लैंगिक आरोग्य लैंगिकता

सेक्स करणे चांगले की वाईट?

4 उत्तरे
4 answers

सेक्स करणे चांगले की वाईट?

21
★खालील माहिती संकलित आहे.★

दोन व्यक्तींमध्ये होणारे लैंगिक संबंध म्हणजे सेक्स. यामध्ये विविध प्रकारच्या लैंगिक क्रियांचा समावेश होतो. शारीरिक जवळीक, स्पर्श, प्रणय आणि संभोग अशा विविध प्रकारे लैंगिक संबंध ठेवले जातात. संभोग म्हणजे लैंगिक इंद्रियांचे मिलन. यासोबतच मुखमैथुन, गुदामैथुन हेही संभोगाचे इतर काही प्रकार आहेत.

तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या जास्त जवळ जावंसं वाटत असतं किंवा जेव्हा तुम्ही लैंगिकदृष्ट्या उत्तेजित झालेले असता तेव्हा तुम्ही सेक्स करता किंवा तुम्हाला सेक्स करण्याची इच्छा निर्माण होते. सेक्स करण्यामध्ये, प्रेम करण्यामध्ये आणि शरीर संबंध ठेवण्यामध्ये पाप किंवा घाण असं काही नाही. आपली जवळीक आपण या क्रियांमधून व्यक्त करत असतो. मात्र ही जवळीक दोन्ही जोडीदारांच्या संमतीने व्हायला हवी.

विविध संस्कृतींमध्ये सेक्सविषयी, शरीर संबंधांविषयी काही लिखित अलिखित नियम असतात. सेक्सविषयी आपण मोकळेपणाने बोलू शकतो का नाही, त्या क्रियेबद्दल आपल्या मनात कोणत्या प्रकारच्या भावना निर्माण होतात यावर आपल्या समाजातल्या नीतिनियमांचा परिणाम होत असतो. पण सेक्स करण्याची भावना ही अगदी आदिम भावना आहे आणि त्यात घाण असं काही नाही हे मात्र आपण लक्षात ठेवलं पाहिजे.

उत्तर लिहिले · 25/12/2017
कर्म · 123540
19
आपल्या देशात सेक्सवर बोलणं एक वाईट गोष्ट काहींच्या मते मानली जाते, पण एका संशोधनानुसार सेक्स आयुष्यात महत्वाचा आहे, त्यामुळे तुम्हाला चांगलं आरोग्य देखील लाभतं, ब्लड प्रेशरमध्ये सुधार होतो, कोलेस्ट्रॉल सुधारण्यास मदत होते, सर्वेनुसार सेक्समुळे हार्टअटॅकची शंका कमी होते. 

चांगला सेक्स केल्याने ताण तणाव कमी होतो. नियमित सेक्स करणारी माणसं कमी आजारी पडतात. नियमित सेक्स केल्याने केवळ शारीरिक नव्हे, तर मानसिक रूपानेही व्यक्ती फिट राहते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो सेक्स
एका शोधानुसार सेक्स करण्याआधी काही वेळ आधी व्यायाम केल्याने आरोग्यावर सकारात्मक प्रभाव पडतो. यासोबत तुम्हाला आल्हाददायक आणि उर्जा आल्यासारखं वाटेल. चांगलं आरोग्य राखण्यासाठी सेक्स महत्वाचा ठरतो. सेक्स शरीराराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो, ज्यामुळे तुम्ही कमीत कमी वेळ आजारपणाचा सामना करतात.

कामेच्छा वाढवणारा
सेक्स तुम्हाला फक्त भरपूर आनंद देत नाही, तर तुमची कामेच्छा देखील वाढवतो. महिलांमध्ये सेक्स दरम्यान सेक्स योनी स्नेहक आणि रक्त संचार वाढवतो, महिला याद्वारे फक्त आनंद घेतात एवढं म्हणण्यापेक्षा त्या शारीरीक रूपाने अधिक सदृ्ढ देखील राहतात.
 
महिलाच्या ब्लेडर कंट्रोलमध्ये मदतशीर
सेक्स महिलांसाठी अनेक बाबतीत महत्वाचा आहे, यामुळे महिलांचं ब्लाडर कंट्रोल म्हणजेच मूत्राशय नियंत्रणाची क्षमता वाढत जाते. सेक्स महिलांच्या मांसपेशीच्या मजबुतीतही सहाय्यत ठरतो. सेक्स दरम्यान महिला ओरगाज्म पूर्णपणे प्राप्त करतात, यामुळे हा स्त्राव मासपेशींनी मजबूत करण्यास सहाय्यक ठरतो.
 
ब्लड प्रेशर कमी करतो सेक्स
नवीन संशोधनानुसार सेक्स आणि ब्लड प्रेशरचं आपआपसात एक संबंध असतो, सेक्स ब्ल़ड प्रेशर संतुलित करतं, ब्ल़ड प्रेशर कमी करण्यात सेक्सची महत्वाची भूमिका असते. 

 

सेक्स एक सर्वोत्तम व्यायाम
व्यायाम आणि सेक्स हे एकमेकांसाठी पूरक मानले जातात, व्यायामाने तुम्हाला उत्साहीत वाटतं, तर सेक्स तन-मनचा उत्साह वाढवण्यास मदत करतो. चांगल्या सेक्ससाठी सकारात्म विचार महत्वाचा आहे. सेक्स एका प्रकारे तुमच्या शरीरात, सकारात्मक विचार रूजवतो. सेक्समुळे मिनिटाला पाच कॅलरीज बर्न होतात. यामुळे रोगाची प्रतिकारशक्ती वाढते, आणि तुमच्या आजारी पडण्याचं प्रमाण कमी होत जातं. सेक्स शरीरारासाठी व्यायामाची भूमिका पार पाडतो, याचा फायदा शरीराला सर्व बाजुंनी होत असतो. 

हार्ट अटॅक कमी करतो सेक्सचा धोका
सेक्स तुमच्या ह्रदयासाठीही फारच उपयोगी आहे. सेक्स करत राहत असतांना हार्ट अटॅकचा धोका कमी होतो, नियमित सेक्स हार्ट अटॅक आणि स्ट्रोकती शक्यता निम्याने कमी होते. सेक्स करत राहिल्याने एस्ट्रोजन आणि टेस्टोस्टेरॉन संतुलित राहतं. जाणकारांच्या मते एका आठवड्यात दोन वेळा सेक्स केल्याने हार्ट अटॅकची शक्यता निम्याने कमी होते.

दुखणी गायब करतो सेक्स
सेक्स शरीराची अनेक दुखणी कमी करतो, सेक्स एक्सपर्टच्या मते एस्पिरिनची गोळी घेण्यापेक्षा सेक्स जास्त लाभदायक आहे. यामुळे शरीरारातील दुखणी कमी करण्यासाठी सेक्स गोळ्यांपेक्षाही जास्त लाभदायक मानला जातो. 

प्रोस्टेट कॅन्सरची शक्यता कमी करतो सेक्स
सेक्स करण्याने तुम्ही फक्त फिटच राहत नाही, तर प्रोस्टेट कॅन्सरचा धोकाही सेक्स कमी करतो. पुरूष जे महिन्यात २१ वेळा सेक्स करतात, त्या व्यक्तीची प्रोस्टेट कॅन्सरची शक्यता कमी होते.

चांगल्या झोपेसाठी मदत
सेक्स दरम्यान आनंद मिळत असला तरी मोठ्या प्रमाणात थकल्यासारखं होतं. ज्यामुळे चांगली झोप मिळते, पुरूषांना सेक्स केल्यानंतर लगेच झोप येते. सेक्स दरम्यान पुरूषांच्या शरीरात ओक्सिटोसीन हार्मोन आणि प्रोलेक्टिन हार्मोनचा स्त्राव वाढत जातो. ओक्सिटोसीन हार्मोन पुरूषांना आरामाचा अनुभव देतो, तर प्रोलेक्टिन हार्मोनमुळे पुरूषांना चांगली झोप येते.

तणाव कमी करण्यास सहाय्यक
सेक्स नेहमीच तणाव कमी करतो, सेक्स करतांना प्रेमाचा स्पर्श, गळा भेट, सेक्सचा आनंद शरीरात फील गुड हार्मोन शरीरात तयार करतो. यामुळे मनाचा तनाव कमी होत जातो. मनाला शांती मिळते. सेक्सने मनाला शांती मिळते, एक दुसऱ्यासोबत भेट झाल्याने तणाव कमी होतो, एक अपूर्व आनंद मिळतो, यामुळे सेक्स तणाव दूर करण्यास मदत करतो.

राजे
उत्तर लिहिले · 20/4/2018
कर्म · 65405
0
लैंगिक संबंध चांगले की वाईट, हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते, जसे की तुमची नैतिकता, संस्कृती, धार्मिक श्रद्धा आणि वैयक्तिक मूल्ये.
लैंगिक संबंधांचे फायदे:
  • शारीरिक आरोग्य: लैंगिक संबंधातून शारीरिक व्यायाम होतो, रक्तदाब कमी होतो आणि रोगप्रतिकारशक्ती सुधारते.
  • मानसिक आरोग्य: लैंगिक संबंधातून आनंद मिळतो, तणाव कमी होतो आणि आत्मविश्वास वाढतो.
  • सामाजिक संबंध: लैंगिक संबंधातून दोन व्यक्तींमधील जवळीक वाढते आणि प्रेम निर्माण होते.
लैंगिक संबंधांचे तोटे:
  • लैंगिक संक्रमित रोग (STI): असुरक्षित लैंगिक संबंधातून लैंगिक संक्रमित रोगांचा धोका वाढतो.
  • अनपेक्षित गर्भधारणा: लैंगिक संबंधातून अनपेक्षित गर्भधारणा होऊ शकते, ज्यामुळे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक समस्या निर्माण होऊ शकतात.
  • भावनिक गुंतागुंत: लैंगिक संबंधातून भावनिक गुंतागुंत निर्माण होऊ शकते, खासकरून जर दोन व्यक्तींमध्ये समान विचार आणि भावना नसेल तर.
निष्कर्ष: लैंगिक संबंध चांगले आहेत की वाईट, हे तुमच्या वैयक्तिक परिस्थितीवर अवलंबून असते. सुरक्षित लैंगिक संबंध ठेवणे आणि त्याचे संभाव्य धोके टाळणे महत्त्वाचे आहे.
उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 1700

Related Questions

सेक्स म्हणजे काय अर्थ सांगा?
निसर्ग कर्माविरुद्ध संभोग?
भिन्न लैंगिकता संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा?
लैंगिक विषयासंबंधी प्रश्न विचारले तर चालेल काय?
मला रोज सेक्स करावे वाटते?
लाडकी को सेक्स मे माझा आता हे?
स्त्रीच्या शरीरात आपण काय बघतो? मरेपर्यंत बघून सुद्धा इच्छा पूर्ण का होत नाही?