4 उत्तरे
4
answers
गौरी ही गणपतीची कोण असते?
2
Answer link
गौरी ही गणपतीची कोण,
गौरी ही शिवाच्या शक्तीचे आणि गणेशाच्या आईचे रूप मानले गेले आहे.काही ठिकाणी गौरी म्हणजे गणपतीची आई म्हणजेच पार्वती मानली जाते. काही ठिकाणी बहीण किंवा बायकोही मानलं जातं. बऱ्याच भागात गौरी म्हणजे गणपतीची बहीण मानली जाते. म्हणून ती भावाकडे पाहुणचारासाठी येते असं म्हणतात. महाराष्ट्राच्या काही भागात मुखवट्याच्या, फुलांच्या किंवा गौरीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते.
गौरी आवाहनाच्या दिवशी गौरींना घरी आणलं जातं. त्यांना तुळशी वृंदावना जवळून घरात आणतात. तेव्हा लक्ष्मी प्रमाणे तिच्या पावलांचे ठसे संपूर्ण घरात उमटवले जातात. त्यानंतर त्यांना स्थानापन्न केलं जातं.
गौरी येण्याच्या दिवशी त्यांना भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. दुसऱ्या दिवशी म्हणजे महालक्ष्मीचं पूजन केलं जातं. त्या दिवशी महाप्रसाद केला जातो.
या दिवशी 16 भाज्या, खीर, गोडाचे पदार्थ केले जातात. तर, याच दिवशी काही ठिकाणी ववसा घेण्याची पद्धत असते. शिवाय लाडू, चकल्या, करंजी असे विविध प्रकारचे फराळ, फळं यांचाही नैवेद्य दाखवण्यात येतो.
0
Answer link
गौरी हे पार्वतीचे एक नाव आहे, ती गणपतीची माता आहे.
गणपती उत्सवातील गौरी व्रताबद्दल पुरेशी माहिती नसल्यामुळे लोकांचा गोंधळ होतो अधिक माहिती साठी खालील लिंक वर जा
या लिंकवर जा
गणपती उत्सवातील गौरी व्रताबद्दल पुरेशी माहिती नसल्यामुळे लोकांचा गोंधळ होतो अधिक माहिती साठी खालील लिंक वर जा
या लिंकवर जा
0
Answer link
गौरी ही गणपतीची आई असते.
गौरी म्हणजे पार्वती. पार्वती ही भगवान शंकराची पत्नी आहे आणि गणपती हा शंकर आणि पार्वतीचा मुलगा आहे.
अधिक माहितीसाठी: