2 उत्तरे
2
answers
RAW म्हणजे काय, भारतीय गुप्तहेर संस्थेबद्दल माहिती मिळेल का?
35
Answer link
*भारतीय गुप्तहेर संस्था – RAW – बद्दल काही अभिमानास्पद गोष्टी*
*RAW म्हणजे RESEARCH AND ANALYSIS WING (R&AW or RAW)*
_भारतीय गुप्तहेर संस्था_
RAW ही देशासाठी काम करणारी, प्रसंगी जीवावर उदार होऊन देशाच्या सुरक्षेची काळजी घेणारी एक गुप्तहेर संघटना इतकेच आपल्याला माहित असतं. ते तेवढच माहित असणं आपल्या आणि देशाच्या सुरक्षेसाठी योग्य असतं. कारण कुठल्याही मिशनवर काम करताना प्रचंड गुप्तता पाळणे हे RAW च्या लोकांसाठी अत्यावश्यक असते. नव्हे, त्यांना तशा सूचनाच असतात. पण तुमच्या माझ्या सारख्या सामान्य भारतीय नागरिकाला RAW विषयी प्रचंड उत्सुकता असते. शिवाय आपल्या हिंदी चित्रपटांनी त्यांच्या विषयी चित्रपट निर्माण करून त्यांच्याविषयीची उत्सुकता अजून वाढवलेली असते. बेबी, एक था टायगर , एजंट विनोद, मद्रास कॅफे, डी-डे किंवा हल्लीच आलेल्या नाम शबाना ह्या चित्रपटांमध्ये आपण RAW एजंट कसे काम करतात, त्यांच्यावर काय जबाबदारी असते आणि त्यासाठी त्यांना काय काय दिव्यातून जावे लागते हे आपण बघितलेले आहे.
पण खरंच असे असते का? हे त्यांनाच ठावूक! पण आज आपण RAW विषयी काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या वाचल्यावर तुम्ही ह्या गुप्तहेर संघटनेला मनापासून सॅल्यूट कराल.
*RAW ची स्थापना इंडो-चायना युद्धानंतर झाली.*
१९६२ मध्ये चीनकडून युद्धात पराजयाचा सामना केल्यानंतर परत १९६५ मध्ये पाकिस्तानने भारतावर युद्धाचा प्रसंग आणला. ह्याने भारताच्या तेव्हाच्या ‘इंटेलिजन्स एजन्सी’चे पितळ उघडे पडले. त्या एजन्सीज खरंच किती कामाच्या आहेत हे तेव्हा सरकारच्या लक्षात आले. म्हणूनच ह्यावेळी अशा एका एजन्सीची गरज होती जी भारताची सुरक्षाव्यवस्था बळकट करू शकेल. म्हणूनच इंदिरा गांधी ह्यांच्या तत्कालीन सरकारने २१ सप्टेंबर १९६८ साली RAWची स्थापना केली. RAW चे पहिले डायरेक्टर म्हणून रामेश्वर नाथ काओ ह्यांच्याकडे जबाबदारी सुपूर्त करण्यात आली. त्यांनी त्यांच्या ९ वर्षांच्या कार्यकाळात सिक्कीमला भारताशी जोडून ठेवण्यात तसेच १९७१ च्या युद्धात पाकिस्तानला धूळ चारून बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्वाची भूमिका वठवली होती.
*RAW चा सर्वोत्तम एजंट ‘ब्लॅक टायगर’*
राजस्थानमधील श्री गंगानगर मध्ये ११ एप्रिल १९५२ रोजी रविंद्र कौशिक ह्यांचा जन्म झाला. ते एक थियेटर आर्टिस्ट होते. ते वेश बदलण्यात पटाईत होते. १९७५ साली त्यांना एका सिक्रेट मिशन साठी RAW ने पाकिस्तानला पाठवले होते. त्यांचे मिशन पूर्ण झाल्यानंतर त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारून अहमद शाकीर असे नाव ठेवले आणि पाकिस्तानी सैन्यात घुसून त्यांच्या गुप्त बातम्या ते भारतात पाठवू लागले. १९७५ पासून ते १९८३ पर्यंत त्यांनी अनेक महत्वपूर्ण सूचना भारताला दिल्या. परंतु एक गुप्त बातमी भारतात पाठवताना ते शत्रूच्या हाती लागले. त्यानंतर २ वर्ष पाकिस्तानी सैन्याने त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले. पाकिस्तानी कोर्टाने सुद्धा त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. अखेर १९९९ मध्ये मुलतान येथील सेन्ट्रल जेल मध्ये हृदयरोगाने त्यांचे देहावसान झाले. भारताच्या सुरक्षेसाठी त्यांनी केलेले कार्य तसेच त्यांचे साहस बघून त्यांना ‘ब्लॅक टायगर’ हा किताब देऊन गौरवण्यात आले.
