शहरांची नावे इतिहास

देवगिरीचे नवीन नाव काय?

3 उत्तरे
3 answers

देवगिरीचे नवीन नाव काय?

1
*🏪 असे झाले देवगिरीचे नाव दौलताबाद* 








————————————————
★माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव कोल्हापूर★
————————————————
  देवगिरी हा किल्ला यादवांनी बांधला. ’देवतांचा पर्वत’ या नावावरून देवगिरी हे नाव पडले असावे, असे इतिहास संशोधक म्हणतात. https://bit.ly/4jilVi2 देवगिरी हे औरंगाबाद जिल्ह्यातील एक गाव आहे. 


इ.स. 12 व्या शतकात बदामीचे चालुक्य, कल्याणचे चालुक्य, मौर्य, सुंगा, सातवाहन, हल(हाला), शक क्षत्रप, सतकर्णी, वाकाटक, नल, विंध्यसेना, प्रवरसेना, राष्ट्रकूट यांच्यानंतर बाराव्या शतकाच्या शेवटच्या 25 वर्षांत देवगिरीच्या यादवांचा उदय खानदेश परिसरात झाला. पहिल्या सेऊनचंद्राच्या तेव्हाच्या सेऊनदेशात (आताचा खानदेशात) नाशिक ते देवगिरीचाही समावेश होता. कृष्णा नदीच्या उत्तरेकडे वर्चस्व प्रस्थापित करणा-या या यादव वंशातील भिल्लमा(दुसरा) या राजपुत्राने देवगिरी गावाची स्थापना करून पुढे तेथून राज्य चालवले. पुढे सिघंण्णा व त्यानंतर त्याचा नातू कृष्ण यांनी राज्य वाढवले. या कृष्णाचा भाऊ महादेव याच्या अचूक तारीख 19 ऑगस्ट 1261 अशी असल्याचे निश्चित झाले आहे. त्याने उत्तर कोकणचा प्रदेश आपल्या राज्यास जोडण्यात यश प्राप्त केले आणि गादी आपला मुलगा आमण्णाकडे सोपविली. पण, कृष्णाचा मुलगा रामचंद्राने बंड करून गादी स्वत:कडे खेचली आणि विदर्भ आणि इतरत्रही विजय प्राप्त केले. मात्र, 1296 मध्ये झालेल्या अल्लाउद्दीन खिलजीने कपट करून केलेल्या आकस्मिक हल्ल्यास रामचंद्र तोंड देऊ शकला नाही. हा मुस्लिमांचा दक्षिणेवरचा पहिला हल्ला होता. हा हल्ला धरून एकून तीन हल्ले देवगिरीवर झाले. त्यात अनुक्रमे रामदेवराय, शंकरदेव आणि हरपालदेव यांचा पराभव होउन देवगिरीवर मुस्लिम शासन सुरू झाले. पुढे महंमद-बीन-तुघलक ह्याने त्याचे दौलताबाद असे नामांतर केले. 𝔐𝔞𝔥𝔦𝔱𝔦 𝔰𝔢𝔳𝔞 𝔤𝔯𝔬𝔲𝔭 𝔭𝔢𝔱𝔥𝔳𝔞𝔡𝔤𝔞𝔬𝔫यादव राजवंशाने या किल्ल्याचे निर्माण केले. पेशवाईतील 2 वर्षे सोडता हा किल्ला आणि आजूबाजूचा प्रदेश पूर्णकाळ मुस्लीम शासकांच्या ताब्यात होता.नकिल्ल्याची रचना इतकी अभेद्य आहे. त्यामुळेच तो अपराजित आहे. यावर जो कब्जा मिळवला गेला तो फक्त कपट कारस्थाने आणि फंदफितुरीनेमुळेच. 
देवगिरी किल्ल्याचे प्रवेशद्वार हत्तींच्या धडकेनेही तुडणार नाही असे होते. त्यासाठी दारावर महाकाय खिळे लावलेले होते. या किल्ल्यामधे बरेच दरवाजे आहेत आणि त्यांच्या दिशा आणी त्यांच्यामधली अंतरे अशा प्रकारे ठेवली आहेत की शत्रुला हल्ला करणे आणि रणनीती ठरवणे एकदम अशक्य होऊन जावे. मुख्य महादरवाज्यातून आत आल्यावर ब-याच तोफा मांडून ठेवल्या आहेतकिल्ल्याची रचना इतकी अभेद्य आहे. त्यामुळेच तो अपराजित आहे. 
यावर जो कब्जा मिळवला गेला तो फक्त कपट कारस्थाने आणि फंदफितुरीनेमुळेच. देवगिरी किल्ल्याचे प्रवेशद्वार हत्तींच्या धडकेनेही तुडणार नाही असे होते. त्यासाठी दारावर महाकाय खिळे लावलेले होते. या किल्ल्यामधे बरेच दरवाजे आहेत आणि त्यांच्या दिशा आणी त्यांच्यामधली अंतरे अशा प्रकारे ठेवली आहेत की शत्रुला हल्ला करणे आणि रणनीती ठरवणे एकदम अशक्य होऊन जावे. मुख्य महादरवाज्यातून आत आल्यावर ब-याच तोफा मांडून ठेवल्या आहेत. https://whatsapp.com/channel/0029VaPJhXL84Om4z32l8I24


0
दौलताबाद हे नवीन नाव आहे.
'देवगिरी (अथवा दौलताबाद) 'हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील एक गाव असून येथे यादवकालीन ऐतिहासिक किल्ला आहे.
उत्तर लिहिले · 12/10/2017
कर्म · 955
0

देवगिरीचे नवीन नाव दौलताबाद आहे.

दिल्लीचा सुलतान मुहम्मद बिन तुघलक याने 1327 मध्ये देवगिरीला आपली राजधानी बनवली आणि तिचे नाव दौलताबाद ठेवले.

संदर्भ:

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 2200

Related Questions

भारतावर सर्वात जास्त राज्य कोणी केले?
भारतातील सर्वात मोठा योद्धा कोण होता?
महाराष्ट्राचा सर्वात मोठा योद्धा कोण होता?
माझगाव विषयी माहिती लिहा. तुम्हाला माहीत असलेल्या गुरु-शिष्यांच्या जोड्या लिहा.
जाधवांच्या अनेक शाखा आहेत, त्या कोणत्या कोणत्या आहेत?
कुंभारलीच्या जाधवांचा देवगिरीच्या यादवांशी किंवा लखुजीराव जाधवांच्या कोणत्या शाखेशी संबंध आहे का?
पूर्वीपासूनची वंशावळ कशी शोधावी?