शिवाजी महाराज इतिहास

छत्रपती शिवाजी महाराज यांची लहानपणापासून पूर्ण माहिती मिळेल का?

3 उत्तरे
3 answers

छत्रपती शिवाजी महाराज यांची लहानपणापासून पूर्ण माहिती मिळेल का?

15
मराठा साम्राज्याचे संस्थापक, प्रथम छत्रपती



छत्रपती शिवाजीराजे भोसले (१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८०) हे इ.स. १८१८ पर्यंत टिकलेल्या आणि आपल्या परमोत्कर्षाच्या अवस्थेत भारतीय उपखंडाचा बराचसा भाग व्यापणाऱ्या मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. जनता त्यांना शिवराय, शिवाजी महाराज किंवा राजे नावाने संबोधते. भोसले कुळातील या सुपुत्राने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध ऐतिहासिक संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले. रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजीने उभे केले आणि इ.स. १६७४ मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला. उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता, प्रजाहितदक्ष कल्याणकारी राजा म्हणून जागतिक आणि विशेषत्वाने मराठी इतिहासात त्यांना अत्युच्च स्थान आहे.

शिवाजी शहाजी भोसलेछत्रपतीछत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे लंडन इथल्या ब्रिटिश संग्रहालयातील अस्सल चित्रमराठा साम्राज्यअधिकारकाळजून ६, १६७४ ते एप्रिल ३, १६८०राज्याभिषेकजून ६, १६७४राज्यव्याप्तीपश्चिम महाराष्ट्र, कोकण,
सह्याद्री डॊंगररांगांपासूननागपूरपर्यंत
आणि
उत्तर महाराष्ट्र, खानदेशापासून
दक्षिण भारतात तंजावरपर्यंतराजधानीरायगड किल्लापूर्ण नावशिवाजीराजे शहाजीराजे भोसलेजन्मफेब्रुवारी १९, १६३०शिवनेरी किल्ला, पुणेमृत्यूएप्रिल ३, १६८०रायगडउत्तराधिकारीछत्रपती संभाजीराजे भोसलेवडीलशहाजीराजे भोसलेआईजिजाबाईपत्नीसईबाई,
सोयराबाई,
पुतळाबाई,
काशीबाई,
सकवारबाई
लक्ष्मीबाई
सगणाबाई
गुणवंतीबाईराजघराणेभोसलेराजब्रीदवाक्य'प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।'चलनहोन, शिवराई, (सुवर्ण होन, रुप्य होन??)


महाराष्ट्रात, छत्रपती शिवाजी हे शिवाजीराजा, शिवाजीराजे, शिवबा, शिवबाराजे, शिव, शिवराय, शिवा अशा अनेक नावांनी ओळखले जातात. शिवाजीचा जन्मदिवस हा ‘शिवजयंती’ म्हणून साजरा होतो. शिवाजी आणि त्यांचा पुत्र संभाजी यांचा संयुक्त उल्लेख शिवशंभू असा होतो. शिवाजीच्या कारकीर्दीला शिवकाल असेही म्हणतात.

शिस्तबद्ध लष्कर व सुघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर शिवाजीने एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. भूगोल, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले. आपल्या वडिलांकडून मिळालेल्या २,००० सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर शिवाजी महाराजांनी उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक किल्लेही त्यांनी उभारले. राज्यकारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. व्हियतनामच्या युद्धात शिवकालिन गनिमी काव्याचा आदर्श आणि अभ्यास करून अमेरिका सारख्या सैन्याला जेरीस आणले.

जन्म



शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ, शिवनेरी

पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर इ.स. १६३० मध्ये शिवाजीचा जन्म झाला. इतिहासाच्या अभ्यासकांमध्ये शिवाजीची नेमकी जन्मतारीख हा एकेकाळी मतभेदांचा मुद्दा होता. तो वाद नंतर मिटला. महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार. १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली.[१] त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार दरवर्षी १९ फेब्रुवारी या दिवशी सुटी जाहीर करते. इतर संभाव्य तारखांमध्ये ६ एप्रिल १६२७((वैशाख शुद्ध तृतीया) ही एक जन्मतारीख मानली जात होती. त्यानुसार, महाराष्ट्राबाहेरचे अनेक लोक शिवजयंतीचा दिवस म्हणून वैशाख शुद्ध तृतीया हा दिवस, आणि महाराष्ट्रातले काही लोक मराठी पंचांगाप्रमाणे फाल्गुन वद्य तृतीया हा दिवस शिवजयंती म्हणून पाळतात. त्याप्रमाणे विविध दिनदर्शिकांंमधे वेगवेगळी तारीख दाखविली असते.
एका आख्यायिकेनुसार शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती म्हणून या मुलाचे नाव 'शिवाजी' ठेवले गेले.

कौटुंंबिक माहिती

शहाजीराजे (वडिल)

प्रथम अहमदनगरच्या निजामशहाच्या पदरी एक सरदार म्हणून होते. मलिक अंबर ह्या निजामशहाच्या प्रभावी वजिराच्या मृत्यूनंतर मोगल सम्राट शहाजहानच्या सैन्याने इ.स. १६३६ मधे अहमदनगरवर चाल करून ते शहर आपल्या ताब्यात घेतल्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशहाच्या पदरी सरदार म्हणून रूजू झाले. आदिलशहाने त्यांना पुण्याची जहागिरी दिली. शहाजीराजांनी तुकाबाईंशी आपला दुसरा विवाह केला. लहान शिवाजीराजांना घेऊन जिजाबाई पुण्याला रहायला आल्या. तुकाबाई आणि शहाजीराजे ह्यांच्या एकोजी भोसले(व्यंकोजी भोसले) ह्या पुत्रांनी पुढे सध्याच्या तमिळनाडूमधील तंजावरला आपले राज्य स्थापन केले.

जिजाबाई (आई)



जिजाबाई व बाल शिवाजी

जिजाबाई पुण्यात रहायला गेल्या त्यावेळी पुण्याची फार दुरवस्था झालेली होती. तेव्हा छोटे शिवाजीराजे आणि कारभारी ह्यांच्या हस्ते पुण्यात एका शेतात प्रतीकादाखल सोन्याच्या मुलाम्याचा नांगर फिरवून, जिजाबाईंनी दादोजी कोंडदेवांच्या मदतीने पुण्याची पुन:स्थापना करायला सुरुवात केली. शिवाजीराजे लहानाचे मोठे होत असताना आणि मोठे झाल्यावरही (मोठेपणीच्या सिंहगडावरच्या स्वारीसारख्या) प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी त्यांना जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन दिले. शिवाजीमहाराजांच्या त्या आद्यगुरू होत. हिंदवी स्वराज्यस्थापनेचे स्वप्न साकार करायला शिवाजीमहाराजांना जिजाबाईंनी स्फूर्ति दिली असे काही इतिहासकार मानतात.

पत्नीसईबाई निंबाळकरसोयराबाई मोहितेपुतळाबाई पालकरलक्ष्मीबाई विचारेकाशीबाई जाधवसगणाबाई शिंदेगुणवंतीबाई इंगळेसकवारबाई गायकवाड

वंशज

मुलगेछत्रपती संभाजी भोसलेछत्रपती राजारामराजे भोसलेमुलीअंबिकाबाई महाडीककमळाबाई (सकवारबाईची कन्या)दीपाबाईराजकुंवरबाई शिर्के (सगुणाबाईची मुलगी, गणोजी शिर्के यांची पत्नी)राणूबाई पाटकरसखुबाई निंबाळकर (सईबाईची मुलगी)सुनासंभाजीच्या पत्नी येसूबाईराजारामांच्या पत्नी ताराबाई (माहेरच्या मोहिते)जानकीबाईराजसबाई (पुत्र संभाजी - १६९८-१७६०)अंबिकाबाई (सती गेली)सगुणाबाईनातवंडेसंभाजीचा मुलगा - शाहूताराबाईची राजारामाची मुले - दुसरा शिवाजीराजसबाईची मुले - दुसरा संभाजीपतवंडेताराबाईचा नातू रामराजा, याला शाहूने दत्तक घेतले, म्हणजे तो स्वतःचाच काका झाला.दुसऱ्या संभाजीचा मुलगा - द्वितीय शिवाजी (खरेतर ३रा शिवाजी) (कोल्हापूर)

मार्गदर्शक

लोककथा आणि इतिहास ह्यांमधे कालौघात पुष्कळदा सरमिसळ होते, आणि त्यामुळे इतिहासाचा नेमका मागोवा घेणे कठीण होते. शिवाजीमहाराजांच्या बाबतीत ती सरमिसळ खूपच आहे; परिणामी शिवाजीराजांना कोणाचे मार्गदर्शन किती मिळाले हे नक्की ठरवणे निदान आज तरी कठीण आहे. युद्धाभ्यास आणि रणनीती तसेच राजकारभार ह्यांसबंधी प्राथमिक मार्गदर्शन त्यांना शहाजीराजांकडून, दप्तरव्यवस्था व न्यायव्यवस्थेचे शिक्षण दादोजी कोंडदेव मलठणकर यांजकडून, तर परकीय सत्तेविरूद्ध लढा करण्याकरता आवश्यक असलेल्या शिस्तीचे शिक्षण जिजाबाईंकडून मिळाले असे मात्र उपलब्ध ऐतिहासिक माहितीवरून निश्चितपणे सांगता येते.

