मनोरंजन बॉलीवूड चित्रपट

चित्रपटाचे प्रकार कसे स्पष्ट कराल?

5 उत्तरे
5 answers

चित्रपटाचे प्रकार कसे स्पष्ट कराल?

31
चित्रपटाच्या ऐतिहासिक विकासक्रमात दीर्घ लांबीच्या कथाप्रधान चित्रपटांबरोबरच व्यंगचित्रपट, वार्तापट, अनुबोधपट, प्रसिद्धिपट, बालचित्रपट, सैनिकी चित्रपट, शैक्षणिक चित्रपट यांसारखे अनेक प्रकार उदयास आले. त्यांपैकी मुख्य आकर्षण कथाचित्रपटांचेच होते. हे कथाचित्रपट पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक इ. विषयांवरील असतात. 

चित्रपटकलेचा इतिहास घडत व्यंगचित्रपटांचाही जन्म झाला. कथानकावर आधारलेला चित्रपट ज्यावेळी जन्मास आला, त्याच सुमारास व्यंगचित्रपटदेखील अस्तित्वात आला होता. गेम ऑफ प्लेइंग कार्ड्‌स   हा चित्रपट तयार करणाऱ्या झॉर्झ मिली व आर्. डब्ल्यू. पॉल यांनी व्यंगचित्रपट तयार करण्याचा प्रयत्न केल्यामुळे व्यंगचित्रपटाचे जनकत्व त्यांना देण्यात येते; परंतु १९०८ साली एमील कोल याने जो सु. ३१ मी. लांबीचाफॅंटास्मागोरिया  हा प्राथमिक स्वरूपाचा व्यंगचित्रपट तयार केला होता, तोच खऱ्या अर्थी पहिला व्यंगचित्रपट मानला जातो. त्या व्यंगचित्रपटासाठी त्यावेळी त्याला वेगवेगळ्या हालचालींची दोन हजार चित्रे रेखाटावी लागली होती; परंतु पूर्णत्वाला पोहोचलेल्या रिलक्टंट ड्रॅगन  यासारख्या व्यंगचित्रपटासाठी तर वॉल्ट डिझ्नीला निरनिराळ्या वीस हजार चित्रांचा उपयोग करावा लागला. १९२८ साली त्याच्या एका बोलक्या व्यंगपटात मिकी माऊसचा प्रथम अवतार झाला. १९३७ साली डिझ्नीने स्नो व्हाईट अँड द सेव्हन ड्‌वार्फ्‌स  हा पहिला व्यंगचित्रपट तयार केला. साध्या वा रंगीत बोलपटांप्रमाणेच व्यंगचित्रपटदेखील अतिशय लोकप्रिय झाले व त्याच प्रमाणात अधूनमधून रंगीत बोलक्या व्यंगचित्रपटांची निर्मिती होऊ लागली. 
उत्तर लिहिले · 15/2/2018
कर्म · 115390
2
बरोबर आहे का?
उत्तर लिहिले · 2/2/2022
कर्म · 40
0
मी चित्रपटांचे प्रकार खालीलप्रमाणे स्पष्ट करू शकेन:

चित्रपटांचे प्रकार:

चित्रपटांचे विविध प्रकार आहेत, जे त्यांच्या कथानक, शैली, आणि उद्देशावर आधारित असतात. येथे काही मुख्य प्रकारांची माहिती दिली आहे:

  1. ॲक्शन (Action): या चित्रपटांमध्ये मारामारी, थरारक दृश्ये, पाठलाग आणि साहसी घटना मोठ्या प्रमाणात असतात.

    उदाहरण: 'सिंघम' (IMDb)

  2. ॲनिमेटेड (Animated): हे चित्रपट ग्राफिक्स आणि चित्रांच्या साहाय्याने तयार केले जातात.

    उदाहरण: 'मोटू पतलू'

  3. कॉमेडी (Comedy): या चित्रपटांमध्ये विनोद, मजेदार प्रसंग आणि हास्य निर्माण करणाऱ्या घटना असतात.

    उदाहरण: 'गोलमाल' (IMDb)

  4. ड्रामा (Drama): हे चित्रपट भावनिक आणि गंभीर विषयांवर आधारित असतात.

    उदाहरण: 'नटसम्राट'

  5. फँटसी (Fantasy): या चित्रपटांमध्ये काल्पनिक जग, जादू, आणि अद्भुत पात्रे असतात.

    उदाहरण: 'अवतार' (IMDb)

  6. हॉरर (Horror): हे चित्रपट भीतीदायक आणि भयानक अनुभव देणारे असतात.

    उदाहरण: 'स्त्री' (IMDb)

  7. रोमान्स (Romance): या चित्रपटांमध्ये प्रेम आणि भावनात्मक संबंधांवर लक्ष केंद्रित केले जाते.

    उदाहरण: 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' (IMDb)

  8. सायन्स फिक्शन (Science Fiction): हे चित्रपट विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित भविष्यातील कथा सांगतात.

    उदाहरण: 'इंटर्स्टेलर' (IMDb)

  9. थ्रिलर (Thriller): या चित्रपटांमध्ये रहस्य, suspense आणि अनपेक्षित घटना असतात.

    उदाहरण: 'कहानी' (IMDb)

  10. डॉक्युमेंटरी (Documentary): हे चित्रपट वास्तविक घटना आणि तथ्यांवर आधारित असतात.

    उदाहरण: 'इंडियाज डॉटर'

हे काही प्रमुख चित्रपटांचे प्रकार आहेत. प्रत्येक प्रकारात अनेक उपप्रकार असू शकतात आणि काही चित्रपट एकापेक्षा जास्त प्रकारांमध्ये मोडू शकतात.

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 980

Related Questions

2006 साली प्रदर्शित झालेल्या 'गाढवाचं लग्न' या मराठी चित्रपटात राजकुमारीची भूमिका कुणी केली आहे?
चित्रपट भाषेची पातळी लिहा?
चित्रपटाचे दृश्य निर्माण करणाऱ्या यंत्राचा परिचय करून घ्या?
चित्रपटाचे दृश्य निर्माण करणारे यंत्र कोणते आहे हे स्पष्ट करा?
चित्रपट आणि यंत्र परिचय?
चित्रपट दृश्य निर्माण करणार्‍या यंत्राची माहिती?
चित्रपटाचे दृश्य यंत्राचा परिचय करून द्या?