सौंदर्य त्वचा निगा

माझ्या चेहऱ्यावर काळे डाग आहेत, पिंपल्समुळे तर कोणती क्रीम वापरावी?

5 उत्तरे
5 answers

माझ्या चेहऱ्यावर काळे डाग आहेत, पिंपल्समुळे तर कोणती क्रीम वापरावी?

10
काळे डाग दूर करण्यासाठी फायदेशीर घरगुती उपाय

चेहऱ्यावर आलेले काळे डाग तुमच्या सुंदरते मध्ये अडसर असतात. ज्यामुळे तुमचा चेहरा खराब दिसू शकतो. ज्याला कोणत्याही केमिकलचा वापर न करता दूर करणे शक्य आहे. काही सोप्प्या घरगुती उपायाच्या मदतीने हे सहज शक्य आहे.

त्वचेवर मेलेनिनच्या अतिरिक्त श्रावामुळे चेहऱ्यावर डार्क स्पॉट, पैच आणि काळे डाग होऊ शकतात. मेलेनिनचे अतिरिक्त श्राव होण्या मागे सूर्याची प्रखर किरणे, हार्मोनचे असंतुलन, गर्भावस्था, काही औषधे, विटामिन, झोपेची कमी आणि अत्यंत जास्त तणाव यासारखी कारणे असू शकतात. चेहऱ्याला चमकदार बनवण्यासाठी आणि काळे डाग किंवा डार्क पैच सहज कमी करण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय करू शकता. चला पाहूयात असेच काही घरगुती उपाय ज्यांच्या मदतीने तुम्ही काळे डाग कमी करू शकता.

√लिंबाचा रस
लिंबाच्या रसा मध्ये विटामिन सी असते जे काळे डाग आणि डार्क पैच कमी करण्यास मदत करतात. हे त्वचेला चमकदार सुध्दा करतात. एका भांड्यामध्ये लिंबाचा रस घ्या. त्यामध्ये कापूस भिजवून त्याला आपल्या चेहऱ्यावर 30 मिनिट सोडून द्या. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा चांगला धुवून घ्या. जर तुमची स्कीन जास्त सेन्सिटीव आहे तर लिंबाच्या रसा सोबत मध किंवा गुलाब जल मिक्स करा.

√कच्चे बटाटे
कच्च्या बटाट्य मध्ये नेचुरल ब्लिचिंग प्रोपर्तीज असतात जे डाग, घाव आणि काळ्या खुणांना घालवण्यास मदत करतात. बटाट्याचे स्टार्च पिगमेंटेशन कमी करण्यास मदत करते, तसे यामध्ये असणारे एंजाइम्स त्वचेचे आरोग्य चांगले ठेवते. बटाट्याचे तुकडे चेहऱ्यावर काळे डाग असलेल्या भागावर चोळावे यामुळे काळे डाग कमी होतील. http://aaosairam.blogspot.com​
√ताक ( Buttermilk )
काळ्या डागा पासून सुटका करण्यासाठी ताक सुध्दा अतिशय फायदेशीर आहे. लिंबाच्या रसा प्रमाणे हे काळ्या डागांना फिक्के करण्यास मदत करते. यामध्ये लैक्तीक एसिड असते जे हळूहळू त्वचेचे पीगमेंटेशन कमी करते आणि त्वचेचा रंग गोरा करते. ताक आणि टमाटर रस दोन्ही मिक्स करून चेहऱ्यावर लावावे. कमीत कमी 15 मिनिट हा लेप असाच चेहऱ्यावर लावून ठेवा आणि नंतर पाण्याने चांगले धुवून काढा. या उपायाने तुमच्या चेहऱ्यावरचे काळे डाग कमी होतील.

√एलोवेरा
एलोवेरा मध्ये हिलिंग प्रॉपर्टीज असतात. याच्या जेल मध्ये पॉलीसैकेराइड असते जे काळ्या डागांना कमी करते आणि खुणांना बरे करते. हे त्वचेच्या सेल्स विकसित करण्यास मदत करते. एलोवेरा जेल डाग असलेल्या जागी लावा आणि 15-20 तसेच राहू द्या. नंतर थंड पाण्याने चांगले धुवून घ्या.