जिजाबाई यांनी बाल शिवाजीच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांस युद्धकला व राजनीतिशास्त्राचे शिक्षण देवविले शिवाय संत एकनाथ महाराजांच्या भावार्थ रामायण, भारूडइत्यादींच्या माध्यमातून बाल शिवबाच्या मनात स्वराज्याचे स्फुल्लिंग चेतविले. पालक व स्वराज्याच्या प्राथमिक संत तुकाराममहाराज ह्यांचे महत्त्वाचे मार्गदर्शनही शिवाजीराजांना लाभले होते.[२]

मावळ प्रांत

छत्रपती शिवाजीराजाच्या सैन्यातील मावळ्यांनी शिवाजीराजांच्या सोबत हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात मोठा सहभाग नोंदवला. सह्याद्रीच्या दोन डोंगररांगांच्या मधल्या खोर्‍याला "मावळ" आणि खोर्‍यातील सैनिकांना "मावळे" म्हणत.




शिवाजी महाराजांचे मावळामधील सवंगडी आणि अन्य प्रसिद्ध मावळे

कान्होजी जेधेबाजीप्रभू देशपांडेमुरारबाजी देशपांडेनेताजी पालकरबाजी पासलकरजिवा महाला : जिवा महाला याचे छायाचित्र असलेले टपाल तिकीटही निघाले आहे.तानाजी मालुसरेहंबीरराव मोहिते

शिवाजी महाराजांचे सरसेनापती

स्वराज्य स्थापनेचा इतिहास

पहिली स्वारी - तोरणगडावर विजय

राजमुद्रा

शहाजीराजांना अटक

जावळी प्रकरण

पश्चिम घाटावर नियंत्रण

आदिलशाहीशी संघर्ष

अफझलखान प्रकरण

प्रतापगडाची लढाई

कोल्हापूरची लढाई

सिद्दी जौहरचे आक्रमण

पावनखिंडीतील लढाई

पुरंदराचा तह

मोगल साम्राज्याशी संघर्ष

भारतात इंग्रज येण्यापूर्वी तिथीनुसार व्यवहार होत असत. इंग्रजी राज्य आल्यावर ग्रेगरीय दिनदर्शिकेनुसार व्यवहार होऊ लागले.

ग्रेगरीय दिनदर्शिका भारतात लागू झाल्यावर ज्यांचा जन्म झाला त्यांची जयंती तारखेने करतात. महात्मा फुले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक या सर्व महापुरूषांचा जन्म भारतात ग्रेगरीय दिनदर्शिका लागू झाल्यावर झाला होता. त्यामुळे त्यांची जयंती तारखेने केली जाते.

तुकाराम, बसवेश्वर, शिवाजी, तथागत बुद्ध या साऱ्यांचा जन्म भारतात ग्रेगरीय दिनदर्शिका लागू करण्यापूर्वी झालेला आहे. त्यांच्या काळात सारे व्यवहार तिथीने करत असत. त्यांचे जन्मदिवस तिथीने साजरे होतात.

आज ज्या ग्रेगरीय दिनदर्शिकेनुसार शिवाजी महाराजांच्या जन्माची तारीख १९ फेब्रुवारी अशी निश्चित केली आहे, ते कॅलेंडर शिवाजीच्या वेळेला युरोपातसुद्धा प्रचलित नव्हते. इंग्रजांनी ग्रेगेरियन कॅलेंडर १७५२ साली स्वीकारले, तोपर्यंत त्यांच्या साम्राज्यात जुलियन दिनदर्शिका अधिकृत होती. जुलियन दिनदर्शिकेतील कालगणना व ग्रगरीय दिनदर्शिकेतील कालगणना यांच्यात १७०० सालपर्यंत १० दिवसांचा तर १७०० सालापासून पुढे ११ दिवसांचा फरक येतो. (जुलियन दिनदर्शिका पुढे गेली होती.) त्यामुळे जुलियन दिनदर्शिकेनुसार निर्धारित १९ फेब्रुवारी ही तारीख १० - ११ दिवसांनी चुकते. अनेक ठिकाणी शिवाजी महाराजांच्या जन्मावेळी जी कालगणना प्रचलित होती त्यानुसार शिवाजी जयंती तिथीनुसार साजरी केील जाते. सरकारी जयंती तारखेनुसार असते.

