जात इतिहास

राजपुताना भामटा राजपूत का म्हणतात?

2 उत्तरे
2 answers

राजपुताना भामटा राजपूत का म्हणतात?

5
1857 च्या पहिल्या स्वातंत्र संग्रामापासून भामटा राजपूत या शब्दाची उत्पत्ती झाली असे म्हणता येईल..1857 चा लढा हा प्रामुख्याने राजे आणि ब्रिटिश यांच्यात होता आणि त्यात राजेंचे सैनिक हे मुख्यतः क्षत्रिय राजपूत होते त्यांच्या पराक्रमाच्या बळावरच राज्यकर्ते लढ्यात आघाडीवर राहू शकले पण त्यांच्यातील आपापसातिल मतभेदांनी ते लढा हरले .पण विषय इथेच समाप्त होत नाही.त्या लढ्याला प्रतीउत्तर म्हणून ब्रिटिशांनी 1871 साली क्रिमिनल act आणून लढ्यात सामील झालेल्या लढव्या जातींचा बिमोड करायच ठरवले व 198 जातिंना कायमस्वरूपी *"गुन्हेगारी जात"*म्हणून घोषित करून त्यांचा स्वाभिमाना ला ठेच पोहचवली.त्यात महाराष्ट्रातील 12 ते 13 जातिंचा समावेश होता परिणामी त्यावेळेस च्या *राजपूतांचा* स्वाभिमान दूखावला आणि त्यांचा उठाव वाढला या मुळे ब्रिटिशांपुढील संकट अजून वाढले .त्यावर उपाय म्हणून परत ब्रिटिशांनी गुन्हेगारी जात म्हणजेच राजपूतांच समायोजणाच्या नावाखाली *1924 चा सेटलमेंट act* काढून समायोजण केंद्र स्थापण्यात आले व तेथे समायोजणाच्या नावाखाली शोषण करण्यात आले याच मुळे राजपूत स्वतः ला गुन्हेगार म्हणून नोंदणी पासून लांब राहिले..

*भामटा शब्दाचा प्रथम उच्चार*
1936 साली तत्कालीन मध्य प्रदेश सरकार ने शिवी म्हणून भामटा हा उल्लेख केला.

*भामटा राजपूत विषयाचा स्वातंत्र्योत्तर प्रवास*

भामटा राजपूत समाजास तत्कालीन गवर्नमेंट ऑफ बॉम्बे ने 1 November 1950 रोजी OBC चा दर्जा देऊन त्यांचे मागासवर्गीय म्हणून समायोजण केल त्यानंतर महाराष्ट्र सरकार ने 21 November 1961 रोजी राजपूत समाजास कायमस्वरूपी NT( A) म्हणून 14 जातींच्या वर्गात सामील करून आरक्षण बहाल केले त्या विषयी GR निघाला 1987 साली त्यासाठी 1924 नंतर गुन्हा नोंद अनिवार्य करून आडकाठी देखील आणली त्याचमुळे राजपूत समाज आरक्षण पासून लांब राहिला यावर उपाय म्हणून 1991 साली परत सरकार ने स्पष्ट केले कि 1924 च्या गुन्हेगारी नोंदीची आवश्यकता नाही.पण इतर NT समाजांचा विरोधमुळे तो GR 1992 साली थांबवण्यात आला..
यानंतर राजपूत समाजाच्या या विषयावर अभ्यास असलेल्या सज्जन सिंग पवार व त्यांच्या टीम ने सतत पाठपुरावा करून 1996 मधे 1991 चा GR परत आमलात आणून जात प्रमाण पत्र वाटप करण्यास सुरुवात करून नाशिक विभागात 1997 मध्ये जावदा येथील विजयसिंग सीसोदीया यांच्या मुलीस प्रथम जात प्रमाण पत्र देण्यात आले..
उत्तर लिहिले · 22/3/2018
कर्म · 210095
0

राजपुताना भामटा राजपूत का म्हणतात ह्याबद्दल अनेक मतं आणि कथा आहेत. "भामटा" ह्या शब्दाचा अर्थ 'एखाद्या गोष्टीचा शोध घेणारा' किंवा 'प्रवासा करणारा' असा होतो. त्यामुळे, काही लोकांच्या मते, राजपुताना भामटा राजपूत म्हणजे:

  • शोधक वृत्ती: हे राजपूत नेहमी नवीन गोष्टी शोधत असतात आणि आपल्या राज्याचा विस्तार करत असतात.
  • प्रवासी जीवन: ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करत राहिले, त्यामुळे त्यांना भामटा म्हटले गेले.
  • लवचिक स्वभाव: परिस्थितीनुसार स्वतःला बदलण्याची त्यांची क्षमता होती.

याव्यतिरिक्त, काही इतिहासकारांचे असेही मत आहे की "भामटा" हा शब्द त्यांच्या विशिष्ट जीवनशैली किंवा सामाजिक स्थितीमुळे रूढ झाला असावा.

अधिक माहितीसाठी, आपण इतिहास विषयक पुस्तके आणि विश्वसनीय संकेतस्थळे पाहू शकता.

टीप: 'भामटा' हा शब्द काहीवेळा नकारात्मक अर्थाने वापरला जातो, त्यामुळे ह्या शब्दाचा वापरcontext आणि हेतू लक्षात घेऊन करणे महत्त्वाचे आहे.

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 1660

Related Questions

जातीची रचना आणि प्रकार लिहा?
जातिव्यवस्थेत व्यक्तीचा दर्जा कोणता असतो?
अनुसूचित जातीचा दाखला काढायला 1950 च्या आधीचा कोणता पुरावा जोडावा आणि तो पुरावा कुठे मिळेल? बाकी सर्व कागदपत्रे तयार आहेत.
शेती जीवनातील प्रमुख समस्या कोणत्या? जात संस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती?
जाती संस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती?
महादेव कोळी जात मराठवाडा मध्ये आहे का?
महादेव कोळी जात मराठा आहे का?