ॲप विकास
तंत्रज्ञान
मला App बनवायचे आहे आणि प्ले स्टोर वर अपलोड करायचे आहे, मला App बनवायची संपूर्ण माहिती हवी आहे ?
मूळ प्रश्न: ॲप कसे काढावे, त्यातून पैसे कसे कमवता येतील आणि त्याची संपूर्ण प्रक्रिया कशी असते?
अँप चा डोमेन ठरवा:
अँप काढण्यासाठी कोणत्या गोष्टीचे अँप काढायचे आहे ते ठरवा. जसे कि तुमचा काही बिझनेस असेल आणि त्याचे ऑनलाईन ग्राहक तुम्हाला वाढवायचे असतील तर त्या बिझनेसचे अँप काढा. उदाहरणार्थ फ्लिपकार्ट बऱ्याच गोष्टींची ऑनलाईन विक्री करते त्यासाठी फ्लिपकार्टने अँप देखील तयार केलेले आहे. तुम्ही एखादी गेम तयार करू शकता, किंवा म्युजिक प्लेयर, शेर-शायरी यातले कसलेही अँप बनवू शकता.अँप कसे बनवतात:
तुम्हाला जर कॉम्पुटर सायन्सचे बॅकग्राऊंड असेल तर तुम्हाला हे उत्तर सहज समजेल, जर नसेल तर तुम्ही एखादा अँड्रॉइड अप्लिकेशन डेव्हलोपमेंटचा कोर्स एखाद्या नामांकित संस्थेतून करणे कधीही फायद्याचे ठरेल.
मुख्यतः मोबाईलच्या २ ऑपरेटिंग सिस्टिम्स पडतात. अँड्रॉइड आणि iOS. या दोन्हीही सिस्टिमवर चालण्यासाठी तुम्हाला वेगवेगळे अँप तयार करावे लागेल.
१. अँड्रॉइड अँप:
अँड्रॉइड अँप डेव्हलोपमेंट मध्ये तुम्हाला Java ही प्रोग्रामिंग भाषा येणे गरजेचे आहे. जर तुम्हाला अँड्रॉइडचा कोर्स करायचा नसेल तर google च्या खालील वेबसाईटवरून तुम्ही ऑनलाईन शिकू शकता. यात थोडा वेळ देणे गरजेचे आहे. १-२ दिवसात तुम्ही सर्व शिकाल अशी अपेक्षा ठेऊ नये. तुमच्या शैक्षणिक बॅकग्राऊंडनुसार कमीत कमी १ महिना ते जास्तीत जास्त १ वर्ष देखील तुम्हाला लागू शकते.
२. iOS अँप:
अँपलच्या फोनवर जर तुम्हाला तुमचे अँप चालवायचे असेल तर तुम्ही iOS साठी अँप बनवणे गरजेचे आहे. यासाठी Objective C ही प्रोग्रामिंग भाषा तुम्हाला येणे गरजेचे आहे.
हे शिकण्यासाठी तुम्ही खालील लिंक वर जाऊन ऑनलाईन शिकू शकता.
हे सर्व चालवण्यासाठी एक सुस्थितीत आणि चांगला(8GB RAM आणि i5 पेक्षा पुढचा प्रोसेसर असलेला) संगणक तुमच्याकडे हवा.
वरील गोष्टी पाहता तुमचे जर कॉम्पुटर बॅकग्राऊंड नसेल तर अँप दुसऱ्याकडून बनवून घेतलेले सोपे आणि कमी कष्टाचे पडते.
अँपमधून पैसे कसे कमावतात:
अँप मधून पैसे कमावण्यासाठी एकतर तुम्ही स्वतःची काही गोष्ट अँप मधून विकणे गरजेचे आहे. जर तसे नसेल तर तुम्ही अँप मध्ये जाहिराती दाखवून पैसे कमावू शकता. जसे कि YouTube चे अँप वापरण्यास फ्री आहे पण YouTube जाहिरातीमधून खूप सारे पैसे कमावते. जर अँप कसे बनवतात हे तुम्ही शिकलात तर जाहिराती कशा टाकाव्यात हे देखील त्यातलाच भाग आहे. खालील लिंकवर Google Ads कशाप्रकारे आपल्या अँप मध्ये टाकायच्या हे तुम्ही शिकू शकता.
तसेच खालील ट्युटोरिअलमध्ये तुमच्या अँप मध्ये जाहिराती कशा टाकायच्या हे पद्धतशीर सांगितले आहे:
म्हणून जर तुमची अँप स्वतः करायची इच्छा असेल तर वरील सगळ्या गोष्टी शिका. आणि जर इच्छा नसेल तर कुणा दुसऱ्याकडून ज्याला अँड्रॉइड अँप बनवता येते त्याकडून तुमच्या कंपनीसाठी किंवा स्वतःसाठी अँप बनवून घ्या.
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0
answers