ऊर्जा नैसर्गिक ऊर्जा जैव ऊर्जा

जैव ऊर्जा (बायोएनर्जी) विषयी माहिती मिळेल का?

3 उत्तरे
3 answers

जैव ऊर्जा (बायोएनर्जी) विषयी माहिती मिळेल का?

7
जैव ऊर्जा 
ही जैव स्रोतातून मिळवली जाणारी ऊर्जा होय. लाकडूफाटा आणि विविध स्वरूपातला सेंद्रीय कचरा ही जैव ऊर्जास्रोतांची उदाहरणे आहेत.

लाकूडफाटा व इतर कचरा थेट जाळून ऊर्जा मिळवता येते. पारंपरिक चुली हे याचे सर्वात प्रचलित उदाहरण आहे. मात्र या चुली अत्यंत अकार्यक्षम असतात, व त्यातून मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. लाकूडफाटा व जैव कचरा यांवर विविध प्रकारच्या प्रक्रिया करून विविध स्वरूपातील इंधनेही तयार करता येतात. जैव पदार्थांपासून ऊर्जा मिळवण्याचा हा दुसरा पर्याय आहे.

गॅसिफायर हे जैव ऊर्जेचा कार्यक्षम वापर करण्याच्या साधनाचे एक उदाहरण आहे. यामध्ये लाकूडफाटा किंवा सेंद्रीय कचऱ्याचे वूडगॅसमध्ये रूपांतर केले जाते, व मग हा गॅस जाळून उष्णता मिळवता येते (उदा. गॅसिफायर शेगड्या) किंवा या गॅसवर जनरेटर चालवून वीजनिर्मितीही करता येते.

★वर्गीकरण

लाकूड जाळून पाहिजे तेव्हा पाहिजे तितकी उष्णता मिळवता येणे, आणि त्या उष्णतेचा अन्न भाजण्यासाठी, ऊब मिळवण्यासाठी, रात्री प्रकाश मिळवण्यासाठी, इ. पध्दतीने वापर करणे ही माणसाकडून झालेल्या ऊर्जा निर्मिती व ऊर्जा वापराची पहिली उदाहरणे आहेत. त्या अर्थाने जैव ऊर्जा हा सर्वात पारंपरिक ऊर्जा स्रोत आहे. पण पारंपरिक या सदरात मोडणारे इतर ऊर्जास्रोत (उदा. दगडी कोळसा) नूतनक्षम किंवा अक्षय नाहीत. झाडे झुडपे मात्र मुळापासून काढून टाकली नाहीत, तर कितीही तोडली तरी पुन्हा वाढत रहातात. अर्थात त्यासाठी तोडण्याचा वेग आणि वाढण्याचा वेग यांच्यात संतुलन असावे लागते. पण शेतीसारख्या उद्योगात दरवर्षी नव्याने लागवड होतच असते, आणि पीक तयार झाले की त्याच्या उपयुक्त भागाबरोबरच (उदा. धान्य, कापूस, इ.) काडीकचराही (उदा. पाचट, तुराट्या, पराट्या, इ.) तयार होत असतो. त्यामुळे काडीकचऱ्याचा ऊर्जास्रोत म्हणून वापर हा नवीकरणीय या वर्गात मोडू शकतो. थोडक्यात म्हणजे लाकूडफाटा, काडीकचरा हे स्रोत जैवचक्रानुसार पुन्हा पुन्हा उपलब्ध होत असल्यामुळे जैव ऊर्जा ही नवीकरणीय ऊर्जासमजली जाते. तेव्हा जैव ऊर्जा हा पारंपरिक आणि तरीही नवीकरणीय असा एकमेव ऊर्जा स्रोत आहे.

