१३】 फळ विक्री करा.
१४ 】शहाळे आणून विका. रोज तेच ते ग्राहक मिळेल. बावीस रुपयांचे चाळीस रुपये होतात.
१५ 】कापडाचे तुकडे पोत्याने विकत मिळतात. घरी शिलाई मशीन असेल व कोणाले शिलाई करता येत असेल तर झबले टोपडे व दुपटे करून विका. टाकाऊतुन टिकाऊ बनवा.
१६】 फ्लेक्स बोर्ड तयार करुन, आणून, चिटकवून, लावून द्या. दोनशे ते पाचशे रुपये प्रती मिळतात.
१७ 】सातारा येथे राजवाड्याजवळ सुट्ट्या उदबत्त्या वजनावर विकतात तशा आपल्या स्वतःच्या गावातही विकता येईल.
१८】मुंबई येथे होलसेल मार्केट मध्ये कपड्यांचा लाॅट विकत आणून घरी सुध्दा बिझिनेस सुरु करु शकता. दादर रेल्वे स्टेशन शेजारीच होलसेल मार्केट आहे.
१९】 मंदिराजवळ नारळ विक्री करा
२० फुलांच्या मार्केटमधुन फुलं आणा व त्याचे हार करुन विका. यात खुप फायदा आहे.
२१】 हाॅटेलला कडधान्ये पुरवणे.
२२】 हाॅटेलला बटाटे खुप लागतात. सप्लाय करा.
२३ 】घरी चटणीचे चार पाच प्रकार तयार करुन थेट फूड मार्ट ला विका किंवा स्वतः रिटेल करा.
२४】 लेदर शिलाईची जुनी मशीन घ्या व सिटकव्हर तयार करुन विका. चांगले मार्जिन मिळते.
२५】 मार्केटला लसणाच्या पाकळ्या होलसेलमध्ये मिळतात. घरी आणून गरम पाण्यात मीठ टाकून लसणाच्या पाकळ्या टाकल्या की लगेच हाताने चोळुनही साले निघतात. हाॅटेल, भाजीवाले यांना छोटी मोठी पाकिटे करुन विका.
२६】 एलईडी बल्ब स्टाॅल लावून विका. आपल्या ग्रुपवर त्याचे होलसेलर आहेत
२७】 ज्यांना योगासने येतात त्यांनी त्याचे क्लास सुरु करावेत.
२८】 महिलांसाठी घरगुती बिझिनेस, पाळणाघर सर्वात बेस्ट बिझिनेस करु शकता. भांडवल लागतेच. खेळणी, दूध, इ. ठेवावे लागते
२९】 प्लॅस्टीक बंदी होणार असल्यामुळे कागदी व कापडी पिशव्यांची मागणी वाढत आहे. घरी तयार करा. दुकानदारांना थेट विका. खुप स्कोप आहे.
३०】 पेस्टकंट्रोल कसे करतात शिकून घ्या. हा धंदा उन्हाळ्यात खुप चालतो. रुमनुसार रेट असतात.
३१】 प्लंबिंग काम शिकून घ्या. दररोज हजार रुपये 'सहज कमवा'.
३२】 विको दंतमंजनच्या मागे लिहिलेले साहित्य काष्टौषधीच्या दुकानातुन आणून त्याचे घरी दंतमंजन तयार करा. खुप परवडते.
३३】 काही औषधी जंगलात जाऊन गोळा करुन आणून आयुर्वेद डाॅक्टरांना विका.
३४】 गोमुत्र गोळा करुन बाटलीत पॅक करुन विका.
३५】 खेडेगावात असाल तर दुध गोळा करुन शहरात जाऊन विका. देशी गायीचे दूध शहरात सत्तर रुपये ते दोनशे रुपये प्रतिलीटर विकले जाते.
३६】 गावाकडे उन्हाळ्यात कडबा कुट्टी खुप चालते. ज्याच्याकडे यंत्र आहे त्याच्याकडे जाऊन पोती भरुन घरपोच करता येतील.
३७】 फाईल तयार करायचा पुष्ठा मिळतो. पट्ट्याही मिळतात. फक्त कटिंग मशीनने कटींग करुन ऑफिसला सप्लाय करु शकता. प्रिंटिंग करुन पाहिजे असल्यास प्रेसमधून करुन घेऊ शकता.
३८】 स्टेपलर, त्याच्या पिना, पंच मशीन ऑफिसला सप्लाय करुन वीस ते पंचवीस टक्के फायदा मिळतोच. फक्त तुम्हाला बरेच ऑफिस शोधावे लागतील.
३९】 आता लगीनसराई सुरु झाली आहे. नवरदेवाचे फेटे विका. ज्यांचे टेलरींगचे दुकान आहे त्यांना हा जोडधंदा म्हणून चांगला आहे
४०】 भगव्या फेट्यांची फॅशन जोरात चालू आहे. फेटा बांधायला शिका. चार महीने भरपूर कमवा. सोबत भगव्या फेट्याचे कापडही भाड्याने द्या.
४१】 उन्हाळ्यात चिंच फोडून चिंच वेगळी करुन विकू शकता.  शिरे व टरफले यांची पुड बनवुन त्यात मीठ मिसळुन तांबे पितळेची भांडी घासायला पावडर तयार करु शकता. चिंचोक्याचे भट्टीतुन लाह्याही बनवतात.
४२】 उन्हाळ्यात होलसेल दही आणून त्याचे घुसळुन लोणी व ताक काढले जाते. मसाला ताक करुन विकणे हा खुप फायदेशीर बिझिनेस आहे. फक्त त्यात बर्फ टाकू नये. त्याऐवजी माठात साठवून ठेवता येते. तसे विका
४३】देवदेवतांचे साचे विकत मिळतात. त्यात POP टाकून मुर्ती बनवता येतील व रंगवून विकता येतील परंतु याला प्रशिक्षणाची व कौशल्याची खुप गरज आहे. कलेतुन पैसे जास्त मिळतात.
४४】रद्दी खरेदी करणे गठ्ठे बांधून होलसेल विकणे हा सर्वात कमी भांडवलाचा सुंदर व्यवसाय आहे. अनुभवातुन हा व्यवसाय मोठा करता येईल
४५】जिमचा अनुभव असेल तर शहरामध्ये जाम कोच म्हणून सेलिब्रेटीजना गाईडंस करुन भरपूर फी मिळते.
४६】शेवचिवडा होलसेल आणायचा. चुरमुरे पोत्याने आणायचे. चुरमुरे चाळण मारुन साफ करून घ्यायचे. चिंचपाणी घरीच तयार करुन ओली व सुकी भेळ विकता येईल. अगदी हातगाडीसुध्दा चालेल. नाट्यगृह, समुद्र बीच, गजबजलेल्या रस्त्यावर किंवा बागेबाहेर अशी छोटी दुकाने थाटली जातात.
४७】धोबी अर्थात लाँड्रीवाले कामगार ठेवतात. धुवायचे कपडे, ड्रायक्लिन कपडे बाहेरच्या माणसाकडुन घेतले जाते. हल्ली हा बिझिनेस कोणीही करत आहे. शहरात जाऊन टाकला तर मी खात्रीने सांगतो तुम्ही हा बिझिनेसमध्ये यशच मिळवणार. कारण शहरात महिला नोकरीचे प्रमाण खुप आहे.
४८】रेडियम चा बिझनेसही खुप चांगला आहे पण मशीनरी आवश्यक आहे. सध्या सर्वात जास्त चालणारा बिझिनेस आहे. नंबर प्लेट ते गाडीचे डेकोरेशन सर्वात रेडियम वापरतात. रोल होलसेल मिळतात. अगदी घरीही ब्लेडने कटिंग करुन विकता येते.
४९】रिचार्ज चा बिझनेसही खुप चांगला आहे. एक हजारपासून सुरु करता येतो. विशिष्ठ टारगेट पुर्ण केले तर स्कीमनुसार अनेक जादाचे फायदेही मिळतात.
५०】 सर्वात सुंदर व लेटेस्ट बिझिनेस म्हणजे मोबाईल अॅक्सेसरीज विकणे....

