3 उत्तरे
3 answers

मराठी किबोर्ड कसा वापरायचा?

8
कॉम्पुटर वर मराठी टाइपिंग:

कॉम्पुटर वर मराठी टाईप करण्यासाठी गुगल चे फ्रीसॉफ्टवेअर आहे. ते इन्स्टॉल करून तुम्ही कॉम्पुटर/लॅपटॉप वर मराठी टाईप करू शकता.

विंडोज कॉम्पुटरवर मराठी टाईप करण्यासाठी स्टेप्स:


१. गुगल चे सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी या लिंक वर क्लीक करा:  Google Input Tools

२. लिंक ओपन झाल्यावर मराठी भाषा सिलेक्ट करा आणि डाउनलोड बटनावर क्लिक करा.

३. डाउनलोड झालेले सॉफ्टवेअर इंस्टाल करा, इन्स्टॉलेशन नंतर मराठी भाषेचा ऑप्शन तुमच्या कॉम्पुटर वर आलेला असेल.

४. Windows Key + Space Bar दाबून तुम्ही मराठी भाषा सिलेक्ट करा.

५. आणि मराठी टाईप करायला सुरवात करा. जसे कि "नमस्ते" लिहायचे असेल तर "Namaste" असे टाईप केल्यास ते आपोआप मराठीत "नमस्ते" असे कन्व्हर्ट होईल.


मोबाईल वर मराठी टाइपिंग:

अँड्रॉइड फोन वर मराठी टाइपिंग करण्यासाठी Google Indic Keyboad हे अधिकृत अँप गुगल ने डेव्हलप केलेले आहे.

१. या लिंक वर क्लीक करून ते अँप इन्स्टॉल करा: Google Indic Keyboard

२. इन्स्टॉल केलेले अँप ओपन करा

३. त्यात तुम्हाला हे अँप कीबोर्ड म्हणून सेट करायचा ऑप्शन येईल. तो ऑप्शन सेट करा

४. नंतर जेव्हा तुम्ही टाईप करण्यासाठी कीबोर्ड वरती येईल तेव्हा कीबोर्ड मध्ये "ळ" किंवा दुसऱ्या देवनागरी अक्षराची टॅब दिसेल.




५. यातून मराठी भाषा सिलेक्ट करा 


६. आता तुम्ही "Namaste" टाईप केले कि ते "नमस्ते" असे टाईप झालेले असेल.
उत्तर लिहिले · 7/12/2017
कर्म · 5360
0
अँड्रॉइड मोबाईलवर मराठीत पटापट लिहायचे असेल तर? मी गेले काही वर्षे SwiftKeybord वरून लिहितो. यामध्ये पुढचा शब्द काय लिहिणार तो तीन ऑप्शन्स समोर देतो.





उत्तर लिहिले · 7/12/2017
कर्म · 70
0

मराठी कीबोर्ड वापरण्याचे अनेक मार्ग आहेत, त्यापैकी काही खालीलप्रमाणे:

1. इनस्क्रिप्ट (Inscript) कीबोर्ड:
  • हा भारत सरकारद्वारे प्रमाणित कीबोर्ड लेआउट आहे.
  • Windows आणि Linux ऑपरेटिंग सिस्टममध्ये तो डिफॉल्ट असतो.
  • तुम्ही तुमच्या ऑपरेटिंग सिस्टमच्या सेटिंग्जमध्ये जाऊन तो सक्रिय करू शकता.
  • इनस्क्रिप्ट कीबोर्ड लेआउटमध्ये, अक्षरे विशिष्ट ठिकाणी असतात, त्यामुळे थोडा सराव आवश्यक आहे.
2. फोनेटिक (Phonetic) कीबोर्ड:
  • यामध्ये, तुम्ही इंग्रजी अक्षरे वापरून मराठी शब्द टाइप करता आणि सॉफ्टवेअर ते मराठीमध्ये रूपांतरित करते.
  • Google Input Tools, Lipikaar, आणि Quillpad सारखे अनेक ऑनलाइन आणि ऑफलाइन फोनेटिक कीबोर्ड उपलब्ध आहेत.
  • हे वापरण्यास सोपे आहे कारण ते उच्चारानुसार टाइप करण्याची सुविधा देते.
3. ऑनलाइन मराठी कीबोर्ड:
  • जर तुम्हाला फक्त काही वेळाच मराठी टाइप करायचे असेल, तर तुम्ही ऑनलाइन मराठी कीबोर्ड वापरू शकता.
  • Google Translate, Marathi Typing ([https://www.marathityping.com/](https://www.marathityping.com/)) आणि Quillpad ([https://quillpad.in/marathi-typing/](https://quillpad.in/marathi-typing/)) सारख्या वेबसाइट्सवर हे उपलब्ध आहेत.
4. मोबाइल कीबोर्ड:
  • Android आणि iOS साठी अनेक मराठी कीबोर्ड ॲप्स उपलब्ध आहेत.
  • Google Indic Keyboard, Lipikaar आणि Swiftkey हे लोकप्रिय ॲप्स आहेत.
  • तुम्ही ते डाउनलोड करून वापरू शकता.

तुम्ही तुमच्या गरजेनुसार कोणताही पर्याय निवडू शकता. सुरुवातीला थोडा सराव केल्यास तुम्हाला मराठी टाइप करणे सोपे जाईल.

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 1920

Related Questions

मराठी लेखन करण्यासाठी कोणते कळफलक योग्य आणि आदर्श आहे?
मराठी कीबोर्ड अंक?
ISM वर ग्य कसे टाइप करतात??
लॅपटॉपवर मराठीमध्ये सहज टाईप करता येईल असे काय आहे?
कॉम्प्युटरमध्ये टाइप करताना मध्येच जर आपल्याला मराठी टाइप करायचे असेल तर कसे करावे?
मला मराठी व इंग्रजी टायपिंग करायचे आहे, तर याबद्दल काही माहिती देऊ शकाल का?
गुगल इंडिक कीबोर्ड सेटिंग कशी करतात?