
गुप्तचर संस्था
रॉ (RAW) म्हणजेच रिसर्च अँड analysis विंगचे सध्याचे अध्यक्ष रवी सिन्हा आहेत.
त्यांनी 30 जून 2023 रोजी हे पद स्वीकारले.
भारत सरकारने रिसर्च अँड एनालिसिस विंग (Research and Analysis Wing - R&AW) नावाची गुप्तहेर संघटना स्थापन केली आहे.
R&AW ची माहिती:
- स्थापना: १९६८
- मुख्यालय: नवी दिल्ली
- हे भारताची प्राथमिक विदेशी गुप्तचर संस्था आहे.
- या संस्थेचे मुख्य काम परदेशातील गुप्त माहिती गोळा करणे, दहशतवाद रोखणे आणि भारताच्या परराष्ट्र धोरणांना मदत करणे आहे.
अधिक माहितीसाठी, आपण R&AW च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता: R&AW Official Website (जर उपलब्ध असेल तर)
प्रतीकांती (counter-revolutionary) कारवाया दडपून टाकण्यासाठी सोव्हिएत सरकारने चेका (Cheka) नावाची गुप्तचर संघटना स्थापन केली.
- चेका (Cheka): ही संघटना 1917 मध्ये स्थापन झाली आणि तिचे मुख्य उद्दिष्ट क्रांतीविरोधी कारवाया आणि sabotage (घातपात) थांबवणे होते.
*RAW म्हणजे RESEARCH AND ANALYSIS WING (R&AW or RAW)*
_भारतीय गुप्तहेर संस्था_
RAW ही देशासाठी काम करणारी, प्रसंगी जीवावर उदार होऊन देशाच्या सुरक्षेची काळजी घेणारी एक गुप्तहेर संघटना इतकेच आपल्याला माहित असतं. ते तेवढच माहित असणं आपल्या आणि देशाच्या सुरक्षेसाठी योग्य असतं. कारण कुठल्याही मिशनवर काम करताना प्रचंड गुप्तता पाळणे हे RAW च्या लोकांसाठी अत्यावश्यक असते. नव्हे, त्यांना तशा सूचनाच असतात. पण तुमच्या माझ्या सारख्या सामान्य भारतीय नागरिकाला RAW विषयी प्रचंड उत्सुकता असते. शिवाय आपल्या हिंदी चित्रपटांनी त्यांच्या विषयी चित्रपट निर्माण करून त्यांच्याविषयीची उत्सुकता अजून वाढवलेली असते. बेबी, एक था टायगर , एजंट विनोद, मद्रास कॅफे, डी-डे किंवा हल्लीच आलेल्या नाम शबाना ह्या चित्रपटांमध्ये आपण RAW एजंट कसे काम करतात, त्यांच्यावर काय जबाबदारी असते आणि त्यासाठी त्यांना काय काय दिव्यातून जावे लागते हे आपण बघितलेले आहे.
पण खरंच असे असते का? हे त्यांनाच ठावूक! पण आज आपण RAW विषयी काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या वाचल्यावर तुम्ही ह्या गुप्तहेर संघटनेला मनापासून सॅल्यूट कराल.
*RAW ची स्थापना इंडो-चायना युद्धानंतर झाली.*
१९६२ मध्ये चीनकडून युद्धात पराजयाचा सामना केल्यानंतर परत १९६५ मध्ये पाकिस्तानने भारतावर युद्धाचा प्रसंग आणला. ह्याने भारताच्या तेव्हाच्या ‘इंटेलिजन्स एजन्सी’चे पितळ उघडे पडले. त्या एजन्सीज खरंच किती कामाच्या आहेत हे तेव्हा सरकारच्या लक्षात आले. म्हणूनच ह्यावेळी अशा एका एजन्सीची गरज होती जी भारताची सुरक्षाव्यवस्था बळकट करू शकेल. म्हणूनच इंदिरा गांधी ह्यांच्या तत्कालीन सरकारने २१ सप्टेंबर १९६८ साली RAWची स्थापना केली. RAW चे पहिले डायरेक्टर म्हणून रामेश्वर नाथ काओ ह्यांच्याकडे जबाबदारी सुपूर्त करण्यात आली. त्यांनी त्यांच्या ९ वर्षांच्या कार्यकाळात सिक्कीमला भारताशी जोडून ठेवण्यात तसेच १९७१ च्या युद्धात पाकिस्तानला धूळ चारून बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्वाची भूमिका वठवली होती.
*RAW चा सर्वोत्तम एजंट ‘ब्लॅक टायगर’*
राजस्थानमधील श्री गंगानगर मध्ये ११ एप्रिल १९५२ रोजी रविंद्र कौशिक ह्यांचा जन्म झाला. ते एक थियेटर आर्टिस्ट होते. ते वेश बदलण्यात पटाईत होते. १९७५ साली त्यांना एका सिक्रेट मिशन साठी RAW ने पाकिस्तानला पाठवले होते. त्यांचे मिशन पूर्ण झाल्यानंतर त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारून अहमद शाकीर असे नाव ठेवले आणि पाकिस्तानी सैन्यात घुसून त्यांच्या गुप्त बातम्या ते भारतात पाठवू लागले. १९७५ पासून ते १९८३ पर्यंत त्यांनी अनेक महत्वपूर्ण सूचना भारताला दिल्या. परंतु एक गुप्त बातमी भारतात पाठवताना ते शत्रूच्या हाती लागले. त्यानंतर २ वर्ष पाकिस्तानी सैन्याने त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले. पाकिस्तानी कोर्टाने सुद्धा त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. अखेर १९९९ मध्ये मुलतान येथील सेन्ट्रल जेल मध्ये हृदयरोगाने त्यांचे देहावसान झाले. भारताच्या सुरक्षेसाठी त्यांनी केलेले कार्य तसेच त्यांचे साहस बघून त्यांना ‘ब्लॅक टायगर’ हा किताब देऊन गौरवण्यात आले.
*RAW एक स्वतंत्रपणे काम करते*
रॉ खरं तर कुठलीही संस्था नाही. ती एक विंग म्हणून काम करते आणि त्यात काम करणारे लोक आपले रिपोर्ट सरळ पंतप्रधानांना पाठवतात. RAW च्या डायरेक्टरची निवड ही सेक्रेटरी (रिसर्च) द्वारे केली जाते. देशाच्या अंतर्गत सुरक्षेशी RAWचे कामकाज निगडीत असल्याने येथे गुप्तता पाळणे अनिवार्य आहे. म्हणूनच RTI द्वारे ह्याची माहिती काढण्याच्या प्रयत्न करणे व्यर्थ आहे.
RAW ने ह्या आधी Smiling Buddha ह्यासारख्या सिक्रेट मिशनवर काम केले आहे.
RAW चे काम फक्त देशासाठी गुप्त सूचना शोधून काढणे नसून शेजारी देशांशी सलोख्याचे संबंध कायम ठेवण्यास मोठा हातभार लावणे हे महत्वपूर्ण कार्य सुद्धा रॉ करते. १८ मे १९७४ रोजी जेव्हा भारताने राजस्थानच्या पोखरण येथे भारताची पहिली अणुचाचणी केली तेव्हा रॉ च्याच प्रसंगावधानामुळे त्या चाचणीस ‘Peaceful Nuclear Explosion’ असे म्हटले गेले होते.
*पाकिस्तानची कारस्थाने निकामी करण्यात रॉ ची महत्वपूर्ण भूमिका आहे.*
१९७१ मध्ये जे इंडियन एयरलाईन्सचे विमान हायजॅक झाले होते ते खरं तर रॉ चे एक मिशन होते ज्याचे नाव मिशन गंगा असे होते. ह्या मिशन गंगाचे उद्दिष्ट होते पाकिस्तानी विमानांना भारतीय सीमेच्या बाहेर ठेवणे. ह्याच्या फायदा असा झाला की युद्धात पाकिस्तानला हरवणे भारताला सोपे गेले.
आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे पाकिस्तानच्या Al-Fatahने पोसलेली एक दहशतवादी संघटना होती. त्या दहशतवादी संघटनेच्या लोकांना पाकिस्तानातच सगळे ट्रेनिंग दिले होते. ह्या दहशतवादी संघटनेचा पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यांच्या मुलाला म्हणजेच राजीव गांधींना मारण्याच्या प्लान होता. पण त्यांचा प्लान यशस्वी होण्या आधीच त्यांच्या म्होरक्याला म्हणजेच हाशीम कुरेशीला BSF वाल्यांनी अटक करून त्यांचा हा प्लान हाणून पाडला. त्यांचा हा प्लान यशस्वी न होऊ देण्यामागे रॉ ची अतिशय महत्वपूर्ण भूमिका होती.
अशा प्रकारे जेव्हापासून रॉ निर्माण झाली तेव्हापासून ती भारताच्या सुरक्षेमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे. रॉ जे एजंट त्यांचा जीव धोक्यात घालून देशाचे रक्षण करण्यात हातभार लावत असतात.
आपल्याला कल्पना पण येणार नाही अशा परिस्थिती मध्ये राहून ते त्यांचे काम करीत असतात. अशा ह्या सर्व अनाम वीरांना आमचा सॅल्यूट
त्याबद्दल ची एक गोष्ट
*"महाराष्ट्राची हेरगिरी..!!!"*
जगातील दुस-या क्रमांकाचा पुरातन व्यवसाय म्हणजे 'हेरगिरी'
जवळपास सर्वच देशांकडे आज त्यांच्या गुप्तचर संघटना अथवा संस्था आहेत आणि त्याबद्दल लोकांना कुतूहल, आदर, दरारा, भीती, तिरस्कार अशा विविध भावना असतात.
गुप्तचर अथवा हेर हे अगदी पुरातन काळापासून अस्तित्वात आहेत. आर्य चाणक्यांच्या 'अर्थशास्त्र' मध्ये गुप्तहेरांचा उल्लेख सापडतो. याबाबत विस्तृत विवेचन चाणक्यांनी करून ठेवलेले आहे.
*छत्रपती शिवाजी महाराजांचा 'गनिमी कावा' यशस्वी होण्यामागे 'बहिर्जी नाईक' यांच्यासारख्या हुशार-चलाख हेरांचा सहभाग मोठा आहे.*
अमेरिका, रशिया आणि इस्राईल या देशांच्या सीआयए, केजीबी, मोसाद या गुप्तचर संस्थांचा जगभरात विशेष दबदबा आहे.
'बाजीराव जाधव' महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील पलूस गावचे, वयाच्या सोळाव्या वर्षीच भारतीय सैन्यदलात नोकरी स्वीकारून देशसेवेचे अखंड व्रत अव्याहतपणे जपणारे. सन १९९९ च्या कारगिलच्या लढाईत आपल्या सार्थ पराक्रमामुळे भारत सरकारने त्यांना 'शौर्य पदक' देऊन वरिष्ठ पदावर नेमणूक केलेली.
चौकस बुद्धी, विशेष धाडस, शौर्य यांच्या जीवावर बाजीराव हिंदुस्थानी गुप्तहेर खाते "रॉ" (RAW) मध्ये रुजू झाले.
"रॉ" : RAW-Reasearch & Analysis Wing, हिंदुस्थानी गुप्तहेर संघटना, ज्याची स्थापना, सन १९६२ (भारत-चीन) आणि सन १९६५ (भारत-पाकिस्थान) च्या युद्धा नंतर सैन्याची कामगिरी आणखी प्रबळ करण्याकरिता 'श्री. रामेश्वरनाथ काव' यांच्या नेतृत्वाखाली सप्टेंबर, १९६८ मध्ये करण्यात आली. म्हणजेच भारताच्या स्वातंत्र्यानंतर जवळ-जवळ २० वर्षांनंतर..!
अमेरिकेत.., 'जागतिक सुरक्षा परिषद' संपवून बाजीराव गाडीमधून विमानतळाकडे रवाना होत असताना, एका सुंदर परदेशी मुलीने त्यांना थांबविले.
तिला समोर पहाताच बाजीराव आनंदित झाले...,
बाजीरावांनी स्मित वदनाने त्यांना अभिवादन केले.
'नमस्ते..!
.....*जगातील सर्वात खतरनाक गुप्तहेर खात्याची उच्च अधिकारी 'साराह' बाजीरावांसमोर मोठया प्रसन्न चेह-याने दोन्ही हात जोडून उभी होती...!*
बाजीरावांचा तो भारतीय स्नेह स्वीकारत ती उत्तरली..
'नमस्ते..!!
'अरे, मी इथे गुप्तहेर म्हणून नव्हे तर माझ्या देशाची प्रतिनिधी म्हणून आले आहे. तुला पाहिले आणि राहवले नाही.. आणि तुला भेटायला आले.'
