2 उत्तरे
2
answers
त्सुनामी कशा असतात?
1
Answer link
सुनामी
सुनामी किनाऱ्याला धडकताना
सुनामी (जपानी: 津波 ; रोमन लिपी: Tsunami ;) म्हणजे समुद्र किंवा सरोवरातील पाणी वेगाने आणि मोठ्या प्रमाणात स्थानांतरीत होते. त्यावेळी निर्माण होणाऱ्या लाटांची मालिका होय. भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक किंवा उल्कायांमुळे सुनामी निर्माण होवू शकतात. इ.स. २००४ हिंदी महासागर भूकंप व सुनामी हा रविवार, २६ डिसेंबर इ.स. २००४ रोजी ००:५८:५३ यूटीसी वाजता (०६:२८:५३ वाजता भारतीय प्रमाणवेळेनुसार) एक समुद्राखालील भूकंप होता. रिश्टर स्केलवर Mw 9.1–9.3 इतक्या क्षमतेवर मोजल्या गेलेल्या ह्या भूकंपाचे केंद्र इंडोनेशिया देशाच्या सुमात्रा बेटाच्या पश्चिमेकडे हिंदी महासागरामध्ये होते. भूकंपमापन यंत्रावर मोजला गेलेला आजवरचा हा जगामधील तिसऱ्या क्रमांकाचा मोठा भूकंप आहे. ह्या भूकंपानंतर उसळलेल्या सुनामीमुळे इंडोनेशिया, श्री लंका, भारत व थायलंडसह १४ देशांमधील २.३ लाख लोक मृत्यूमुखी पडले. जगामधील सर्वात प्रलयंकारी नैसर्गिक संकटांमध्ये ह्या भूकंपाचा समावेश होतोUpdated by Omprakashji Korde "....

सुनामी किनाऱ्याला धडकताना तयार होणारी मोठी लाट
सुनामी हा जपानी शब्द असून त्याचा अर्थ "बंदरातील लाटा" ( त्सु 津- बंदर, नामी 波 - लाटा ) असा आहे. हा शब्द कोळ्यांत प्रचलीत होता. मासेमारी करून परत आलेल्या कोळ्यांना संपूर्ण बंदर नाश पावलेले दिसे, पण समुद्रात लाटा दिसत नसत; त्यामुळे हे नाव देण्यात आले.
किनाऱ्यापासून दूर समुद्रात या लाटांची उंची जास्त नसते पण तरंगलांबी जास्त असते. त्यामुळे त्या दिसून येत नाहीत. परंतु जेव्हा या लाटा किनाऱ्याला धडकतात त्यावेळी त्यांची उंची वाढते व तरंगलांबी कमी होते, त्यामुळे पाण्यातील शक्ती किनाऱ्यावर आदळून नुकसान होते. खोल समुद्रामध्ये सुनामीची तरंगलांबी २०० कि.मी. व तरंगउंची १ मीटर असते. त्यावेळी वेग साधारण ताशी ८०० कि.मी. असतो.सुनामी किनाऱ्याला धडकताना त्यांचा वेग व ताकद धडक देते व नुकसान घडते.
0
Answer link
त्सुनामी (Tsunami) म्हणजे समुद्राच्या लाटांची मालिका. ह्या लाटा मोठ्या लांबीच्या आणि मोठ्या उंचीच्या असतात.
त्सुनामी येण्याची कारणे:
- भूकंप: समुद्राच्या तळाशी भूकंप झाल्यास त्सुनामी येतात.
- ज्वालामुखी: समुद्रातील ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे त्सुनामी येतात.
- भूस्खलन: समुद्रात भूस्खलन झाल्यास त्सुनामी येऊ शकतात.
- meteorites: उल्का crash मुळे त्सुनामी येतात.
त्सुनामीची वैशिष्ट्ये:
- त्सुनामी लाटांची लांबी खूप जास्त असते, काहीवेळा १०० किलोमीटर पेक्षा जास्त.
- खुल्या समुद्रात त्सुनामीची उंची कमी असते, त्यामुळे त्या सहज लक्षात येत नाहीत.
- किनाऱ्याजवळ आल्यावर त्सुनामीची उंची वाढते आणि ती विध्वंसक रूप धारण करते.
- त्सुनामीमुळे समुद्राच्या पाण्याची पातळी अचानक वाढते आणि किनारी भागात पाणी शिरते.
त्सुनामी एक नैसर्गिक Hazard आहे, ज्यामुळे खूप नुकसान होऊ शकते.
अधिक माहितीसाठी: