राजकारण पंचायत समिती

पंचायत समिती म्हणजे काय माहिती मिळेल का?

2 उत्तरे
2 answers

पंचायत समिती म्हणजे काय माहिती मिळेल का?

2
पंचायत समिती हा जिल्हा परिषद व ग्रामपंचायत यांच्या मधील दुवा होय.

महाराष्ट्रात ७५,००० ते १ लाख लोकसंख्येसाठी व १०० ते १२५ खेड्यांसाठी एक विकास गट समितीने पंचायत समितीला जादा अधिकार दिले आहेत. महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ कलम ५६ अन्वये प्रत्येक गटासाठी एक पंचायत समिती असते.

रचना

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती जिल्हा परिषद गटासाठी दोन पंचायत समिती सभासद गुप्त मतदान पद्धतीद्वारे निवडले जातात. पंचायत समितीला गटास ‘गण’ असे म्हणतात. १७,५०० लोकसंख्येमागे एक पंचायत समिती सदसयाची निवड मतदार करतात.

विकासगटामध्ये (ब्लॉक) निवडून येणाऱ्या जागांपैकी ३३% जागा महिलांसाठी आरक्षित अहेत.

अनुसूचित जाती व जमातींच्या लोकांच्या प्रमाणावर सदस्य पाठविले जातात .

इतर मागासवर्गीय जनतेसाठी २७% जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत .

कार्यकाल

पंचायत समितीच्या कार्यकाल ‘पाच’ वर्षांचा आहे व ती बरखास्त करण्याचा अधिकारी ‘राज्यशासनास’ आहे. त्या नंतर ‘सहा’ महिन्यांच्या आत निवडणूक घ्यावी लागते.

सरपंच समिती

पंचायत समिती गटामधील एकूण सरपंचांच्या १/५ किंवा १५ सरपंच पैकी जी संख्या अधिक असेल तिची सरपंच समिती बनते . पंचायत समितीच्या उपसभापती हा या समितीचा पदसिद्ध सचिव म्हणून विस्तार अधिकारी काम पाहतो .

पंचायत समित्यांची रचना

प्रत्येक पंचायत समितीमध्ये कलम ५८ आणि त्या बाबतचे नियम यांत अंतर्भूत असलेल्या तरतूदींनुसार प्रत्येक निर्वाचक गुणामधून प्रत्येक एक याप्रमाणे प्रत्यक्ष निवडनिणुकीद्वारे निवडलेल्या सदस्यांचा समावेश असेल परंतू पंचायत समीतीच्या प्रादेशिक क्षेत्राची लोकसंख्या आणि अशा पंचायत समितीमधील निवडणुकीद्वारे भरावयाच्या जागांची संख्या यामधील गुणोत्तर व्यवहार्य असेल तेथवर संपुर्ण राज्यामध्ये सारखेच असेल.

सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पोटकलम (१) खालील येणाऱ्या सदस्यांच्या संख्येच्या दोन:तृतीयांश किंवा ज्याहून अधिक सदस्यांची निवड झाल्यानंतर राज्य शासन विहीत करील अशा वेळी व अशा रितीने राज्य निवडणूक आयोग या सदस्यांची नावे त्यांच्या कायम पत्यासह प्रसिद्ध करील आणि अशा प्रसिद्धीनंतर पंचायत समितीची रीतसर रचना झाली असल्याचे मानण्यात येईल. दोनतृतीयांश सदस्यांची संख्या ठरवितांना अपूर्णांक दुर्लक्षित करण्यात येईल. परंतू अशा प्रसिद्धीमुळे

कोणत्याही गटातील निवडणुकीचे काम पूर्ण करण्यास आणि निवडून आलेल्या सदस्यांची नाव व त्यांचे कायम पत्ते जसजसे उपलब्ध होतील त्याचप्रमाणे राज्य निवडणूक आयोगाकडून तशाच रितीने प्रसिद्ध करण्यास प्रतिबंध होतो किंवा

या अधिनियमाखालील पंचायत समितीच्या सदस्यांच्या पदाधिवर त्याचा परिणाम हातो असे मानले जाणार नाही.

गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा पदसिध्द सचिव असेल.ा

सभापती

पंचायत समितीचा कार्यकारी प्रमुख ‘सभापती’ असतो. पंचायत समितीतील सदस्य यांची निवड करतात. यांच्या पदाचा कालावधी २.५ वर्षांचा आहे. सभापती त्याचा राजीनामा जि. प. अध्यक्षांकडे देतात व उपसभापती सभापतींकडे पाठवतात. सभापती हे पद आरक्षित आहे.

कार्ये

पंचायत समितीची बैठक बोलावून तिचे अध्यक्षपद भूषविणे.

गटविकास अधिकाऱ्यांवर देखरेख व नियंत्रण ठेवणे.

समितीच्या ठरावांची व निर्णयांची अंमलबजावणी करणे

जिल्हा परिषद व शासन यांच्या आदेशानुसार काम पार पाडणे

विकास योजनांवर नियंत्रण ठेवणे.

पंचायत समितीच्या सभा बोलावील त्या सभांचे सध्यक्षपद धारण करील व त्यांचे कामकाज चालवील.

पंचायत समितीचे अभिलेख पाहू शकेल.

अंमलबजावणीच्या किंवा (पंचायत समितीचे ठराव आणि निर्णय कार्यान्वत करण्याचे काम धरून) प्रशासनाच्या बाबतीत आणि पंचायत समितीचे हिशेब व अभिलेख यांच्या बाबतीत गटात काम कणणाऱ्या जिल्हा परिषदेच्या किंवा जिल्हा परिषदेखालील अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या करतीचे पर्यवेक्षण करील व त्यांवर नियंत्रण ठेवील.

गट अनुदानातून हाती घ्यावयाची कामे व विकास परियोजना यांच्या बाबतीत मालमत्ता संपादन करण्यास किंवा तिची विक्री अथवा तिचे हस्तांतरण करण्यास मंजूरी देण्यात संबंधात राज्य शासनाकडून विनिर्दिष्ट करण्यात येतील अशा अधिकारांचा वापर करील.

पंचायत समितीच्या सभापतीस

पंचायत समितीकडे कामावर असलेल्या कोणत्याही अधिका-याकडून किंवा कर्मचा-याकडून कोणतीही माहिती, विवरण, विवरणपत्र हिशेब किंवा अहवाल मागवता येईल.

गटातील जिल्हा परिषदेच्या ताब्यात असलेल्या कोणत्याही स्थावर मालमत्तेत किंवा गटातील जिल्हा परिषदेच्या किंवा पंचायत समितीच्या नियंत्रणाखालील व व्यवस्थापनाखालील कोणत्याही परिसंस्थेत किंवा जिल्हा परिषदेने अशा पंचायत समितीने अथवा तिच्या निदेशानुसार हाती घेतलेले कोणतेही काम किंवा विकास परियोजना गटात चालू असेल त्या ठिकाणी प्रवेश करता येईल व त्यांचे निरीक्षण करता येईल.

अविश्वास ठराव

पंचायत समितीच्या एकूण सदस्यांपैकी १/४ सदस्यांनी जिल्हाधिकार्यांकडे अविश्वास ठराव मांडल्यास जिल्हाधिकारी सात दिवसांच्या आत विशेष बैठक बोलवितो. जर अविश्वास ठराव २/३ मतांनी मंजूर झाला तर सभापती व उपसभापतींना राजीनामा द्यावा लागतो .

उत्तर लिहिले · 22/3/2018
कर्म · 26630
0

पंचायत समिती:

पंचायत समिती हे भारतातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेतील एक महत्त्वाचा स्तर आहे. हे पंचायत राज व्यवस्थेचा भाग आहे, जी जमीनी स्तरावर लोकांचा सहभाग सुनिश्चित करते.


रचना:

पंचायत समितीमध्ये নির্বাচিত सदस्य असतात. त्यांची निवड थेट निवडणुकीद्वारे होते. याशिवाय, काही सदस्य पदसिद्ध असतात, जसे की त्या क्षेत्रातील जिल्हा परिषदेचे सदस्य.


कार्य आणि अधिकार:

पंचायत समिती अनेक कार्ये करते, जसे की:

  • विकास योजना: आपल्या क्षेत्राच्या विकासासाठी योजना तयार करणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे.
  • सरकारी योजनांची अंमलबजावणी: सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे.
  • निधीचे व्यवस्थापन: विकास कामांसाठी आलेला निधी योग्य प्रकारे वापरणे.
  • ग्रामपंचायतींना मार्गदर्शन: पंचायत समिती आपल्या अंतर्गत असलेल्या ग्रामपंचायतींना मार्गदर्शन करते आणि त्यांच्या कामात मदत करते.

महत्व:

पंचायत समिती ग्रामीण भागाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावते. यामुळे लोकांना स्थानिक पातळीवर निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळते आणि विकास कामे अधिक प्रभावीपणे होतात.


अधिक माहितीसाठी:

तुम्ही अधिक माहितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वेबसाइटला भेट देऊ शकता: ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन


उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 1080

Related Questions

लोकसभेचा कार्यकाल किती असतो?
भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्य कोणत्या संविधान संशोधनाद्वारे समाविष्ट करण्यात आले आहेत?
राज्य धोरणांची निर्देशक तत्त्वे सरकारवर बंधनकारक आहेत का?
भारतीय संविधान कोणाला समर्पित आहे?
राज्यघटनेत किती भाग आहेत?
हे बेलचे चूक लक्षात आणून देणारे युवकांचे कोणते उद्गार परिषदेत आले आहेत?
गोवा राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत?