व्यक्तिमत्व लेखक साहित्य

आरती प्रभू हे कोणाचे टोपण नाव आहे?

2 उत्तरे
2 answers

आरती प्रभू हे कोणाचे टोपण नाव आहे?

8
आरती प्रभु हे चिंतामणी त्र्यंबक खानोलकर या मराठी लेखक व कविचे नाव आहे...

त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती...

चिंतामणी त्र्यंबक खानोलकर ऊर्फ आरती प्रभू (मार्च ८, इ.स. १९३०- एप्रिल २६, इ.स. १९७६) हे एक मराठी कवी व लेखक होते. कोकणातल्या कोण्या एका गावी त्यांच्या मातोश्री, खानावळ चालवीत. तेथे गल्ल्यावर बसून खानोलकर कविता करत. त्यांच्या खानावळीत जेवायला येणार्‍या काही मंडळींनी त्यांच्या कवितेचे काही कागद चोरून त्या कविता आरती प्रभू या नावाने 'मौज'मधे छापण्यास पाठवून दिल्या. 'मौज'च्या अंकात आपल्या कविता प्रकाशित झाल्याचे बघून खानोलकर बावरून गेले. त्या अवस्थेतच त्यांनी खालील कविता लिहिली.


ये रे घना
ये रे घना
न्हाउं घाल
माझ्या मना ...

खानोलकरांना भीती होती की अचानक मिळालेल्या या प्रसिद्धीमुळे आपली प्रतिभा, आपल्याला मिळालेली शब्दांची ही देणगी आपल्या हातून निसटून तर जाणार नाही ना. पण तसे काही झाले नाही. त्यांच्या प्रतिभेचा सूर्य त्यांच्या अकाली निधनापर्यंत मराठी साहित्यसॄष्टीत तळपतच राहिला.

कुडाळला असताना चि.त्र्यं.खानोलकरांनी एक तीन अंकी नाटक लिहिले होते. त्याचा प्रयोगही कुडाळला झाला होता, पण ते लिखित नाटक कुठेतरी गहाळ झाले. त्यानंतर खानोलकरांनी ’एक शून्य बाजीराव’ लिहिले, ते ‘रंगायन‘ने विल्सन कॉलेजच्या रंगमंचावर सादर केले आणि प्रेक्षकांना आवडले. नाटकाच्या दिग्दर्शिका विजया मेहता होत्या.
उत्तर लिहिले · 8/3/2018
कर्म · 458560
0

आरती प्रभू हे चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांचे टोपणनाव आहे.

चिंतामण त्र्यंबक खानोलकर हे एक प्रसिद्ध मराठी कवी, लेखक आणि नाटककार होते.

त्यांनी आरती प्रभू या नावाने अनेक कविता व लेखन केले.

अधिक माहितीसाठी आपण खालील लिंकला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 1040

Related Questions

मोगल आणि मराठे या प्रसिद्ध ग्रंथाचे कर्ते कोण होते?
लेखकाने वर्णन केलेली दोन फुले?
डोळे ही कथा कोणी लिहिली आहे?
रश्मी बंसल यांच्या लेखाचे नाव काय?
लेखकाला आनंद झाला कारण?
लेखकाचा दृष्टीकोन म्हणजे काय?
पाच स्त्री कादंबरीकार व त्यांच्या कादंबऱ्यांची नावे लिहा?