कृपया सर्वांनीच उपरोक्त माहिती इतर ग्रुपवर शेअर करायला हरकत नाही....

‼️🙏‼️
उत्तर लिहिले · 20/4/2020
कर्म · 360
0

तुम्ही व्यवसाय सुरू करू इच्छिता हे ऐकून आनंद झाला. आजकाल अनेक व्यवसाय आहेत ज्यांमध्ये वाढ होण्याची क्षमता आहे. काही निवडक व्यवसायांची माहिती खालीलप्रमाणे:

1. ई-कॉमर्स (E-commerce):

  • आजकाल ऑनलाइन खरेदीकडे लोकांचा कल वाढत आहे. त्यामुळे तुम्ही ऑनलाइन स्टोअर सुरू करू शकता.
  • उदाहरणार्थ, तुम्ही विशिष्ट उत्पादने जसे की कपडे, सौंदर्य उत्पादने, हस्तकला किंवा स्थानिक उत्पादने ऑनलाइन विकू शकता.
  • ॲमेझॉन (https://www.aboutamazon.com/) किंवा फ्लिपकार्ट (https://www.flipkart.com/) सारख्या प्लॅटफॉर्मवर विक्रेता म्हणून सुरुवात करू शकता.

2. डिजिटल मार्केटिंग (Digital Marketing):

  • आजकाल प्रत्येक व्यवसायाला ऑनलाइन प्रसिद्धीची गरज आहे. त्यामुळे डिजिटल मार्केटिंग सेवा पुरवणे फायदेशीर ठरू शकते.
  • SEO (Search Engine Optimization), सोशल मीडिया मार्केटिंग, कंटेंट मार्केटिंग, ईमेल मार्केटिंग यांसारख्या सेवा तुम्ही देऊ शकता.
  • Google ॲनॅलिटिक्स (https://marketingplatform.google.com/about/analytics/) आणि HubSpot (https://www.hubspot.com/) सारखी टूल्स वापरून तुम्ही क्लायंट्सना चांगले परिणाम देऊ शकता.

3. आरोग्य आणि वेलनेस (Health and Wellness):

  • आजकाल लोक आपल्या आरोग्याबाबत अधिक जागरूक झाले आहेत, त्यामुळे या क्षेत्रात अनेक संधी आहेत.
  • तुम्ही फिटनेस स्टुडिओ, योगा क्लास, न्यूट्रिशन सल्लागार किंवा आरोग्य उत्पादने विक्रीचा व्यवसाय सुरू करू शकता.
  • ॲप्स आणि वेअरेबल डिव्हाइसेसच्या माध्यमातून तुम्ही लोकांना फिटनेस ट्रॅक करण्यास मदत करू शकता.

4. शिक्षण आणि प्रशिक्षण (Education and Training):

  • ऑनलाइन शिक्षण (Online Education) आणि कौशल्य विकास (Skill Development) क्षेत्रात खूप वाव आहे.
  • तुम्ही ऑनलाइन कोर्सेस, वर्कशॉप्स किंवा ट्युटोरिअल सुरू करू शकता.
  • उदाहरणार्थ, तुम्ही भाषा शिकवणे,Coding शिकवणे, किंवा इतर व्यावसायिक कौशल्ये शिकवू शकता.
  • Udemy (https://www.udemy.com/) आणि Coursera (https://www.coursera.org/) सारख्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही तुमचे कोर्सेस विकू शकता.

5. पर्यावरणपूरक व्यवसाय (Eco-Friendly Business):

  • पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढत आहे, त्यामुळे पर्यावरणपूरक उत्पादने आणि सेवांची मागणी वाढली आहे.
  • तुम्ही सौर ऊर्जा (Solar Energy)Installation, कचरा व्यवस्थापन (Waste Management), किंवा सेंद्रिय शेती (Organic Farming) व्यवसाय सुरू करू शकता.
  • पर्यावरणपूरक उत्पादने बनवून त्यांची विक्री करणे देखील एक चांगला पर्याय आहे.

व्यवसाय सुरू करण्यापूर्वी बाजाराचा अभ्यास करणे, योग्य योजना तयार करणे आणि आवश्यक ते ज्ञान आणि कौशल्ये प्राप्त करणे महत्त्वाचे आहे.

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 1440

Related Questions

दिवाळीसाठी कमी खर्चिक व जास्त नफा देणारे उत्तम व्यवसाय कल्पना काय आहेत?
माझ्याकडे लॅपटॉप आहे, त्यावरून मी कोणता उद्योग करू शकतो का?
एखादी चांगली बिझनेस आयडिया सांगा ना 10 लाख पर्यंत ?
मला बिजनेस करायचा आहे, काही आयडिया सुचवा?
मला व्यवसाय करायचा आहे, काही आयडिया सुचवा?
मला तालुका स्तरावर अभ्यासिका (study point) सुरू करायची आहे, त्यासाठी काही कल्पना सुचवा आणि लोकांना आकर्षित करतील अशी नावे सांगा.
सर, मला बिझनेस करायचा आहे, बिझनेस आयडिया सुचवा? ब्रांच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आहे?