2 उत्तरे
2 answers

गुमास्ता परवाना कसा काढायचा?

1
तुमचा प्रश्न आहे की गुमास्ता परवाना कसा काढायचा? ( कृपया प्रश्न विचारताना मराठी कीबोर्ड चा वापर करा, ह्या वेळी तुमच्या प्रश्नाचें उत्तर देत आहे)

. शॉप अधिनियम लायसेन्स / व्यवसाय परवाना

नगरपालिका महानगरपालिका क्षेत्रात व्यवसाय करते वेळी व्यवसाय अधिकृत असल्याचे प्रमाणपत्र म्हणजे शॉप अधिनियम लायसेन्स होय.कोणत्याही व्यवसायाची कायदेशीर सुरुवात शॉप अधिनियम लायसेन्सने होते.दुकानाच्या नावाने बँकेत खाते उघडण्यासाठी व व्यायसायिक कर्ज प्रकरणे करण्यासाठी शॉप अधिनियम महत्वाचे दाखला ठरतो. व्यावसायिकाला विविध शासकीय व खाजगी टेंडर / निविदा भरते वेळी व्यवसायच अधिकृत असल्याचे प्रमाणपत्र जरुरी असते.त्याच प्रमाणे विविध कंपनीच्या तालुका स्तरावरील एजन्सीज मिळविण्यासाठी व्यवसाय दाखला व कमर्शिअल गाळे,दुकानाचा विमा इ.सेवांचा लाभ घेण्यासाठी शॉप अधिनियम महत्वाचे ठरते. शॉप अधिनियम धारकांनाच मुल्यवर्धित कर नंबर काढता येतो. ग्रामपंचायत क्षेत्रात शॉप अधिनियमाची आवश्यकता नसते परंतु गावाची लोकसंख्या १० हजारपेक्षा जास्त असल्यास शॉप अधिनियम लागते.

शॉप अधिनियम / व्यवसाय दाखला प्राप्त करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :-

जेथे व्यवसाय सुरु आहे किंवा करावयाचा आहे.त्या ठिकाणचे / जागेवरील घेतलेले लाईट बिल / टेलीफोन बिलजागा स्वमालकीची असले तर जागेचा उतारा.जागा भाडेतत्वावर असल्यास १०० रु. स्टॅम्प वर मालकाचे समंती पत्र लाईट बिल टेलिफोन बिल नसल्यास समंती पत्रात जागेचे ठिकाणपूर्ण नोंदवावे.दोन फोटो,अर्जदाराचे कुपन झेरॉक्सपॅन कार्ड झेरॉक्स.

उपरोक्त कागदपत्रांची पूर्तता करून नजीकच्या शॉप अधिनियम लायसेन्स प्राप्तीसाठी मार्गदर्शक कर सल्लागार यांच्या मार्फत किंवा सक्षम आपण कामगार सहायक आयुक्त यांच्याकडे प्रस्ताव योग्य चलन व फी जमा करून सादर करावा.प्रस्ताव बिनचूक असल्यास किमान ९ दिवसात शॉप अधिनियम परवाना प्राप्त होतो.सदर दाखला हा दुकानाच्या दर्शनी भागात दिसेल अशा ठिकाणी लावावा.शॉप अधिनियम परवाना हा दर वर्षी १५ डिसेंबर पूर्वी नूतनीकरण करणे आवश्यक असते.नूतनीकरण करते वेळी ओरिजनल परवाना जवळ असावा.शॉप अधिनियम परवान्यावर सुट्टीचा दिवसाचा उल्लेख केलेला असतो.हा सुट्टीचा दिवस देणे व्यावसायिकावर बंधनकारक असते.आठवड्यातील सुट्टीचा दिवस ठरविण्याचा अधिकार व्यवसायिकाला असतो.
उत्तर लिहिले · 28/9/2017
कर्म · 20545
0
गुमास्ता परवाना (Gumasta License) काढण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:

गुमास्ता परवाना म्हणजे काय?

गुमास्ता परवाना हा महाराष्ट्र शासनाकडून दुकाने आणि आस्थापना (Shops and Establishments) कायद्या अंतर्गत दिला जाणारा परवाना आहे. हा परवाना तुमच्या व्यवसाय किंवा दुकानाची नोंदणी दर्शवितो.

आवश्यक कागदपत्रे:

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • व्यवसायाच्या जागेचा पुरावा (उदा. भाडे करार, मालमत्ता कर पावती)
  • व्यवसाय कोणत्या प्रकारचा आहे त्याची माहिती
  • कर्मचाऱ्यांची संख्या आणि त्यांची माहिती
  • अर्जदाराचा फोटो

अर्ज करण्याची प्रक्रिया:

  1. ऑफलाइन अर्ज: तुमच्या এলাকার महानगरपालिका किंवा नगरपालिकेच्या कार्यालयातून गुमास्ता परवान्याForms मिळवा.
  2. ऑनलाइन अर्ज: महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या वेबसाइटवर (mahardhtra.gov.in) ऑनलाइन अर्ज उपलब्ध असतो. महाराष्ट्र शासन
  3. अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे जोडा.
  4. ठरलेली फी भरा.
  5. अर्ज जमा करा.

शुल्क (Fees):

गुमास्ता परवान्यासाठी लागणारी फी तुमच्या व्यवसायाच्या प्रकारावर आणि कर्मचाऱ्यांच्या संख्येवर अवलंबून असते. त्यामुळे अर्ज भरताना नक्की तपासा.

गुमास्ता परवाना नूतनीकरण (Renewal):

गुमास्ता परवान्याची वैधता संपल्यानंतर तो वेळोवेळी नूतनीकरण करणे आवश्यक आहे.

टीप: गुमास्ता परवाना काढण्याची प्रक्रिया थोडीफार बदलू शकते, त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी तुमच्या स्थानिक महानगरपालिका किंवा नगरपालिकेमधूनcurrent माहिती घेणे चांगले राहील.

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 2360

Related Questions

खेड्या गावात कमी खर्चात उत्पन्न जास्त असा कोणता धंदा आहे?
कोणत्या धंद्यामध्ये एक लाख रुपये गुंतवणूक केल्यास चांगला फायदा होईल?
यूएसपी म्हणजे काय?
गोपनीय अहवालाचे महत्त्व थोडक्यात स्पष्ट करा?
कार्यकारी आणि 'मल्टिलेव्हल मार्केटिंग' या संकल्पना आकृतीसह स्पष्ट करा.
कार्यालयाची अंतर्गत रचना स्पष्ट करा?
कार्यालयाचे स्थान निवडताना कोणत्या घटकांचा विचार करणे आवश्यक ठरते ते घटक लिहा?