जैव ऊर्जा
4
Answer link
जैवऊर्जा म्हणजे सजीवांपासून मिळणारी ऊर्जा. पृथ्वीवरील सर्व सजीव आपल्या रोजच्या चलनवलनातून आणि हालचालींमधून काही प्रमाणात ऊर्जा निर्माण करतात. प्रत्येक सजीवानुसार त्यांनी तयार केलेल्या ऊर्जेचे प्रमाण वेगवेगळे असते. काही सजीवांमध्ये हि ऊर्जा त्यांच्या हालचाली आणि इतर कामांसाठी वापरली जाते तर काहींमध्ये ती साठवून ठेवली जाते. या साठवलेल्या ऊर्जेचा वापर माणसाने आपल्या उपयोगासाठी करून घेतलेला आहे. वनस्पतींमध्ये ही ऊर्जा कर्बोदके, तैले, प्रथिने आणि अन्य सेंद्रिय रसायनांच्या स्वरूपात साठवली जाते. या ऊर्जेचा वापर करून स्वतःची ऊर्जेची गरज माणूस भागवतो.
जैवभार म्हणजे एखाद्या जैविक पदार्थात साठलेली रासायनिक स्वरूपाची सौर ऊर्जा होय. जैवऊर्जा हि नवीनीकरणक्षम ऊर्जा आहे, म्हणजेच ती पुन्हापुन्हा उपलब्ध होऊ शकते. पृथ्वीवरील बहुतेक सर्व जैव ऊर्जेचा स्रोत सूर्य आहे. सूर्याकडून मिळणाऱ्या प्रकाश व उष्णतेने बहुतेक जैव पदार्थांमध्ये जैवऊर्जा निर्माण होते.
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
7
Answer link
जैव ऊर्जा
ही जैव स्रोतातून मिळवली जाणारी ऊर्जा होय. लाकडूफाटा आणि विविध स्वरूपातला सेंद्रीय कचरा ही जैव ऊर्जास्रोतांची उदाहरणे आहेत.
लाकूडफाटा व इतर कचरा थेट जाळून ऊर्जा मिळवता येते. पारंपरिक चुली हे याचे सर्वात प्रचलित उदाहरण आहे. मात्र या चुली अत्यंत अकार्यक्षम असतात, व त्यातून मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. लाकूडफाटा व जैव कचरा यांवर विविध प्रकारच्या प्रक्रिया करून विविध स्वरूपातील इंधनेही तयार करता येतात. जैव पदार्थांपासून ऊर्जा मिळवण्याचा हा दुसरा पर्याय आहे.
गॅसिफायर हे जैव ऊर्जेचा कार्यक्षम वापर करण्याच्या साधनाचे एक उदाहरण आहे. यामध्ये लाकूडफाटा किंवा सेंद्रीय कचऱ्याचे वूडगॅसमध्ये रूपांतर केले जाते, व मग हा गॅस जाळून उष्णता मिळवता येते (उदा. गॅसिफायर शेगड्या) किंवा या गॅसवर जनरेटर चालवून वीजनिर्मितीही करता येते.
★वर्गीकरण
लाकूड जाळून पाहिजे तेव्हा पाहिजे तितकी उष्णता मिळवता येणे, आणि त्या उष्णतेचा अन्न भाजण्यासाठी, ऊब मिळवण्यासाठी, रात्री प्रकाश मिळवण्यासाठी, इ. पध्दतीने वापर करणे ही माणसाकडून झालेल्या ऊर्जा निर्मिती व ऊर्जा वापराची पहिली उदाहरणे आहेत. त्या अर्थाने जैव ऊर्जा हा सर्वात पारंपरिक ऊर्जा स्रोत आहे. पण पारंपरिक या सदरात मोडणारे इतर ऊर्जास्रोत (उदा. दगडी कोळसा) नूतनक्षम किंवा अक्षय नाहीत. झाडे झुडपे मात्र मुळापासून काढून टाकली नाहीत, तर कितीही तोडली तरी पुन्हा वाढत रहातात. अर्थात त्यासाठी तोडण्याचा वेग आणि वाढण्याचा वेग यांच्यात संतुलन असावे लागते. पण शेतीसारख्या उद्योगात दरवर्षी नव्याने लागवड होतच असते, आणि पीक तयार झाले की त्याच्या उपयुक्त भागाबरोबरच (उदा. धान्य, कापूस, इ.) काडीकचराही (उदा. पाचट, तुराट्या, पराट्या, इ.) तयार होत असतो. त्यामुळे काडीकचऱ्याचा ऊर्जास्रोत म्हणून वापर हा नवीकरणीय या वर्गात मोडू शकतो. थोडक्यात म्हणजे लाकूडफाटा, काडीकचरा हे स्रोत जैवचक्रानुसार पुन्हा पुन्हा उपलब्ध होत असल्यामुळे जैव ऊर्जा ही नवीकरणीय ऊर्जासमजली जाते. तेव्हा जैव ऊर्जा हा पारंपरिक आणि तरीही नवीकरणीय असा एकमेव ऊर्जा स्रोत आहे.
■जैव इंधने
खनिज इंधनांना नवीकरणीय असा थेट पर्याय जैव इंधनांमधून मिळू शकतो. घन, द्रव, व वायू या तिन्ही स्वरूपातील खनिज इंधनांना पर्यायी जैव इंधने उपलब्ध आहेत. मात्र मोठ्या प्रमाणावर जैव इंधनांची निर्मिती करणे खर्चिक, अव्यवहार्य, आणि काही परिस्थितीत पर्यावरणासाठी हानीकारकही ठरू शकते. या दृष्टीने काडी कचरा म्हणून जाळून टाकल्या जाणाऱ्या जैव पदार्थांपासून जिथे उपलब्ध आहे तिथे, या पध्दतीने इंधनांची निर्मिती करण्याच्या काही सोप्या पध्दती जास्त उपयुक्त ठरतात. उदा. काडीकचऱ्यापासून कोळसा पावडर तयार करणे अतिशय सोपे आहे. अगदी आपल्या बागेतील कचऱ्याचा आपला आपण कोळसा बनवू शकतो. काडीकचऱ्याचा इंधन बनवण्यासाठी जेव्हा वापर केला जातो, तेव्हा त्यातील कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, हे घटक इंधनाचा भाग बनतात, तर वनस्पतींच्या अवशेषात मातीतून आलेले फॉस्फरस, पोटॅशिअम, इतर काही सूक्ष्मद्रव्ये हे घटक इंधन बनवण्याच्या प्रक्रियेतला कचरा म्हणून बाहेर पडतात. जमिनीत रासायनिक खत म्हणून घातले जाणारे हेच सारे घटक आहेत. त्यामुळे जैवभारापासून इंधन बनवण्याच्या प्रक्रियेत मागे रहाणारा कचरा हे एक चांगले खत बनते.