मराठी भाषा व्याकरण नाम

नामाचे प्रकार सोदाहरण स्पष्ट करा.

2 उत्तरे
2 answers

नामाचे प्रकार सोदाहरण स्पष्ट करा.

11

प्रत्यक्षात असणाऱ्या किवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किवा त्यांच्या गुणधर्माला जी नावे दिली जातात त्या नावाला मराठी व्याकरणात नाम असे मानतात.

या द्वारे शक्यतो कोणत्याही वस्तू , पदार्थ, प्राणी यांचा आपणास बोध होतो अथवा माहिती मिळते

उदा :- पेन, टेबल, पुस्तक, वही, हवा, पहाड, मुलगा,मुलगी, राम, हरी,चेंडू , इत्यादी.

 

नाम चे प्रकार

१ सामान्य नाम - common noun

२ विशेष नाम- proper noun

३ भाव वाचक नाम - abstract noun

४ धातू साधित नाम

 

१ सामान्य नाम (materail noun) :- एकाचा जातीच्या पदार्थाच्या समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला जे नाम दिले जाते त्याला सामान्य नाम असे मानतात.

उदा :- मुलगी, पक्षी, फुले, वकील, शाळा,माणूस, दगड, डोंगर,

 

टीप:- ज्या नामाच्या येण्याने फक्त जातीचा बोध होतो त्याला सामान्य नाम मानतात. सामान्य नाम हे नेणी जाती वाचक असते.

 

सामान्य नामाचे उपप्रकार

 

अ) पदार्थ वाचक सामान्य नाम:- काही पदार्थ हे संखे शिवाय इतर परिणामांनी मोजले जातात त्यांना पदार्थ वाचाक सामान्य नाम असे मानतात.

उदा :- साखर, सोने, लोखंड, ज्वारी, दुध, तेल,चांदी,पितळ, इत्यादी

 

ब) समूह वाचक सामान्य नाम (collectine noun):- समुदायाला जी नावे दिली जातात त्यांना समूह्वाचक सामान्य नाम म्हणतात.

उदा:- सभा, गट, थवा, कळप, तांडा, जमाव, ढीग, सैन्य, पुंज, घोळका, गर्दी, गुच्छा, इत्यादी

 

२ विशेष नाम ( proper noun ) :- ज्या नामाने एका विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा, किवा वस्तू चा बोध होता त्या नामास विशेष नाम म्हणतात.

उदा :- हिमालय, गौतम, आनंद, कर्ण, महासागर, मराठी, शिवाजी, आंबा, फणस, शेवंती, इत्यादी

 

टीप :- १ विशेष नाम हे नेहमी व्यक्ती वाचक असते.

२ विशेष नामाचे कधीच अनेक वाचन होत नाही.

 

३ भाववाचक नाम (abstract noun) :- ज्या नामाने गुण, धर्म, किवा भाव यांचा बोध होतो त्यास भाव वाचक नाम म्हणतात.

उदा:- धैर्य, चांगुलपणा, पाटीलकी, शत्रुत्व, गोडी, गुलामगिरी इत्यादी

 

टीप :- सामान्य नामे, विशेष नाये यांना य, त्व, पणा, ई, ता, वा, गिरी, आई, या सारखे प्रत्यय लावून भाववाचक नामे तयार करता येतात.

 

शहाणा - शहाणपणा

श्रीमंत - श्रीमंती

गुंड - गुंडगिरी

शांती - शांतता

मित्र - मित्रत्व

गोड - गोडवा

गोड - गोडी

 

४ धातू साधित नाम:- धातू पासून तयार झालेल्या नामाल धातुसाधित नाम म्हणतात

उदा :- १ हत्तीचे चालणे मंद असते.

२ घेणाऱ्याने घेत जावे.

३ पोहणे हा उत्त व्यायाम आहे.

या तिन्ही वाक्यात चालणे, घेणाऱ्याने , पोहणे हि धातुसाधित नामे आहेत...


स्रोत:

फेसबुक


उत्तर लिहिले · 8/3/2018
कर्म · 61495
0

नामाचे प्रकार (Types of Noun)

नाम म्हणजे वस्तूला, व्यक्तीला, स्थळाला किंवा कल्पनेला दिलेले नाव. नामाचे मुख्य तीन प्रकार आहेत:

  1. सामान्य नाम (Common Noun): एकाच जातीच्या सर्व वस्तूंना किंवा प्राणिमात्रांना जे नाव दिले जाते, त्याला सामान्य नाम म्हणतात.

    उदाहरण:

    • मुलगा, मुलगी, शहर, नदी, पर्वत, पुस्तक
  2. विशेष नाम (Proper Noun): ज्या नामाने एखाद्या विशिष्ट वस्तूचा, व्यक्तीचा किंवा स्थळाचा बोध होतो, त्याला विशेष नाम म्हणतात.

    उदाहरण:

    • राम, सीता, मुंबई, गंगा, हिमालय, रामायण
  3. भाववाचक नाम (Abstract Noun): ज्या नामाने गुण, धर्म, किंवा भावना यांचा बोध होतो, त्याला भाववाचक नाम म्हणतात. हे नाम डोळ्यांनी दिसत नाही, पण त्याची जाणीव होते.

    उदाहरण:

    • नम्रता, धैर्य, आनंद, दुःख, कीर्ती, सौंदर्य

इतर प्रकार (Other Types):

  1. समूहवाचक नाम (Collective Noun): जेव्हा एखादे नाव एखाद्या समूहाला दर्शवते, तेव्हा त्याला समूहवाचक नाम म्हणतात.

    उदाहरण:

    • संघ, गट, समिती, सैन्य, मंडळ
  2. पदार्थवाचक नाम (Material Noun): ज्या नामाने धातू, द्रव्य किंवा पदार्थाचा बोध होतो, त्याला पदार्थवाचक नाम म्हणतात.

    उदाहरण:

    • सोने, चांदी, पाणी, दूध, लोखंड
उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 1780

Related Questions

नामाचे प्रकार कसे शिकवाल?
नामाचे मुख्य प्रकार सांगून प्रत्येकाची व्याख्या सांगा आणि उदाहरणे लिहा.
खालीलपैकी समूहवाचक नाम ओळखा: स्पर्धा, गडी, संघ, खेळ?
खालीलपैकी समूहवाचक नाम कोणते?
खालीलपैकी समूहवाचक नाम कोणते आहे? 1 स्पर्धा 2 गडी 3 संघ 4 खेळ?
नामाचे तीन प्रकार?
नामाचे उपप्रकार किती?