*RAW एक स्वतंत्रपणे काम करते*
रॉ खरं तर कुठलीही संस्था नाही. ती एक विंग म्हणून काम करते आणि त्यात काम करणारे लोक आपले रिपोर्ट सरळ पंतप्रधानांना पाठवतात. RAW च्या डायरेक्टरची निवड ही सेक्रेटरी (रिसर्च) द्वारे केली जाते. देशाच्या अंतर्गत सुरक्षेशी RAWचे कामकाज निगडीत असल्याने येथे गुप्तता पाळणे अनिवार्य आहे. म्हणूनच RTI द्वारे ह्याची माहिती काढण्याच्या प्रयत्न करणे व्यर्थ आहे.
RAW ने ह्या आधी Smiling Buddha ह्यासारख्या सिक्रेट मिशनवर काम केले आहे.
RAW चे काम फक्त देशासाठी गुप्त सूचना शोधून काढणे नसून शेजारी देशांशी सलोख्याचे संबंध कायम ठेवण्यास मोठा हातभार लावणे हे महत्वपूर्ण कार्य सुद्धा रॉ करते. १८ मे १९७४ रोजी जेव्हा भारताने राजस्थानच्या पोखरण येथे भारताची पहिली अणुचाचणी केली तेव्हा रॉ च्याच प्रसंगावधानामुळे त्या चाचणीस ‘Peaceful Nuclear Explosion’ असे म्हटले गेले होते.
*पाकिस्तानची कारस्थाने निकामी करण्यात रॉ ची महत्वपूर्ण भूमिका आहे.*
१९७१ मध्ये जे इंडियन एयरलाईन्सचे विमान हायजॅक झाले होते ते खरं तर रॉ चे एक मिशन होते ज्याचे नाव मिशन गंगा असे होते. ह्या मिशन गंगाचे उद्दिष्ट होते पाकिस्तानी विमानांना भारतीय सीमेच्या बाहेर ठेवणे. ह्याच्या फायदा असा झाला की युद्धात पाकिस्तानला हरवणे भारताला सोपे गेले.
आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे पाकिस्तानच्या Al-Fatahने पोसलेली एक दहशतवादी संघटना होती. त्या दहशतवादी संघटनेच्या लोकांना पाकिस्तानातच सगळे ट्रेनिंग दिले होते. ह्या दहशतवादी संघटनेचा पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यांच्या मुलाला म्हणजेच राजीव गांधींना मारण्याच्या प्लान होता. पण त्यांचा प्लान यशस्वी होण्या आधीच त्यांच्या म्होरक्याला म्हणजेच हाशीम कुरेशीला BSF वाल्यांनी अटक करून त्यांचा हा प्लान हाणून पाडला. त्यांचा हा प्लान यशस्वी न होऊ देण्यामागे रॉ ची अतिशय महत्वपूर्ण भूमिका होती.
अशा प्रकारे जेव्हापासून रॉ निर्माण झाली तेव्हापासून ती भारताच्या सुरक्षेमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे. रॉ जे एजंट त्यांचा जीव धोक्यात घालून देशाचे रक्षण करण्यात हातभार लावत असतात.
आपल्याला कल्पना पण येणार नाही अशा परिस्थिती मध्ये राहून ते त्यांचे काम करीत असतात. अशा ह्या सर्व अनाम वीरांना आमचा सॅल्यूट

0
Answer link
RAW म्हणजे रिसर्च अँड एनालिसिस विंग (Research and Analysis Wing). ही भारताची परकीय गुप्तचर संस्था आहे.
RAW (रॉ) ची माहिती:
- स्थापना: १९६८
- मुख्यालय: नवी दिल्ली
- हेतू: परदेशातील गुप्त माहिती गोळा करणे, दहशतवाद रोखणे आणि भारताच्या परराष्ट्र धोरणांना मदत करणे.
- RAW ही थेट पंतप्रधान कार्यालयाला (PMO) रिपोर्ट करते.
RAW ची कार्ये:
- शेजारील देशांमधील घडामोडींवर लक्ष ठेवणे.
- दहशतवादी कारवायांची माहिती मिळवणे.
- भारताच्या हिताचे रक्षण करणे.
- परदेशात भारताच्या गुप्त कारवाया करणे.
RAW विषयी अधिक माहिती:
- RAW चे पहिले संचालक रामेश्वर नाथ काओ होते.
- RAW ने अनेक महत्त्वाच्या कारवायांमध्ये भाग घेतला आहे, ज्यात १९७१ च्या बांग्लादेश मुक्ती युद्धाचा समावेश आहे.
तुम्ही RAW बद्दल अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता: