नोकरी सरकारी नोकरी

BDO ची कामे कोणती?

2 उत्तरे
2 answers

BDO ची कामे कोणती?

4
पंचायत समितीचा सचिव गटविकास अधिकारी (BDO) असतो.

गटविकास अधिकार्‍याची निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होते तर त्याची नेमणूक महाराष्ट्र शासन करते.

गटविकास अधिकारी हा वर्ग 1 व वर्ग 2 दर्जाचा अधिकारी असतो.

गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा प्रशासकीय अधिकारी  असतो.

गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा कार्यकारी अधिकारी असतो.

गटविकास अधिकार्‍यावर नजिकचे नियंत्रण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍याचे असते.

गटविकास अधिकारी हा पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव असतो.

पंचायत समितीचे अंदाजपत्रक गटविकास अधिकारी तयार करतो.

पंचायत समितीस मिळणार्‍या अनुदानातील रकमा काढण्याचे व त्यांचे वाटप करण्याचे अधिकार गटविकास अधिकार्‍याला आहेत.

पंचायत समितीच्या वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचार्‍यांच्या रजा मंजूर करण्याचा अधिकार गटविकास अधिकार्‍याला आहेत.

पंचायत समितीचा खर्च गटविकास अधिकार्‍याच्या संमतीने करावा लागतो.

पंचायत समितीचा अहवाल गटविकास अधिकारी सी.ई.ओ.कडे पाठवीत असतो.

पंचायत समितीच्या कार्याची यशस्वीता गटविकास अधिकार्‍यावर अवलंबून असते.

गटविकास अधिकार्‍याला शिक्षा करण्याचा अधिकार विभागीय आयुक्तास असतो.

पंचायत समिती व जिल्हा परिषद यामधील दुवा म्हणून गटविकास अधिकारी काम पाहतो.

राज्यशासन व पंचायत समिती यामधील दुवा म्हणून गटविकास अधिकारी काम पाहतो.

गटविकास अधिकारी हे पद प्रत्येक  पंचायत  समिती स्तरावर  आहे . काही वर्षांपूर्वी पंचायत समिती च्या आकारानुसार ( लोकसंख्येनुसार ) गटविकास अधिकारी गट ब पंचायत समिती आणि गट विकास अधिकारी गट अ ( उच्च श्रेणी ) असे दोन पदे होती . परंतु त्यामध्ये बदल करुन प्रत्येक पंचायत समिती ला उच्च श्रेणी गटविकास अधिकारी
( म्हणजेच उपमुख्य अधिकारी समकक्ष ) हे पद कार्यकारी प्रमुख व सचिव असे आहे .व प्रत्येक पंचायत समितीला एक सहाय्यक गटविकास अधिकारी हे पद निर्माण केले गेले आहे.

या पदाबद्दल सकारत्मक बाबी–

* या पदावर काम करताना तुमचे व्यक्तीमत्व कसे आहे त्या गोष्टीचा खूप फरक पडतो , जर तुम्ही ग्रामीण भागातून व बहिर्मुख व्यक्तीमत्त्वाचे , बोलके , लोकांमध्ये जाऊन काम करण्याची इच्छा बाळगणारे असाल तर तुम्हाला हे पद  उत्कृष्ट राहील

   *गटविकास अधि या  पदावर राहून शिक्षण , आरोग्य , महिला व बाल विकास, कृषी , सिंचन , पशुसंवर्धन इ तळागाळाला जाऊन काम करू शकता.

*मानव संसाधन विकासाचे  सर्व अंगे तुमच्या आखत्यारित येऊ शकतात.

* तालुका स्तरावर प्रचंड मोठया  प्रमाणात मनुष्यबळ ( कर्मचारी वर्ग ) यांच्या माध्यमातून लोक सहभागातून विकास कामे घडविता येतात .

*कागदी कामात गुंतून राहण्यापेक्षा लोकांच्या  आयुष्यात थेट बदल घडविण्याची संधी या पदाच्या सेवेतून मिळते

*  चांगले काम केल्यास गरज, ग्रामीण , आदिवासी लोकांचा आशीर्वाद, व काम केल्याचे समाधान गरजूच्या चेहऱ्याकडे पाहिल्यास मिळते

शासकीय योजना राबविताना स्वतःचे नवोपक्रम , कल्पना यांना पूर्ण वाव मिळतो .
  या पदाबद्दलच्या नकारात्मक बाबी

* प्रमोशनच्या  संधी खूप कमी आहेत आतापर्यत फकत 4 उपमुख्य कार्य अधिकारी यांना Performance base वर IAS नामांकन  मिळाले  आहे .

* क्वचित भागात लोकप्रतिनिधीच्या अति हस्तक्षेप त्रासदायक वाटतो .( हे त्रासदायक वाटणे आपल्या  स्वतःच्या व्यक्तिमत्वावर अंवलबून )

*  या पदावर असतात वैविध्य कमी वाटते ( तोच तो पणा जास्त ) इतर पदावर जसे D. C हे नगरविकास , MIDC ,MSEB इ अनेक विभागात पदावर जाऊ शकतात पण Dy. CEO/BDO हे पंचायत समिती, जिल्हा  परिषद , काही प्रशिक्षण संस्था, आयुकत कार्यालय व मंत्रालय इ ठिकाणी पदावर जाऊ शकतात.
उत्तर लिहिले · 22/3/2018
कर्म · 210095
0
मी तुम्हाला BDO च्या कामांची माहिती देतो. BDO म्हणजे गटविकास अधिकारी (Block Development Officer). ते पंचायत समिती स्तरावर काम करतात आणि त्यांची പ്രധാന कामे खालीलप्रमाणे आहेत:
  • विकास योजनांची अंमलबजावणी: BDO हे शासनाच्या विविध विकास योजनांची अंमलबजावणी करतात. यामध्ये ग्रामीण भागातील लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे, गरिबी निर्मूलन करणे, आणि पायाभूत सुविधा निर्माण करणे इत्यादी कामे शामिल आहेत.
  • पंचायत समितीचे कामकाज: पंचायत समितीच्या बैठका घेणे, विकास कामांवर चर्चा करणे आणि निर्णय घेणे, इत्यादी कामे BDO च्या देखरेखेखाली होतात.
  • ग्रामपंचायतींना मार्गदर्शन: BDO ग्रामपंचायतींना त्यांच्या विकास योजनांसाठी मार्गदर्शन करतात आणि त्यांना मदत करतात.
  • सरकारी योजनांचा प्रचार: BDO सरकारी योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवतात आणि लोकांना त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करतात.
  • अहवाल सादर करणे: BDO नियमितपणे शासनाला त्यांच्या कामाचा अहवाल सादर करतात.

अधिक माहितीसाठी, तुम्ही खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 1080

Related Questions

माझे वय ३५ आहे, मला सरकारी नोकरी करता येईल का?
सरकारी नोकरी किती वयापर्यंत लागू शकते?
पोलीस भरतीसाठी लागणारी ग्रामपंचायत विषयी माहिती काय?
तलाठी किंवा ग्रामसेवक पदासाठी अपंग वयोमर्यादा आणि शिक्षण किती असावे?
कोतवाल भरती पदाचा प्रतीक्षा यादीचा कालावधी किती असतो?
तलाठी या पदासाठी अपंग वयोमर्यादा काय आहे?
माझे नाव करण आहे. मला तहसीलदार नोकरी लागेल का?