औषधे आणि आरोग्य आजार रोग आरोग्य

हत्तीरोगाची लक्षणे कोणती आहेत?

2 उत्तरे
2 answers

हत्तीरोगाची लक्षणे कोणती आहेत?

6
*हत्तीरोगाची माहिती :-
हत्तीरोग ( लिम्फॅटिर फायलेरियासिस (एलएफ)) हा डासांपासून मनुष्याला होणारा रोग आहे. या मध्ये रुग्णांचे पाय (अवयव)ˌ वृषण हे आकाराने जाड होतात व रुग्णास हालाचाल करणेही अवघड होवून बसते. हत्तीरोग हा शरीर विद्रूप करून अकार्यक्षम करणारा रोग असून सामान्यतः तो लहानपणात होतो. हत्तीरोग हा “क्युलेक्स विचकि फॅसिएटस’ नावाचा अळ्या ज्यांना मायक्रोफिलेरिई असे म्हणतात त्या अळ्यांमुळे होतो. या अळ्या डासांच्या चाव्याद्वारे पसरतात. निरोगी व्यक्तीस डास चावल्यामुळे संक्रमण होते.
हा रोग झाल्यानंतर त्यावर कोणताही परिणामकारक उपाय नाही. हत्तीरोग होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून औषधांचे एकदाच सेवन करणे आवश्‍यक आहे.इ.स. १९५५ पासून भारत देशात राष्ट्रीय स्तरांवर हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रम प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालये, शासकीय संस्था वगैरेंमधून राबविण्यात येतो. भारतात हा रोग प्रामुख्याने उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, ओरिसा, तमिळनाडू, केरळ, मध्यप्रदेश , असाम, कर्नाटक इत्यादी राज्यात आढळतो.
५ ऑगस्ट हा हत्तीरोग दिन म्हणून पाळण्यात येतो. महाराष्ट्रात वर्धा येथे हत्तीरोग संशोधन केंद्र आहे.


*हत्तीपाय रोगाची तशी किरकोळ लक्षणे दिसून येताता. ती खालीलप्रमाणे

थंडी वाजून येणे.

ताप येणे.

पाय (अवयव) दुखून येणे.

वृषण आकराने जाड होणे.

मनुष्याचे दोन्ही पाय, हत्तीच्या पायांसारखे जाड व मोठे होतात आणि हालचाल करण्यास अवघड होणे, इत्यादी लक्षणे सांगता येतात.

*उपाय:-
       थंडी ताप किंवा इतर लक्षणे दिसून आल्याबरोबर. लवकरच लवकर रक्त तपासणी करून हत्तीरोग चाचणी करून घ्यावी. रक्त तपासणीत हत्तीरोग दूषित रुग्ण आढळल्यास त्याला सहा दिवस उपचारानंतर एक दिवसाच्या खंडाने (गॅप देऊन) बारा दिवस डी.ई.सी. गोळ्या देतात. या गोळ्यांच्या सेवनाने रिॲक्शन येऊ शकते. उपचार कालावधी हा जास्त असल्यामुळे हत्तीरोग रुग्णाने डॉक्टरांना भेटून त्यांच्या सल्ल्यानेच संपूर्ण उपचार घेणे आवश्यक आहे. तेव्हाच या रोगांचे नियंत्रण होऊ शकते.
उत्तर लिहिले · 19/3/2018
कर्म · 45560
0
हत्तीरोगाची लक्षणे खालीलप्रमाणे आहेत:

हत्तीरोगाची लक्षणे:

  • लसिका (Lymph) वाहिन्यांमध्ये सूज: हत्तीरोगामध्ये, परजीवी जंतूंमुळे लसिका वाहिन्यांमध्ये सूज येते.
  • त्वचेमध्ये जाडसरपणा:affected भागातील त्वचा जाड आणि खडबडीत होते.
  • पाय आणि जननेंद्रियांची सूज: बहुतेक वेळा पाय आणि जननेंद्रियांना सूज येते.
  • ताप आणि थंडी: काही रुग्णांना ताप आणि थंडीचा अनुभव येतो.
  • त्वचेवर व्रण: त्वचेवर फोड आणि व्रण येऊ शकतात.
  • वेदना:affected भागामध्ये वेदना जाणवतात.

इतर लक्षणे:

  • शरीराच्या इतर भागांमध्ये सूज
  • त्वचेचा रंग बदलणे
  • चालण्यास त्रास होणे

जर तुम्हाला वरील लक्षणे दिसत असतील, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

अधिक माहितीसाठी, तुम्ही खालील संकेतस्थळाला भेट देऊ शकता: राष्ट्रीय वेक्टरborne रोग नियंत्रण कार्यक्रम

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 1680

Related Questions

'Soar Throat' आणि 'Strep Throat' यात नेमका काय फरक आहे?
कोरोना केव्हापासून सुरू झाला होता?
कोरोनामुळे ज्या लोकांचा मृत्यू झाला अशा लोकांचे पोस्टमार्टम का करण्यात आले नाही?
कोरोनामुळे ज्या लोकांचा मृत्यू झाला त्यांचे पोस्टमार्टम का करण्यात आले नाही?
कोरोनामुळे ज्या लोकांचे जीव घेणे अशा लोकांच्या पोस्टमार्टम का केला गेला नाही?
कोरोनामुळे ज्या लोकांचे जीव केले गेले तर अशा लोकांचे लोकांचे पोस्टमार्टम का केले गेले नाहीत त्याबद्दल आपले मत लिहा?
कोरोनामुळे ज्या लोकांची जीव गेलेत अशा लोकांचे पोस्टमार्टम का केल्या गेले नाही त्याबद्दल आपले मत लिहा?