साराह आणि बाजीराव हे काही वर्षांपूर्वी इस्राईल येथे भेटले होते.
*साराह ही इस्राईल गुप्तहेर संघटना 'मोसाद' ची एक तरुण, तडफदार आणि तितकीच निडर अधिकारी आहे.*
*'मोसाद'... एक अशी गुप्तहेर संघटना, जिच्या हिटलिस्टवर जर एखाद्याचे नाव चढले तर प्रत्यक्ष देवसुद्धा त्याला वाचवू शकत नाही, असा दरारा...!!*
इस्राईल सारख्या तुटपुंज्या देशाची ही छोटीशी संघटना असामान्य कर्तृत्व, जगातील सर्वोत्तम, सर्वोत्कृष्ट गुप्तहेर संघटना कोणती, तर डोळे झाकून उत्तर येते 'मोसाद'.
'मोसाद' चा अर्थ साक्षात मृत्यू...! आपल्या देशाच्या शत्रूला शोधून, त्याला आपल्या देशात गुप्तपणे आणून त्याला शिक्षा देते. शिक्षा दिल्यानंतर सर्व जगाला कळते, की अमुक-अमुक व्यक्तीला शिक्षा दिली गेली. इतकी खतरनाक संघटना.
मोसादचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे 'कमालीची गुप्तता', याच गुप्ततेमुळे मोसादमध्ये दुस-या कुठल्याही गुप्तचर संघटनेला आपला हेर घुसवणं जमलेलं नाही, पण याच मोसादनं जगातील सर्वच गुप्तचर संघटनेमध्ये आपले हस्तक घुसवलेले आहेत. त्यामागचा हेतू एकच-माहिती मिळवणं.
*अशा गुप्तहेर संघटनेत दहा दिवसांच्या प्रशिक्षणासाठी बाजीराव इस्राईलला गेले होते, तेंव्हा सारहाची भेट झाली होती. तिच्याकडून खूप काही शिकून घेतले होते.*
आज इतक्या वर्षांनंतर सारहाने बाजीरावांना ओळखले.
विमानाला अजून २/३ तास अवकाश होता म्हणून दोघेही कॉफीशॉप मध्ये बोलत बसले.
'सारहा, तू इतक्या वर्षांनंतरही मला अचूक कसे काय ओळखलेस..?'
मला वाटले, ज्यांना सारे जग घाबरते अशा संघटनेची एक वरिष्ठ अधिकारी स्वतःच्याच अभिमानात(तो-यात) असेल; पण तू तर मला अजूनही लक्षात ठेवलेस..! It's really surprising...!!
किंचित स्मित हास्य करीत सारहा म्हणाली,
'अरे, असे नको बोलूस.., *आम्ही जगात सर्वांना विसरू, पण भारतीय लोकांना कधीच नाही.*
एक परदेशी मुलगी, आणि ती ही एका महाभयंकर अशा गुप्तहेर खात्याची अधिकारी...!! आपल्या भारताबद्दल तिच्या प्रति असलेले प्रेम-आस्था पाहून डोळे भरून आले.
सारहा पुढे बोलत होती;
'अरे, हे काहीच नाही. जरी आम्ही जगात सर्व श्रेष्ठ असलो तरी आमच्या गुप्तहेर खात्याचा आत्मा-शिकवण ही मूळची भारताचीच आहे, *आम्हाला तुमचा इतिहास, तुझ्या महाराष्ट्राचा इतिहास अगदी कोळून शिकवला जातो.
*आम्हाला शिवाजी राजे शिकवले जातात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आमच्या गुप्तहेर प्रणालीचा आत्मा आहे... बहिर्जी नाईक...!*
'बहिर्जी नाईक', नाव ऐकताच बाजीरावांच्या डोक्यात झिणझिण्या आल्या, अंगावरून सरसरून काटा आला.... डोळ्यांत अश्रू आपसूक तरळले.
बाजींकडे पहात सारहा म्हणाली,
'तुझ्या डोळ्यांत पाणी..? माझं काही चुकलं का...?'
नकारार्थी मान हलवत बाजीरावांनी डोळे पुसले आणि बोलू लागले,
*'नाही सारहा, तू ज्यांचे नाव घेतलेस त्या बहिर्जी नाईकांना, त्यांच्याच महाराष्ट्रात लहानाचा मोठा झालो तरी समजू शकलो नाही, मीच नाही माझ्या सारखे कित्येक आहेत ज्यांना बहिर्जी नाईक सोड पण आमचे राजे 'छत्रपती शिवाजी महाराजही' नीटसे माहिती नाहीत.*
आज त्यांचे नाव तुझ्या सारख्या विद्वान-निडर मुलीच्या तोंडून ऐकून मी पुरता खजील झालो आहे.
बाजीरावांचे ते बोलणे ऐकताच सारहा म्हणाली;
'अरे, तुम्ही खूप भाग्यवान आहात, आमची काम करण्याची पद्धत तुमच्या शिवाजी राजांसारखी अन् बहिर्जी नाईकांसारखीच आहे. आमच्या हर एक अधिका-यांच्या तोंडी तुमच्या शिवाजी राजांचा आणि बहिर्जी नाईकांचा सर्व इतिहास तोंडपाठ आहे, आणि तो आम्हाला ठेवावाच लागतो, तसेच आम्हाला शिकवले जाते. आमची training च तशी आहे.
सारहा बोलत होती आणि बाजीराव ऐकत होते.
बाजीराव सारहाचा निरोप घेऊन विमानात बसले, प्रवासात.., डोक्यात फक्त अन् फक्त एकच विचार..,शिवाजी राजे आणि बहिर्जी नाईक.
'किती मूर्ख आहोत आपण भारतीय, सा-या जगाला घाबरून सोडणारी 'मोसाद' ही मराठयांचा दैदीप्यमान इतिहास अभ्यासून मार्ग ठरवते आणि आम्ही रक्ताचे मराठे आज तुटपुंज्या देशाचा दहशतवाद गेली पन्नास वर्षे निमूटपणे सहन करतोय, आजही आमचे जवान हकनाक बळी जातायेत. बाजीरावांच्या डोक्यात विचारांचा डोंब उसळला होता.
आता त्यांना एकच ध्यास लागला होता शिवाजी राजांचा - या महाराष्ट्राचा बहिर्जी नाईक समजून घेण्याचा.
जय हिंद, जय महाराष्ट्र
जय शिवाजीराजे, जय शंभूराजे
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
जगात अनेक गुप्तचर संघटना आहेत, त्यापैकी काही प्रमुख संघटनांची माहिती खालीलप्रमाणे आहे:
-
सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी (CIA), अमेरिका:
ही अमेरिकेची एक प्रमुख गुप्तचर संस्था आहे. जी परदेशी सरकारे, व्यक्ती आणि संस्थांविषयी माहिती गोळा करून त्याचे विश्लेषण करते.
अधिकृत संकेतस्थळ: www.cia.gov
-
सिक्युरिटी इंटेलिजन्स सर्व्हिस (MI6), यूके:
ही ब्रिटनची गुप्तचर संस्था आहे. जी परदेशातील गुप्त कारवाया आणि हेरगिरी करते.
अधिकृत संकेतस्थळ: www.sis.gov.uk
-
रिसर्च अँड एनालिसिस विंग (RAW), भारत:
ही भारताची विदेशी गुप्तचर संस्था आहे. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी माहिती गोळा करणे आणि विश्लेषण करणे हे तिचे मुख्य काम आहे.
अधिकृत संकेतस्थळ: अधिकृत संकेतस्थळ उपलब्ध नाही.
-
मोसाद, इस्रायल:
ही इस्रायलची राष्ट्रीय गुप्तचर संस्था आहे. जगातील सर्वात प्रभावी गुप्तचर संस्थांपैकी एक म्हणून ओळखली जाते.
अधिकृत संकेतस्थळ: अधिकृत संकेतस्थळ उपलब्ध नाही.
-
फेडरल सिक्युरिटी सर्व्हिस (FSB), रशिया:
ही रशियाची मुख्य सुरक्षा संस्था आहे. काउंटर-इंटेलिजन्स, अंतर्गत सुरक्षा आणि सीमा सुरक्षा यांसारख्या कार्यांसाठी ही जबाबदार आहे.
अधिकृत संकेतस्थळ: www.fsb.ru
या व्यतिरिक्त, जगातील इतर अनेक देशांच्या स्वतःच्या गुप्तचर संस्था आहेत, ज्या आपापल्या देशांच्या सुरक्षेसाठी आणि हितासाठी कार्यरत असतात.