शिवाजीचा जन्म १६२७ साली झाला अशी जेव्हा मान्यता होती तेव्हा जयंतीची तिथी वैशाख शुद्ध तृतीया येत असे. जेव्हा जन्मसाल १६३० नक्की झाले तेव्हा तिथी फाल्गुन वद्य तृतीया येऊ लागली. शिवाजीच्या जन्मावेळी जर ग्रेगेरीय दिनदर्शिका प्रचलीत असती तर १६३० सालची फाल्गुन वद्य तृतीया १९ फेब्रुवारीला आली असती. म्हणून, २००१ सालापासून १९ फेब्रुवारी ह्या तारखेला सरकारी शिवजयंती साजरी होते. पहा : शिवाजीच्या जन्मतारखेचा वाद

सण

शिवाजीच्या जयंतीला महाराष्ट्रात शिवजयंती म्हणतात. शिवाजीच्या जन्मतारखेबद्दल वाद असल्याने शिवजयंती महाराष्ट्रात वर्षभरात किमान दोनदा साजरी होते. त्या दिवशी दिवसभर ढोल-ताशे वाजवीत मिरवणुका निघतात आणि शिवाजीच्या पुतळ्यांना हार घालण्याचा कार्यक्रम होतो. मुंबईसारख्या शहरात शिवजयंतीच्या मिरवणुकीत १००च्या वर मालमोटारी व त्यांवर देखावे असतात.

भिवंडी आणि मालेगाव येथे या दिवशी अनेकदा दंगली झाल्या. इ.स. १९७० साली भिवंडीत शिवजयंतीची मिरवणूक मशिदीसमोर फार काळ रेंगाळल्यामुळे तुफान दंगल झाली. त्यामुळे भिवंडीत शिवजयंतीची मिरवणूक काढायला १४ वर्षांची बंदी घातली गेली. इ.स. १९८४ साली परवानगी मिळाली आणि त्यावर्षी झालेल्या भीषण दंगलीत अनेक वाहने जळून खाक झाली. त्यामुळे आता मिरवणुकीत सामील होण्यास वाहने मिळत नाहीत. प्रत्येक शिवजयंतीच्या एक आठवडा आधी भिवंडीतले झोपडपट्टीवासी आपले चंबूगबाळे आवरून झोपडी सोडून परगावी जातात
उत्तर लिहिले · 19/2/2018
कर्म · 115390
0
ह्या पूर्वी हा प्रश्न विचारला गेलेला आहे. तुम्ही सर्च मध्ये शिवाजी महाराज नाव टाका, तुम्हाला या आधी विचारलेले प्रश्न दिसतील. तिथे तुम्हाला माहिती मिळेल.
उत्तर लिहिले · 19/2/2018
कर्म · 0
0
छत्रपती शिवाजी महाराज - बालपण

छत्रपती शिवाजी महाराज: बालपण

शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. त्यांच्या बालपणाविषयीची माहिती खालीलप्रमाणे:

जन्म आणि कुटुंब:

  • जन्म: १९ फेब्रुवारी १६३० (काही इतिहासकारांनुसार), शिवनेरी किल्ला, जुन्नर, महाराष्ट्र.
  • वडील: शहाजीराजे भोसले (एक शूर सेनानी).
  • आई: जिजाबाई (एक धार्मिक आणि दृढनिश्चयी स्त्री).

सुरुवातीचे जीवन:

  • शिवाजी महाराजांचे बालपण जिजाबाईंच्या मार्गदर्शनाखाली व्यतीत झाले.
  • जिजाबाईंनी त्यांना रामायण, महाभारत यांसारख्या धार्मिक ग्रंथांतील कथा सांगितल्या, ज्यामुळे त्यांच्या मनात नैतिक मूल्यांची आणि धर्माची शिकवण रुजली.
  • शिवाजी महाराजांना युद्धकला, शस्त्रे चालवणे आणि प्रशासनाचे प्राथमिक धडे मिळाले.

शिक्षण:

  • शिवाजी महाराजांना लिहायला आणि वाचायला शिकवण्यात आले.
  • त्यांना लहान वयातच तलवारबाजी, घोडेस्वारी आणि इतर युद्धकलांमध्ये पारंगत केले गेले.
  • दादाजी कोंडदेव यांनी त्यांना राजनीती आणि प्रशासनाचे शिक्षण दिले.

स्वराज्य स्थापनेची प्रेरणा:

  • शिवाजी महाराजांनी लहानपणीच स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली.
  • त्यांनी आपल्या सवंगड्यांना एकत्र करून मावळ भागात स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली.
  • शिवाजी महाराजांनी तरुण वयातच तोरणा किल्ला जिंकून आपल्या कार्याची सुरुवात केली.

या माहितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणीच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना आणि त्यांच्या शिक्षणाबद्दल माहिती देण्यात आली आहे.

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 960

Related Questions

औद्योगिक क्रांती कुठे झाली?
पंडित जवाहरलाल नेहरू हे आशियानचे संस्थापक होते का?
पूर्व युरोपातील सोव्हिएट रशियाच्या दबावाखालील ५ देशांची नावे लिहा?
ॲनी बेझंट यांच्या होमरूल चळवळीचे भारतात झालेले परिणाम लिहा?
1975 चा पेठ मधील दुष्काळ?
आधुनिक इतिहास म्हणजे काय?
इतिहासाचे प्रकार किती व कोणते?