√हळद
हळद स्कीन लाइटेनिंग एजेंट सारखे काम करते. जे चेहऱ्यावरचे काळे डाग कमी करते. हे फ्री-रेडीकल्स रिपेयर करते आणि त्वचेच्या पिगमेंटेशनला कमी करते. हळद सूर्य किरणांमुळे झालेले डाग आणि रिंकल्स बरे करण्यासाठी प्रभावी आहे. हळद पावडर दुध किंवा लिंबाच्या रसामध्ये मिक्स करून काळ्या डागावर लावावे. हे मिश्रण अर्धा तास चेहऱ्यावर तसेच ठेवा आणि नंतर धुवून टाका. यामुळे काळे डाग कमी होतात.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
╔══╗       संकलन: नितीन जाधव  
║██║        स्रोत:- सौंदर्य उपचार
╚══╝ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ *+९१८६५५४०७६१९*
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █
              🥀 ᵃᵃºˢᵃi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ
आपण हि व या अधिक माहिती खालील संकेत स्थळाला भेट देऊन पाहु शकता
      *http://aaosairam.blogspot.com​*
*नोंद-आपण या माहितीचा वापर कोणत्याही आरोग्य समस्येचे निदान किंवा उपचार अंमलात आणण्यापूर्वी कृपया आपल्या तज्ज्ञांचा व डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.*

    *!!हे ईश्वरा सर्वांच आरोग्य चांगलं ठेव!!​​*
उत्तर लिहिले · 7/9/2018
कर्म · 569265
2
घरगुती उपाय सांगायचा झाला तर लिंबू कापून ५ मिनिटांपर्यंत चेहऱ्यावर घासा व थोड्या वेळाने चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या. असं दररोज करा, काही दिवसात फरक जाणवेल.
उत्तर लिहिले · 12/3/2018
कर्म · 15545
0
चेहऱ्यावर पिंपल्समुळे (Pimples) काळे डाग (Black spots) असल्यास, खालीलपैकी कोणती क्रीम (Cream) वापरावी ते पाहूया:
  1. रेटिनॉइड क्रीम (Retinoid Cream):

    रेटिनॉइड क्रीममध्ये व्हिटॅमिन ए (Vitamin A) असते. त्यामुळे त्वचेवरील काळे डाग कमी होतात आणि त्वचा सुधारते.

    उदाहरण: रेटिन-ए (Retin-A), अॅडापेलीन (Adapalene).


  2. हायड्रोक्विनोन क्रीम (Hydroquinone Cream):

    हायड्रोक्विनोन क्रीम त्वचेचा रंग उजळण्यास मदत करते. यामुळे काळे डाग कमी होतात.

    टीप: डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वापरा.


  3. अ‍ॅझेलेइक ऍसिड क्रीम (Azelaic Acid Cream):

    अ‍ॅझेलेइक ऍसिड क्रीम पिंपल्स आणि डाग कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.


  4. व्हिटॅमिन सी सीरम (Vitamin C Serum):

    व्हिटॅमिन सी सीरममध्ये एंटीऑक्सीडेंट्स (Antioxidants) असतात, जे त्वचेला चमकदार बनवतात आणि डाग कमी करतात.


  5. अल्फा हायड्रॉक्सी ऍसिड (AHA) क्रीम (Alpha Hydroxy Acid (AHA) Cream):

    AHA क्रीम त्वचेवरील मृत पेशी (Dead skin cells) काढण्यास मदत करते, ज्यामुळे डाग कमी होतात.

    उदाहरण: ग्लायकोलिक ऍसिड (Glycolic acid) आणि लैक्टिक ऍसिड (Lactic acid).


इतर उपाय:
  • सनस्क्रीन (Sunscreen): घराबाहेर जाताना चेहऱ्याला सनस्क्रीन लावा, ज्यामुळे डाग अधिक गडद होणार नाहीत.
  • पुरेशी झोप घ्या: दररोज रात्री 7-8 तास झोप घ्या.
  • तणाव कमी करा: योगा (Yoga) आणि ध्यान (Meditation) करा.
  • पानी भरपूर प्या: दिवसभर पुरेसे पाणी प्या.

डॉक्टरांचा सल्ला:
कोणतेही क्रीम वापरण्यापूर्वी त्वचा रोग तज्ज्ञांचा (Dermatologist) सल्ला घेणे आवश्यक आहे. ते तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार योग्य क्रीम निवडण्यास मदत करतील.
उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 5220

Related Questions

घाम व मळ साफ करण्यासाठी उपाय?
मी व्हिटॅमिन सी सिरम वापरू की कोजिक ऍसिड?
माझी त्वचा खूप उन्हामुळे काळी पडली आहे?
Glycolic acid, arbutin & kojic acid Diplamate Cream चे फायदे आणि नुकसान काय आहेत?
Glycolic acid, arbutin & kojic acid Diplamate Cream चे फायदे काय आहेत?
हाताच्या कोपऱ्याचा काळेपणा घालवण्यासाठी काय करावे?
माझा रंग काळा आहे आणि माझ्या चेहऱ्यावर खूप डाग पण आहेत. माझा काळा रंग असल्यामुळे मला माझ्यामध्ये खूप कमीपणा वाटतो, तर त्यासाठी मी काय करू जेणेकरून माझा रंग उजळेल?