संविधान पाणी आणि वीज नागरी सुविधा

विरार पूर्व व पश्चिम या दोन्ही दिशेला असलेल्या इमारतींना महानगरपालिकेचा पाणीपुरवठा व वीजपुरवठा याची परिस्थिती कशी आहे, दोघांचा पुरवठा व्यवस्थित आहे का?

2 उत्तरे
2 answers

विरार पूर्व व पश्चिम या दोन्ही दिशेला असलेल्या इमारतींना महानगरपालिकेचा पाणीपुरवठा व वीजपुरवठा याची परिस्थिती कशी आहे, दोघांचा पुरवठा व्यवस्थित आहे का?

6
तुम्ही विरार पूर्व व पश्चिम या दोन्हीही दिशेबद्दल तेथील वस्ती आणि राहण्याची सोई सुविधा विचारत असाल तर मुंबई शहरा सारखे मुबलक पाणी आणि विज पुरवठा करण्याजोगे हे पालघर जिल्ह्यातील वसई विरार शहर तसे फारसे नाही... पण तेथे प्रत्येक ठिकाणी सोई नाहीच आहे असेही नाही... काही एरियाप्रमाणे सुद्धा सोई सुविधा मिळतील... तरीही हा सर्व क्षणभर जरा विचार बाजूला सारून तुम्ही येथील लोकल पश्चिम रेल्वेचा जर विचार केला तर तुम्हाला प्रवासाचा या ठिकाणी बराच त्रास सहन करावा लागेल... विरार हां शेवटचा रेल्वेस्थानक असला तरीही नायगाव-नालासोपारा यातून येणारे प्रवासी हे विरार डाउन गाड़ी पकड़तात... त्यामुळे गर्दी ही खुप मिळते... येथील स्टेशन हे प्रत्येकी सात ते आठ मिनिटांनी येते... अर्थात तुम्हाला सकाळ आणि संध्याकाळ हां प्रवास फार चिंताजनक वाटू शकतो... विरार वसई सुद्धा आता सुधारण्याचे कामकाज चालु आहे... परंतु याचा विकास होण्यासाठी बरीच वर्षे जातील... अजुन एक म्हणजे... येथे अधिक करुन अनधिकृत बांधकाम चालतात... आणि ते कधीही पाडण्यात येते... पण काही अधिकृत ही इमारती आहेत... तुम्हाला जर विरार या ठिकाणी घर/फ्लॅट घ्यावयाचे असल्यास तुम्ही संपूर्ण चौकशी करुन घ्यावी...
धन्यवाद...
उत्तर लिहिले · 12/2/2018
कर्म · 458560
0
विरार पूर्व आणि पश्चिम या दोन्हीकडील इमारतींना महानगरपालिकेचा पाणीपुरवठा आणि वीजपुरवठ्याची स्थिती खालीलप्रमाणे आहे:

पाणीपुरवठा:

  • विरार पूर्व: काही भागांमध्ये पाणीपुरवठा नियमित आहे, परंतु काही ठिकाणी अनियमितता आणि कमी दाबाची समस्या आहे.
  • विरार पश्चिम: पश्चिमेकडील भागांमध्ये पाणीपुरवठा बर्‍यापैकी ठीक आहे, परंतु काही जुन्या इमारतींमध्ये समस्या येतात.

वीजपुरवठा:

  • विरार पूर्व: पूर्वेकडील भागात वीजपुरवठा सामान्यतः चांगला आहे, परंतुMaintenance कामामुळे कधीकधी व्यत्यय येतो.
  • विरार पश्चिम: पश्चिमेकडील भागात वीजपुरवठा ठीक आहे, परंतु जास्त मागणीमुळे काहीवेळा समस्या येतात.

अधिक माहितीसाठी:

  • तुम्ही वसई विरार शहर महानगरपालिकेच्या वेबसाइटला भेट देऊन अधिक माहिती मिळवू शकता.
उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 1440

Related Questions

आमच्या कॉलनीमध्ये दोन गटारी आहेत, नगरपरिषद एकच गटारीचे काम करत आहे. आम्ही आमच्या गटारीसाठी नगरपरिषदेत ५ वेळा अर्ज देऊन सुद्धा काम होत नाही आहे आणि समोरच्या गटारीचे काम होत आहे, तर आम्ही कसा अर्ज करायचा?
सार्वजनिक लाईटचा पोल लावण्याकरिता काय करावे लागते व काय प्रक्रिया आहे?