4 उत्तरे
4
answers
मुंग्यांबद्दल माहिती मिळेल का?
25
Answer link
*_मुंग्याबद्दल काही विशेष माहिती_*
मुंग्या हा कीटक आपल्या चांगलाच परिचयाचा आहे. उन्हाळ्यात, पावसाळ्यात या मुंग्यांच्या झुंडीच्या झुंडी घराघरातून दिसतात. मुंग्या एका ठिकाणी साठविलेले अन्न दुसरीकडे नेताना पाहिल्या की हमखास पाऊस येणार असा होरा बांधला जातो व तो खराही आहे. तोंडात कसला ना कसला अन्नाचा कण, मेलेली झुरळे, बारीक किडे धरून कुठेही न थांबता व न थकता सतत धावपळ करणार्या मुंग्या तसा कुतुहलाचा विषय आहे. मात्र आपल्याला या मुंग्याविषयी फारच थोडी माहिती असते.
🐜 *मुंग्यांचे विश्व फारच मनोरंजक आहे ते थोडक्यात जाणून घेऊ या.*
🐜 जगात १२ हजार प्रकारच्या मुंग्या आहेत. आपण नेहमी लाल व काळ्या रंगाच्या मुंग्या पाहतो पण हिरव्या रंगाच्या मुंग्याही असतात. मुंगी दिसते एवढीशी पण तिच्या वजनाच्या २० पट अधिक वजन ती वाहून नेऊ शकते.
🐜 मुंग्यांमध्ये एक राणी मुंगी असते तिला पंख असतात. राणी मुंगी लाखो अंडी घालते. मुंग्यांचे सरासरी आयुष्य २८ वर्षांचे असते तर राणी मुंगीचे आयुष्य सरासरी ३० वर्षांचे असते.
🐜 मुंग्यांना कान नसतात. जमिनीच्या कंपनांवरून त्या अंदाज घेतात. मुंग्या एकमेकींशी लढल्या तर ही लढाई आर या पार होते. म्हणजे कुणा एकाचा मृत्यू होईपर्यंत ती थांबत नाही.
🐜 मुंग्या एकाच रांगेत चालतात. कारण त्यांच्यामधून एक प्रकारचा पातळ पदार्थ बाहेर पडतो व त्याचा वेध घेऊनच मागच्या मुंग्या चालतात. मेलेल्या मुंगीच्या शरीरातून एक प्रकारचे रसायन पाझरते त्यावरून बाकी मुंग्या ती मेल्याचे जाणतात. विशेष म्हणजे हे रसायन जिवंत मुंगीच्या अंगावर टाकले तरी बाकीच्या मुंग्या ती मेली असेच मानतात.
🐜 अन्नाची साठवण फक्त माणूस व मुंग्याच करतात. मुंगीच्या शरीराची रचना अशी असते की विमानातून तिला खाली फेकली तरी तिला जखम होत नाही. मुंग्या झोपत नाहीत. पाण्यातही त्या २४ तास जिवंत राहतात. मुंग्याना दोन पोटे असतात. एक स्वतःसाठी तर दुसरे दुसर्यासाठी अन्न साठवते.
🐜 पृथ्वीवरील माणसांचे एकत्र जेवढे वजन होईल तेवढ्याच वजनाच्या मुंग्या पृथ्वीवर आहेत. डायनोसोरच्या काळातही मुंग्या होत्याच.
8
Answer link
मुंगी हा एक सहा पायाचा अतिशय छोटा कीटक आहे. मुंग्या नेहमी समूहामध्ये राहतात.
लाल व काळ्या अश्या दोन प्रकारच्या मुंग्या असतात. त्यांच्या निवासस्थानाला वारूळ असे म्हणतात. ते सहसा मातीचे असते. परंतु काही प्रजातीतील मुंग्या झाडावर वेगळ्या साहित्याचा वापर करूनही वारुळे बांधतात.
शिकारीसाठी व अन्य शत्रूंपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी मुंगी चावा घेते किंवा फॉरमिक ॲसिड उडवते. हे अँसिड माणसासाठी फार हानिकारक नसते.
मुंगीला ६ पाय, डोके आणि त्यावर २ ॲन्टेना, २ डोळे, छाती व पोट असते. पोटात फॉरमिक अँसिडची एक थैली असते.
लाल व काळ्या अश्या दोन प्रकारच्या मुंग्या असतात. त्यांच्या निवासस्थानाला वारूळ असे म्हणतात. ते सहसा मातीचे असते. परंतु काही प्रजातीतील मुंग्या झाडावर वेगळ्या साहित्याचा वापर करूनही वारुळे बांधतात.
शिकारीसाठी व अन्य शत्रूंपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी मुंगी चावा घेते किंवा फॉरमिक ॲसिड उडवते. हे अँसिड माणसासाठी फार हानिकारक नसते.
मुंगीला ६ पाय, डोके आणि त्यावर २ ॲन्टेना, २ डोळे, छाती व पोट असते. पोटात फॉरमिक अँसिडची एक थैली असते.
0
Answer link
मुंग्या:
मुंग्या या कीटकांच्या Formicidae कुळातील आहेत आणि त्या मधमाशी आणि गांधीलमाशी यांच्याशी संबंधित आहेत. त्या सामाजिक कीटक आहेत आणि वसाहतींमध्ये राहतात. मुंग्या जगभरात आढळतात आणि त्यांची 12,000 पेक्षा जास्त प्रजाती आहेत.
मुंग्यांची शारीरिक रचना:
- मुंग्यांना सहा पाय असतात.
- त्यांच्या शरीराचे तीन भाग असतात: डोके, छाती आणि पोट.
- मुंग्यांना दोन अँटेना असतात, ज्यांचा उपयोग ते वास घेण्यासाठी आणि स्पर्श करण्यासाठी करतात.
- मुंग्यांना मोठे जबडे असतात, ज्यांचा उपयोग ते अन्न खाण्यासाठी आणि घरटे बांधण्यासाठी करतात.
मुंग्यांचे जीवनचक्र:
- अंडी: राणी मुंगी अंडी घालते.
- लार्वा: अंड्यातून लार्वा बाहेर येतो. लार्वा आंधळा आणि पाय नसलेला असतो.
- प्युपा: लार्वा प्युपात रूपांतरित होतो. प्युपा स्थिर असतो आणि काही खात नाही.
- प्रौढ: प्युपातून प्रौढ मुंगी बाहेर येते.
मुंग्यांचे वर्तन:
- मुंग्या सामाजिक कीटक आहेत आणि वसाहतींमध्ये राहतात.
- प्रत्येक वसाहतीत एक राणी मुंगी असते, जी अंडी घालते.
- कामकरी मुंग्या अन्न गोळा करतात आणि घरटे बांधतात.
- सैनिक मुंग्या वसाहतीचे शत्रूंपासून संरक्षण करतात.
- मुंग्या एकमेकांशी संवाद साधण्यासाठी रासायनिक संदेशांचा वापर करतात.
मुंग्यांचे महत्त्व:
- मुंग्या परिसंस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहेत.
- त्या मातीला हवा खेळती ठेवण्यास मदत करतात.
- त्या बियाणे पसरवण्यास मदत करतात.
- त्या इतर कीटकांना खातात.
मुंग्यांच्या काही प्रजाती:
- लाल मुंगी
- काळ्या मुंगी
- सुतार मुंगी
- अग्निशमन मुंगी
मुंग्याUseful URLs: