3 उत्तरे
3
answers
नायब तहसीलदार म्हणजे कोण असतो? त्याची कार्ये कोणती?
5
Answer link
नायब तहसीलदार :-
महाराष्ट्र जमीन महसूल कायदा १९६६ अन्वये राज्य शासन प्रत्येक तालुक्यासाठी एक किंवा जास्त नायब तहसीलदारांची नेमणूक करू शकते. तहसीलदारास करावी लागणारी कामेच नायब तहसीलदारांना पार पाडावी लागतात. कामांचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे-
– तहसीलदार पातळीवर घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी नायब तहसीलदार करतात.
– महसूल अधिकारी म्हणून महसूल वसुली, बिगरशेती परवाने देणे इ.बरोबर जातीचे, रहिवासाचे दाखले देणे ही काय्रे नायब तहसीलदाराला पार पाडावी लागतात.
– शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी दंडाधिकारी म्हणून काही न्यायिक अधिकार नायब तहसीलदाराला देण्यात आले आहेत.
– महसुली कामकाजांतर्गत अर्धन्यायिक अधिकारी म्हणून नायब तहसीलदार काम पाहतात.

अजित खंदारे
4
Answer link
नायब तहसीलदार हे प्रशासनातील एक महत्त्वाचे पद आहे. नायब तहसीलदार या अधिकाऱ्या विषयी तुम्ही कधीतरी नक्कीच ऐकले असेल. आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की नायब तहसीलदार म्हणजे काय, तर मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण नायब तहसीलदार विषयी माहिती (Naib Tahasildar information in marathi) जाणून घेणार आहोत.
0
Answer link
नायब तहसीलदार हे महाराष्ट्र शासनातील एक महसूल अधिकारी पद आहे. ते तहसीलदार यांच्या अंतर्गत काम करतात.
नायब तहसीलदाराची कार्ये:
- महसूल वसुली: नायब तहसीलदार त्यांच्या कार्यक्षेत्रातील शेतसारा, जमीन महसूल आणि इतर शासकीय देणी वसूल करतात.
- जमीन अभिलेख व्यवस्थापन: जमिनीच्या नोंदी अद्ययावत ठेवणे, जमिनीच्या मालकी हक्कांमध्ये बदल करणे आणि त्या संबंधित अभिलेखांचे व्यवस्थापन करणे ही त्यांची जबाबदारी आहे.
- आपत्ती व्यवस्थापन: नैसर्गिक आपत्तीच्या वेळी नायब तहसीलदार मदत आणि पुनर्वसन कार्यात सक्रिय भूमिका घेतात.
- निवडणूक प्रक्रिया: नायब तहसीलदार निवडणूक प्रक्रियेत मदत करतात.
- कायदा व सुव्यवस्था: नायब तहसीलदार त्यांच्या अधिकारक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला मदत करतात.
- अहवाल सादर करणे: नायब तहसीलदार त्यांच्या कामाचा अहवाल नियमितपणे तहसीलदारांना सादर करतात.
अधिक माहितीसाठी, आपण महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या वेबसाइटला भेट देऊ शकता: https://mahabhumi.gov.in/