■जैव इंधने

खनिज इंधनांना नवीकरणीय असा थेट पर्याय जैव इंधनांमधून मिळू शकतो. घन, द्रव, व वायू या तिन्ही स्वरूपातील खनिज इंधनांना पर्यायी जैव इंधने उपलब्ध आहेत. मात्र मोठ्या प्रमाणावर जैव इंधनांची निर्मिती करणे खर्चिक, अव्यवहार्य, आणि काही परिस्थितीत पर्यावरणासाठी हानीकारकही ठरू शकते. या दृष्टीने काडी कचरा म्हणून जाळून टाकल्या जाणाऱ्या जैव पदार्थांपासून जिथे उपलब्ध आहे तिथे, या पध्दतीने इंधनांची निर्मिती करण्याच्या काही सोप्या पध्दती जास्त उपयुक्त ठरतात. उदा. काडीकचऱ्यापासून कोळसा पावडर तयार करणे अतिशय सोपे आहे. अगदी आपल्या बागेतील कचऱ्याचा आपला आपण कोळसा बनवू शकतो. काडीकचऱ्याचा इंधन बनवण्यासाठी जेव्हा वापर केला जातो, तेव्हा त्यातील कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, हे घटक इंधनाचा भाग बनतात, तर वनस्पतींच्या अवशेषात मातीतून आलेले फॉस्फरस, पोटॅशिअम, इतर काही सूक्ष्मद्रव्ये हे घटक इंधन बनवण्याच्या प्रक्रियेतला कचरा म्हणून बाहेर पडतात. जमिनीत रासायनिक खत म्हणून घातले जाणारे हेच सारे घटक आहेत. त्यामुळे जैवभारापासून इंधन बनवण्याच्या प्रक्रियेत मागे रहाणारा कचरा हे एक चांगले खत बनते.

उत्तर लिहिले · 10/2/2018
कर्म · 123540
3
जैव ऊर्जा ही जैव स्रोतातून मिळवली जाणारी ऊर्जा होय. लाकडूफाटा आणि विविध स्वरूपातला सेंद्रीय कचरा ही जैव ऊर्जास्रोतांची उदाहरणे आहेत.

लाकूडफाटा व इतर कचरा थेट जाळून ऊर्जा मिळवता येते. पारंपरिक चुली हे याचे सर्वात प्रचलित उदाहरण आहे. मात्र या चुली अत्यंत अकार्यक्षम असतात, व त्यातून मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. लाकूडफाटा व जैव कचरा यांवर विविध प्रकारच्या प्रक्रिया करून विविध स्वरूपातील इंधनेही तयार करता येतात. जैव पदार्थांपासून ऊर्जा मिळवण्याचा हा दुसरा पर्याय आहे.

गॅसिफायर हे जैव ऊर्जेचा कार्यक्षम वापर करण्याच्या साधनाचे एक उदाहरण आहे. यामध्ये लाकूडफाटा किंवा सेंद्रीय कचऱ्याचे वूडगॅसमध्ये रूपांतर केले जाते, व मग हा गॅस जाळून उष्णता मिळवता येते (उदा. गॅसिफायर शेगड्या) किंवा या गॅसवर जनरेटर चालवून वीजनिर्मितीही करता येते.

वर्गीकरणसंपादन करा

लाकूड जाळून पाहिजे तेव्हा पाहिजे तितकी उष्णता मिळवता येणे, आणि त्या उष्णतेचा अन्न भाजण्यासाठी, ऊब मिळवण्यासाठी, रात्री प्रकाश मिळवण्यासाठी, इ. पध्दतीने वापर करणे ही माणसाकडून झालेल्या ऊर्जा निर्मिती व ऊर्जा वापराची पहिली उदाहरणे आहेत. त्या अर्थाने जैव ऊर्जा हा सर्वात पारंपरिक ऊर्जा स्रोत आहे. पण पारंपरिक या सदरात मोडणारे इतर ऊर्जास्रोत (उदा. दगडी कोळसा) नूतनक्षम किंवा अक्षय नाहीत. झाडे झुडपे मात्र मुळापासून काढून टाकली नाहीत, तर कितीही तोडली तरी पुन्हा वाढत रहातात. अर्थात त्यासाठी तोडण्याचा वेग आणि वाढण्याचा वेग यांच्यात संतुलन असावे लागते. पण शेतीसारख्या उद्योगात दरवर्षी नव्याने लागवड होतच असते, आणि पीक तयार झाले की त्याच्या उपयुक्त भागाबरोबरच (उदा. धान्य, कापूस, इ.) काडीकचराही (उदा. पाचट, तुराट्या, पराट्या, इ.) तयार होत असतो. त्यामुळे काडीकचऱ्याचा ऊर्जास्रोत म्हणून वापर हा नवीकरणीय या वर्गात मोडू शकतो. थोडक्यात म्हणजे लाकूडफाटा, काडीकचरा हे स्रोत जैवचक्रानुसार पुन्हा पुन्हा उपलब्ध होत असल्यामुळे जैव ऊर्जा ही नवीकरणीय ऊर्जा समजली जाते. तेव्हा जैव ऊर्जा हा पारंपरिक आणि तरीही नवीकरणीय असा एकमेव ऊर्जा स्रोत आहे.

जैव इंधनेसंपादन करा

खनिज इंधनांना नवीकरणीय असा थेट पर्याय जैव इंधनांमधून मिळू शकतो. घन, द्रव, व वायू या तिन्ही स्वरूपातील खनिज इंधनांना पर्यायी जैव इंधने उपलब्ध आहेत. मात्र मोठ्या प्रमाणावर जैव इंधनांची निर्मिती करणे खर्चिक, अव्यवहार्य, आणि काही परिस्थितीत पर्यावरणासाठी हानीकारकही ठरू शकते. या दृष्टीने काडी कचरा म्हणून जाळून टाकल्या जाणाऱ्या जैव पदार्थांपासून जिथे उपलब्ध आहे तिथे, या पध्दतीने इंधनांची निर्मिती करण्याच्या काही सोप्या पध्दती जास्त उपयुक्त ठरतात. उदा. काडीकचऱ्यापासून कोळसा पावडर तयार करणे अतिशय सोपे आहे. अगदी आपल्या बागेतील कचऱ्याचा आपला आपण कोळसा बनवू शकतो. काडीकचऱ्याचा इंधन बनवण्यासाठी जेव्हा वापर केला जातो, तेव्हा त्यातील कार्बनहायड्रोजनऑक्सिजननायट्रोजन, हे घटक इंधनाचा भाग बनतात, तर वनस्पतींच्या अवशेषात मातीतून आलेले फॉस्फरसपोटॅशिअम, इतर काही सूक्ष्मद्रव्ये हे घटक इंधन बनवण्याच्या प्रक्रियेतला कचरा म्हणून बाहेर पडतात. जमिनीत रासायनिक खत म्हणून घातले जाणारे हेच सारे घटक आहेत. त्यामुळे जैवभारापासून इंधन बनवण्याच्या प्रक्रियेत मागे रहाणारा कचरा हे एक चांगले खत बनते.

उत्तर लिहिले · 25/2/2019
कर्म · 70
0
नक्कीच, जैવ ऊर्जा (बायोएनर्जी) विषयी माहिती खालीलप्रमाणे:

जैव ऊर्जा (बायोएनर्जी):

जैव ऊर्जा म्हणजे जैविक पदार्थ जसे की शेतीमधील कचरा, वनस्पती आणि प्राण्यांची विष्ठा वापरून निर्माण केलेली ऊर्जा.

जैव ऊर्जेचे स्रोत:

  • शेतीमधील कचरा (गवत, धान्याचा कोंडा, उसाचे पाचट)
  • वनस्पती (जंगली गवत, जलचर वनस्पती)
  • प्राण्यांची विष्ठा (शेण)
  • शहरी कचरा (ओला कचरा)

जैव ऊर्जेचे प्रकार:

  • बायोमास (Biomass): लाकूड, शेतीमधील कचरा, आणि वनस्पतींपासून थेट ऊर्जा मिळवणे.
  • बायोफ्युয়েल (Biofuel): जैविक पदार्थांपासून बनवलेले इंधन, जसे की इथेनॉल आणि बायोडीजल.
  • बायोगॅस (Biogas): जैविक कचऱ्याच्या विघटनातून निर्माण होणारा वायू, जो ऊर्जा निर्मितीसाठी वापरला जातो.

जैव ऊर्जेचे फायदे:

  • पर्यावरणास अनुकूल: जैव ऊर्जा कार्बन न्यूट्रल असल्याने पर्यावरणाची हानी कमी होते.
  • कचरा व्यवस्थापन: जैविक कचऱ्याचा उपयोग ऊर्जेसाठी केल्याने कचरा व्यवस्थापनात मदत होते.
  • ग्रामीण विकास: ग्रामीण भागात ऊर्जा निर्मितीचे स्रोत उपलब्ध होतात, ज्यामुळे रोजगार वाढतो.

जैव ऊर्जेचे तोटे:

  • उच्च उत्पादन खर्च: जैव ऊर्जा प्रकल्पांची उभारणी आणि నిర్వహण खर्चिक असू शकते.
  • जमिनीचा वापर: बायोमास उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणावर जमिनीची आवश्यकता असते.
  • पाण्याची गरज: काही जैव ऊर्जा प्रक्रियांस मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते.

भारतातील जैव ऊर्जा:

भारत सरकार जैव ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना राबवत आहे, जसे की राष्ट्रीय बायोमास अभियान आणि गोबर-धन योजना. यामुळे ग्रामीण भागात ऊर्जा सुरक्षा वाढण्यास मदत होत आहे.

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 5220

Related Questions

जैवऊर्जा विषयी माहिती मिळेल का?