3 उत्तरे
3
answers
UPSC म्हणजे काय?
14
Answer link
युपीएससी म्हणजे काय?
युपीएससी म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (संघ लोकसेवा आयोग). नागरी प्रशासनाची जबाबदारी सांभाळण्यासाठी आवश्यक सक्षम उमेदवारांची निवड करणारी स्पर्धात्मक स्वरूपाची परीक्षा म्हणजे नागरी सेवा परीक्षा होय. ही अत्यंत महत्त्वाची व प्रतिष्ठेची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर देशाच्या विविध सेवांमध्ये म्हणजे भारतीय परराष्ट्र सेवा, भारतीय पोलीस सेवा यांसारख्या सुमारे 36 सेवांची दालने तरुणांसाठी खुली होऊ शकतात. प्रशासनातील सनदी सेवा पदांची निवड करण्यासाठी संघ लोकसेवा आयोगाद्वारे दरवर्षी किमान 16 प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांचे आयोजन केले जाते. ‘आयएएस’ची परीक्षा म्हणजे महत्त्वाकांक्षी व हुशार विद्यार्थ्यांना विविध कार्यक्षेत्राची दालने उघडणारे महाद्वार आहे.
वेबसाइट - www.upsc.gov.in
देशाच्या कारभाराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बनलेल्या प्रशासनात पात्र व गुणवत्ताधारक उमेदवारच भरती केले जावेत, त्यात कोणत्याही प्रकारची वशिलेबाजी, अथवा अन्य गैरप्रकार होऊ नयेत यासाठी घटनाकर्त्यांनी राज्यघटनेत स्पष्ट तरतूद करून प्रशासकीय सेवापदांच्या भरतीसाठी स्पर्धात्मक परीक्षांचे आयोजन करण्याची जबाबदारी युपीएससी या घटनात्मक संस्थेकडे सोपवली गेली आहे.
केंद्रपातळीवर संघ लोकसेवा आयोग आणि राज्यपातळीवर राज्य लोकसेवा आयोग प्रशासनातील सनदी सेवांच्या भरतीसाठी दरवर्षी स्पर्धा परीक्षांचे आयोजन करून त्यातील पात्र उमेदवारांची यादी शासनाला सादर करतात.
प्रशासकीय पदांसाठी आवश्यक पात्रता निर्धारित करणे, उमेदवाराकडून अर्ज मागवून लेखी व तोंडी परीक्षेद्वारे योग्य उमेदवारांची निवड करण्याची जबाबदारी या आयोगावर असते. ही निवड, गुणवत्तेखेरीज अन्य कोणत्याही निकषांद्वारे होऊ नये, घराणेशाही, वशिलेबाजी व अपात्रतांच्या सेवा प्रवेशाला आळा बसावा हा हेतू या आयोगाच्या निर्मितीमागे आहे. प्रशासकीय अधिकारी पदांची कार्ये व जबाबदारी लक्षात घेऊन त्यांना पर्याप्त वेतन, सेवासुविधा यांची तरतूद आहे, त्यांना भरीव प्रमाणात सत्ता प्रदान केली आहे. परिणामी प्रशासक एका बाजूला लोकप्रतिनिधींना कायदे व धोरणनिर्मितीत सल्ला देण्याचे, तर दुसर्या बाजूला राज्यकर्त्यांनी केलेल्या कायदे-धोरणांची अंमलबजावणी करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पार पाडतात.

0
Answer link
UPSC म्हणजे Union Public Service Commission. याला मराठीमध्ये संघ लोकसेवा आयोग म्हणतात.
UPSC ही एक घटनात्मक संस्था आहे, जी भारत सरकारसाठी विविध पदांवर भरती करते.
UPSC द्वारे घेण्यात येणाऱ्या काही प्रमुख परीक्षा:
- IAS (Indian Administrative Service)
- IPS (Indian Police Service)
- IFS (Indian Foreign Service)
- NDA (National Defence Academy)
- CDS (Combined Defence Services)
UPSC परीक्षा भारतातील सर्वात प्रतिष्ठित परीक्षांपैकी एक मानली जाते.
अधिक माहितीसाठी, आपण UPSC च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता: https://www.upsc.gov.in/