3 उत्तरे
3
answers
चेहऱ्यावर मुरूम खूप वेळापर्यंत राहतात, काय करावे?
6
Answer link
*चेहऱ्यावर मुरूम का येतात?*
वयात येताना किंवा वयात आल्यानंतरही चेहऱ्यावर मुरूम का येतात ?
चेहऱ्यावर मुरूम येण्याची अनेक कारणे आहेत. वाढत्या वयात हार्मोन्स (आंतररस) मध्ये होणारा बदल हे त्यातील मुख्य कारण, याशिवाय चेहऱ्याची कांती जास्त तेलकट असणे, तेलकट पदार्थ जास्त खाणे अशी इतर करणेही असू शकतात. आंतररसाच्या प्रभावाखाली त्वचेचा तेलकटपणा वाढतो. त्या वाढत्या तेलावर त्वचेतील जंतूंची प्रक्रिया होऊन तेल वाहून नेणाऱ्या नळ्या चोंदतात व तेल, पेशी अडवून पुटकुळ्या तयार होतात. त्यात तयार करणाऱ्या जंतूंची वाढ झाली तर पू तयार होतो.
वयात येताना किंवा वयात आल्यानंतर चेहऱ्यावर मुरूम येत असतील तर कोणती काळजी घ्यावी?
वयात येताना किंवा वयात आल्यानंतर चेहऱ्यावर मुरूम येत असतील तर मुला-मुलींना त्याची लाज वाटते. किंबहुना त्यामुळे बरेचदा न्यूनगंड निर्माण होतो. मग हे मुरूम घालविण्याकरिता चेहऱ्यावर अनेक प्रयोग केले जातात. अशा वेळेस कोणत्याही जाहिरातींना बळी न पडता फक्त वारंवार चेहरा स्वच्छ धुवावा. दिवसातून ३-४ वेळा कोमट पाण्यात चिमुटभर मीठ घालून चेहरा स्वच्छ धुणे, तसेच, चेहऱ्याला कडूनिंबाच्या पाल्याचा रस लावणे, केसात कोंडा होऊ न देणे (केसांना दही किंवा लिंबू लावून केस धुतल्याने कोंडा कमी होतो.) जमल्यास डाळीच्या पीठाने चेहरा धुणे इत्यादी घरगुती उपाय करावेत. तसेच बद्धकोष्टता होऊ नये म्हणून भरपूर पालेभाज्या, सालासकट फळे, कडधान्ये खावीत. रोज भरपूर व्यायाम करावा. हे सर्व केल्याने आपली त्वचा निरोगी व तेजस्वी होते. चेहऱ्यावरील मुरुमे फोडू नयेत, नाहीतर त्यात जंतूलागण होते. मुरुमे जास्त असतील तर तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जाहिराती पाहून मलमे, साबण वापरू नये. त्याने अपाय होऊ शकतो.
*संकलित*

श्री नवघरे पाटील यांनी पूष्कळशी माहीती दिलीच आहे.तरीदेखील मी स्वानुभवाने सांगतो की मी तरुण असतांना माझ्या चेहऱ्यावरही मुरुमे यायची.तेव्हा मी आमच्या फँमिली डॉक्टरच्या सांगण्याप्रमाणे चर्निरोड येथील डॉक्टर फर्नांडीस (skin specialist) यांना भेटलो.त्यांनी मला चेहऱ्यावर लावण्यासाठी एक औषध दिले व तेलकट न खाण्याचा व रोज एक फ्रूटप्लेट खाण्याचा सल्ला.दिला.त्याप्रमाणे मी रोज झोपताना चेहऱ्यावर ते औषधत्रलावत असे व रोज एक फ्रूटप्लेट खात असे.असे महीन्याभर केल्यावर माझ्या चेहऱ्यावर मुरूमे येणे कायमचे बंद झाले.दुर्दैवाने मला त्या औचषधाचे नाव आठवत नाही.परंतु मुरूमे येणे कायमचे बंद होण्यासाठी तेलकट पदार्थ (निदान मुरुमे जाईपर्यंत) न खाणे व रोज कमीत कमी एक फ्रूटप्लेट खाणे हा एक चांगला उपाय आहे.
0
Answer link
चेहऱ्यावर मुरूम (Acne) खूप वेळापर्यंत राहिल्यास काही उपाय:
- चेहरा स्वच्छ ठेवा:
- दिवसातून दोन वेळा सौम्य क्लींजरने चेहरा धुवा.
- जास्त घासून चेहरा धुवू नका.
- मुरुमांना स्पर्श करणे टाळा:
- मुरुमांना स्पर्श केल्याने ते आणखी पसरू शकतात.
- योग्य उत्पादने वापरा:
- तेलकट त्वचा असणाऱ्यांसाठी तेल-मुक्त (oil-free) उत्पादने वापरा.
- सॅलिसिलिक ऍसिड (Salicylic acid) किंवा बेंझॉयल पेरोक्साइड (Benzoyl peroxide) असलेले उत्पादने मुरुमांवर प्रभावी असतात.
- मॉइश्चरायझर (Moisturizer) वापरा:
- त्वचा कोरडी होऊ नये म्हणून मॉइश्चरायझर वापरा.
- तेल-मुक्त मॉइश्चरायझर निवडा.
- सनस्क्रीन (Sunscreen) वापरा:
- चेहऱ्याला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचवण्यासाठी सनस्क्रीन वापरा.
- तेल-मुक्त सनस्क्रीन निवडा.
- पुरेशी झोप घ्या:
- दररोज रात्री 7-8 तास झोप घ्या.
- तणाव कमी करा:
- तणाव कमी करण्यासाठी योगा, ध्यान करा.
- आहार:
- प्रथिने (protein) आणि जीवनसत्त्वे (vitamins) युक्त आहार घ्या आणि जंक फूड टाळा.
- डॉक्टरांचा सल्ला घ्या:
- जर मुरूम गंभीर असतील आणि घरगुती उपायांनी फरक दिसत नसेल, तर त्वचारोग तज्ञाचा (dermatologist) सल्ला घ्या.
हे काही सामान्य उपाय आहेत. प्रत्येक व्यक्तीची त्वचा वेगळी असते, त्यामुळे आपल्या त्वचेला suit होणारे उपाय करणे महत्त्वाचे आहे.
Disclaimer: या उपायांनी आराम न मिळाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.