बँक लिखाण

महाराष्ट्र बँक पासबुक हरवल्यामुळे नवीन पासबुककरिता अर्ज कसा लिहावा?

3 उत्तरे
3 answers

महाराष्ट्र बँक पासबुक हरवल्यामुळे नवीन पासबुककरिता अर्ज कसा लिहावा?

18
साध्या कागदावर डुप्लीकेट पासबुकासाठी अर्ज करावा. पहिल्या हरविलेल्या पासबुकासाठी दंड १० रुपये व नंतर पुन्हा हरवल्यास प्रत्येक वेळेस दंड २० रुपये आकारावा. (प्रत्येक बँकेत ठराविक रक्कम वेगवेगळी असू शकते..)
जर पासबुक खराब झाले, फाटले किंवा हरवले तर बॅंक रु. 50/- चा चार्ज घेऊन ठेवीदाराला डुप्‍लीकेट पासबुक जारी करेल. ठेवीदाराच्‍या नियंत्रणाबाहेरील परिस्थितीमुळे पासबुक खराब झाल्‍याचे, फाटल्‍याचे किंवा हरवल्‍याचे सिद्ध झाल्‍यास बॅंकेच्‍या अखत्‍यारीत हा चार्ज माफ केला जाऊ शकतो.पासबुक हरवल्‍याची सूचना लगेच बॅंकेला द्यावी. हरवलेल्‍या पासबुकाच्‍या जागी डुप्‍लीकेट पासबुक जारी करताना ठेवीदाराला योग्‍य वचन पत्र सही करून बॅंकेला द्यावे लागेल....
लेखी स्वरुपात अर्ज करताना... (मी तुम्हाला एक उदाहरण करून देते..)

प्रति,
बँक ऑफ़ महाराष्ट्र,
(बँकेचा पत्ता),
दिनांक:-__/__/__.

                विषय :- खात्यातील पासबुक हरविण्याबाबत...

माननीय महोदय,
                मी (तुमचे संपूर्ण नाव) माझे (तुमचे अकाउंट नंबर)
माझ्या खात्यातील पासबुक माझ्याकडून हरविले आहे. मला ते न सापडल्यामुळे आणि इतर कुणी अनधिकृत व्यक्तीच्या ताब्यात गेल्यास चुकीचा वापर होऊ नये म्हणून मला डुप्लीकेट पासबुक बनवून द्यावे ही आपणांस विनंती.
                    धन्यवाद...!
                                                           (तुमचे नाव)
                                                           (तुमची स्वाक्षरी)
                                                         (तुमचा मोबाइल नंबर)
उत्तर लिहिले · 19/3/2018
कर्म · 458560
3
तुम्ही अर्ज हाताने लिहू शकता किवा टाइपही करू शकता.एका कोऱ्या कागदावर तुमच्या उजव्या हाताला कागदाच्या वरच्या बाजूला तुमचे नाव,तुमचा पत्ता,सदर बँकेतील खातेक्रमांक व त्याखाली ज्या दिवशी अर्ज बँकेत देणार ती तारीख लिहा.त्यानंतर तुमच्या डाव्या हाताला कागदाच्या वरच्या बाजूपासून थोडे खाली बँक मँनेजर, बँकेचा पत्ता लिहा.त्याखाली कागदाच्या मध्यावर अर्जाचा विषय ( नविन पासबुक पाहीजे) असे लिहून त्याखाली "मी खाली सही करणारा......... आपणास अशी विनंती करतो की माझ्या (वर नमूद केलेल्या ) खात्याचे ओरीजिनल पासबुक हरवले असल्याने मला नविन पासबुक देण्याची क्रुपा करावी". त्याखाली तुमच्या हाताला तुमची सही करा. अर्जाची एक झेराँक्स काढून त्यावर बँकेतील संबंधित व्यक्तीची सही घ्या (अर्ज मिळाला म्हणून) व ओरिजनल बँकेत द्या.नविन पासबुक केव्हा मिळणार विचारा व त्या तारखेला पासबुक ताब्यात घ्या.
उत्तर लिहिले · 19/3/2018
कर्म · 91065
0
तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) मध्ये पासबुक हरवल्याने नवीन पासबुकसाठी अर्ज कसा लिहायचा यासाठी एक नमूना येथे देत आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार यात बदल करू शकता.

दिनांक: [अर्ज सादर करण्याची तारीख]

प्रति,

शाखा व्यवस्थापक,

बँक ऑफ महाराष्ट्र,

[Cabincrew शाखाचे नाव व पत्ता]

विषय: नवीन पासबुक मिळणे बाबत.

महोदय,

मी, [तुमचे नाव], आपल्या बँकेचा खातेदार आहे. माझ्या खात्याची माहिती खालीलप्रमाणे आहे:

  • खाते क्रमांक: [तुमचा खाते क्रमांक]
  • नाव: [तुमचे पूर्ण नाव]
  • पत्ता: [ तुमचा पत्ता]
  • मोबाइल नंबर: [तुमचा मोबाइल नंबर]

माझे पासबुक [हरवले / चोरीला गेले] आहे. त्यामुळे मला माझ्या खात्यावरील व्यवहारांची माहिती मिळवण्यासाठी नवीन पासबुकची आवश्यकता आहे.

म्हणून, कृपया मला नवीन पासबुक जारी करावे, ही नम्र विनंती.

आपला विश्वासू,

[तुमचे नाव]

[सही]

सोबत जोडावयाची कागदपत्रे:

  • आधार कार्ड / ओळखपत्र
  • पॅन कार्ड (असल्यास)
  • पत्ता पुरावा (आधार कार्ड, वीज बिल, इ.)
  • एफआयआरची प्रत (चोरीला गेल्यास)

टीप: अर्ज सादर करण्यापूर्वी बँकेच्या नियमांनुसार शुल्क भरण्याची आवश्यकता असल्यास, ते भरून पावती अर्जासोबत जोडावी.

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 960

Related Questions

जागतिक बँकेचे अद्ययावत अहवाल काय आहेत?
बँक सामंजस्य निवेदन तयार करण्याची गरज आणि महत्त्व काय आहे?
बँक सामंजस्य निवेदन कसे तयार करायचे?
बँक सामंजस्य ननवेदन तयार करण्याची गरज आनि महत्तत्तव स्पष्ट करा.?
बॅंक सामंजस्य निवेदन तयार करण्याची गरज आणि महत्व स्पष्ट करा?
बँक सामंजस्य निवेदन तयार करण्याची गरज आणि महत्त्व स्पष्ट करा?
बैंक म्हणजे काय?