शिक्षण कॉम्पुटर कोर्स शिकवणी करियर मार्गदर्शन

10 वी पास झाल्यावर पुढे काय करावे समजत नाही, कोणते कोर्सेस उपलब्ध आहेत?

2 उत्तरे
2 answers

10 वी पास झाल्यावर पुढे काय करावे समजत नाही, कोणते कोर्सेस उपलब्ध आहेत?

2
दहावी हा आपल्या करिअरचा, व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा पाया मानला जातो. आजही आपण पारंपरिक शिक्षण पद्धतीचे पालन करीत असल्याने साधारण आठवी-नववीच्या वर्षातच पुढे काय याची दिशा काही प्रमाणात ठरलेली असते. अनेकदा अपेक्षेपेक्षा अधिक तर बहुतेकवेळा अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळतात अन् ठरलेल्या फॅकल्टीपेक्षा वेगळा मार्ग निवडायचा का असे प्रश्न उभे राहतात. काहीवेळा आधी निकाल लागू दे मग बघू अशीही मानसिकता असते.
  साधारणपणे दहावीचे निकाल लागले की आता पुढे काय असा प्रश्न येतोच.. कारण इतकेच की, स्पर्धेच्या जगात, व्यावसायिक, करिअरच्या प्रांगणात आपले पाऊल पडणार असते, हे पाऊल टाकताना आपली आवड-निवड अन् आपल्या पालकांची आर्थिक परिस्थिती याचा विचार होणे अपेक्षित आहे. दहावीनंतर कला, शास्त्र अन् वाणिज्य या मुख्य फॅकल्टीशिवाय चाकोरीबाहेरच्या अभ्यासक्रमांनाही विद्यार्थ्यांचा प्राधान्यक्रम राहतो. त्यात आयटीआय, कौशल्यवृद्धी करणारे तंत्रज्ञान अभ्यासक्रम आदींबाबतची माहितीही हवीच.
  ******* बहुपर्यायी वाणिज्य शाखा*******
वाणिज्य शाखा ही बहुपर्यायी मानली जाते. एकतर कॉमर्सची पदवी घेत असतानाच, सी.ए. बेसिक प्रोग्रॅम कोर्स करता येतात, कंपनी सेक्रेटरी, टॅक्स कन्सल्टंट, विधी शाखा, बँक परीक्षा, फायनान्स विभाग, आदी अनेक पर्याय या विभागात उपलब्ध आहेत. कॉमर्स पदवीनंतर विद्यार्थ्यांना एमबीए आणि संगणक विभागाकडेही वळता येते. सध्या एमबीएमध्ये एचआर, फायनान्स अन् मार्केटिंगकरिता उत्तम वातावरण आहे.

*******सायन्स शाखेतील आधुनिक संधी********

सायन्स शाखेची निवड आजही पारंपरिक मेडिकलकरिताच केली जाते. यातही एमबीबीएस हा महत्त्वाचा भाग असतो. १२ वी सायन्सनंतर मेडिकलमधल्याच अनेक फॅकल्टी विद्यार्थ्यांना उपलब्ध असतात, त्यापैकी डीएमएलटी, एमएलटी, एक्सरे टेक्निशियन, फार्मसी, रिसर्च आदी शाखांकडे विद्यार्थ्यांना जाता येते. याशिवाय बीएस्सी केल्यानंतर कृषी पदवीकडे वळता येतेच, शिवाय जीवशास्त्रातील आधुनिक वाटा आपल्याशा करता येतात.  १२ वी सायन्सनंतर विद्यार्थी विधी शाखेसह संगणक शाखेकडेही वळू शकतो. संगणक पदवी शिक्षणात सध्या अनेक विधिध संधी उपलब्ध आहेत.

********कला शाखेतील सुवर्णसंधी*********
कला शाखेतून भारतीय संगीत, गायन, वादन, अभिनय, साहित्य, विद्या, भाषा, या पारंपरिक क्षेत्राकडे विद्यार्थ्यांना करिअरच्या उत्तम अन् आंतरराष्ट्रीय संधी उपलब्ध आहेत. १२ वीनंतर स्पेशलायझेशन करता येते. या सर्व अभ्यासक्रमांना भारतासह इतर देशांतही मागणी आहे. याशिवाय १२ वीनंतर विद्यार्थी विधी शाखेकडे वळू शकतो, विधी अभ्यासक्रमानंतर विद्यार्थ्यांना अनेक पर्याय नोकरीच्या अन् करिअरच्या, मास्टरकीच्या, सरकारी तसेच खासगी नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. १२ वी कलेची पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना डीएड, बी.एड, बीपीएड आदी पर्यायही खुले आहेत. शिवाय कला शाखेतून पदवी घेतल्यानंतर विद्यार्थी एम.ए, एमफीएल, डॉक्टरकी आदींच्या माध्यामातून प्राध्यापकी करू शकतात. याशिवाय आर्ट्स स्कूलच्या माध्यमातून करिअर करीत आपल्यातील हस्तकौशल्याला वाव देण्याचाही एक पर्याय या विद्यार्थ्यांसमोर आहेच.

******&**कला शाखा****&&
गत काही वर्षात अडगळीत पडते की काय अशी वाटणारी कला शाखा गत दोन वर्षात पुन्हा तेजीत आहे. या शाखेत जाणा-यांकरीता मात्र आधी आपण काय करायचे ते निश्चित करुनच जावे. कला शाखेत प्रवेश घेणा-या विदयार्थ्यांना अगदी अकरावीपासूनच आपल्या कला गुणांना वावा देण्याची संधी मिळते, मग गॅदरींग, साहित्य मंडळ, निवडणूका, नाटय स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा अशा अनेक पातळीवर आपण आपल्यातील नेतृत्व गुण दाखवून देऊ शकतो.

@@@@@@@अनेक पर्याय यांची संधी @@@@
दहावीनंतर शास्त्र शाखेला प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांना एक चांगला पर्याय असतो, तो म्हणजे १२ वीत जरी तुलनेने कमी मार्कस पडले तरी त्यांना पुढील शिक्षणाकरिता कॉमर्स वा कला शाखेची निवड करता येते. कला शाखेतून भूगोल या विषयात पदवी घेतली तर विद्यार्थ्यांना एमएससीला प्रवेश घेता येतो. कॉमर्स शाखेतून करिअरच्या अनेक संधी मिळवता येतात. अशी संधी इतर शाखेत प्रवेश घेतल्यांनतर मिळत नाही.

@@@@@पोलीस भरती, सैन्य दलातील भरती @@@
१० आणि १२ वीनंतर विद्यार्थ्यांना पोलीस दलातील हवालदार या पदाकरिता भरती होता येते. याकरिता शारीरिक चाचणी परीक्षा, तोंडी अन् लेखी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक ठरते. तर सैन्यदलातील अनेक पदांकरिताही विद्यार्थी १०, १२ वीच्या मार्कावर अर्ज करू शकतात. १२ वीनंतर सैन्यदलातील र्मचट नेव्ही, एअर फोर्स असे पर्याय निवडता येतात. म्हणजेच पुढील शिक्षण अन् करिअर असे पर्याय आहेत.

😈काही धोके😈
दहावीनंतर डॉक्टर वा इंजिनीयर होण्याची स्वप्ने पाहणारे विद्यार्थी शक्यतो सायन्सला अ‍ॅडमिशन घेतात. पण ११,१२ वीच्या वर्गात सायन्सचे विषय अनुक्रमे, भौतिक, रसायन शास्त्र अन् गणित या ग्रुपमध्ये त्यांची गुणोत्तर टक्केवारी काहीशी खालावते, तसेच सीईटी अन् नीट परीक्षेतही गुणांकन खालावते, साहजिकच १२ वीच्या मार्कावर परिणाम होतो अन् अपेक्षित ट्रॅकला प्रवेश मिळत नाही, अशावेळी मग मुले १० वीच्या मार्कावर डिप्लोमाला प्रवेश अर्ज भरतात, या सर्वामध्ये दोन वर्षे वाया जातात, काहीवेळा विद्यार्थी ठरलेला ट्रॅक सोडून कॉमर्स वा कला शाखेकडे वळतात, मात्र मुळातच ही त्यांची आवड नसल्याने ते या शिक्षणात रमू शकत नाहीत, त्यामुळे या निर्णयाचा फटका आयुष्यातल्या गंभीर घटनांत बदलणारा ठरतो. त्यामुळे एकतर आपल्याला काय अन् कितपत झेपेल याचा विचार करूनच विद्यार्थी आणि पालकांनी साईट निवडावी. समजा अपयश वा कमी मार्कस पडले तर कोणता पर्याय निवडायचा ते आधीच ठरवावे, म्हणजे नैराश्य येणार नाही.
उत्तर लिहिले · 28/3/2018
कर्म · 210095
0
10वी पास झाल्यावर तुमच्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. खाली काही प्रमुख कोर्सेस आणि क्षेत्रांची माहिती दिली आहे:

1. विज्ञान (Science):

  • PCM: फिजिक्स (Physics), केमिस्ट्री (Chemistry), गणित (Mathematics).

  • PCB: फिजिक्स (Physics), केमिस्ट्री (Chemistry), बायोलॉजी (Biology).

  • संधी: इंजीनियरिंग, मेडिकल, रिसर्च (Research) क्षेत्रात करिअर करू शकता.

2. वाणिज्य (Commerce):

  • विषय: अकाउंटिंग (Accounting), अर्थशास्त्र (Economics), व्यवसाय अभ्यास (Business Studies).

  • संधी: चार्टर्ड अकाउंटंट (Chartered Accountant), बँकिंग (Banking), फायनान्स (Finance) क्षेत्रात करिअर करू शकता.

3. कला (Arts):

  • विषय: इतिहास (History), भूगोल (Geography), राज्यशास्त्र (Political Science), साहित्य (Literature).

  • संधी: पत्रकारिता (Journalism), शिक्षण (Teaching), सामाजिक कार्य (Social Work) क्षेत्रात करिअर करू शकता.

4. ITI (Industrial Training Institute):

  • ट्रेड्स: इलेक्ट्रिशियन (Electrician), फिटर (Fitter), वेल्डर (Welder).

  • संधी: तांत्रिक (Technical) क्षेत्रात लवकर नोकरी मिळू शकते.

5. डिप्लोमा कोर्सेस (Diploma Courses):

  • विविध शाखा: इंजीनियरिंग (Engineering), हॉस्पिटॅलिटी (Hospitality), फॅशन डिझायनिंग (Fashion Designing).

  • संधी: विशिष्ट क्षेत्रात कौशल्ये मिळवून नोकरी करता येते.

6. पॅरामेडिकल कोर्सेस (Paramedical Courses):

  • कोर्सेस: डीएमएलटी (DMLT), एक्स-रे टेक्निशियन (X-ray Technician).

  • संधी: मेडिकल क्षेत्रात नोकरीच्या संधी.

7. कृषी डिप्लोमा (Agriculture Diploma):

  • विषय: शेती आणि संबंधित तंत्रज्ञान.

  • संधी: कृषी क्षेत्रात नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता.

8. भाषा आणि परदेशी शिक्षण (Language and Foreign Education):

  • कोर्सेस: विविध भाषांचे कोर्स (इंग्रजी, जर्मन, फ्रेंच).

  • संधी: भाषांतरकार (Translator),interpreter म्हणून काम करू शकता किंवा परदेशात शिक्षण घेऊ शकता.

9. सैनिकी शाळा (Military School):

  • संधी: देशसेवा करण्याची संधी.

तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणिMarks नुसार योग्य कोर्स निवडू शकता. All the best!

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 5220

Related Questions

नोकरी करून सरळ सेवेची तयारी कशी करावी?
गेल्या दहा वर्षांपासून मी विद्युत अभियंता पदाकरिता तयारी करत आहे, मात्र मला यश मिळत नाही, तरी उपाय सुचवावा. ऑफलाइन, ऑनलाइन, सेल्फ स्टडी, लायब्ररी सर्व पद्धतीने अभ्यास केला आहे.
MPSC साठी कॉम्प्युटर कोर्स करणे अनिवार्य आहे का?
Station master banne ke liye kaunsi notebook achhi hai? Main preparation chalu kar raha hu, meri req.... hai sir?
ते कोणत्या वयोगटाशी अथवा व्यवसायाशी निगडित आहेत ते लिहा?
12 वी सायन्स नंतर करिअर कश्यात करावे?
माझं मेकॅनिकल इंजिनीअरिंग डिग्री पूर्ण झाली आहे. पण मी आयटी क्षेत्रात काम करण्यास इच्छुक आहे. पण मी आता गोंधळून गेलो आहे की आयटी इंडस्ट्रीत जावं की मेकॅनिकलमध्येच करिअर करू, त्यामुळे कृपया मला योग्य मार्गदर्शन मिळावे?