2 उत्तरे
2
answers
निळवंती ग्रंथाबद्दल माहिती मिळेल का?
13
Answer link
निळावंती पुराणकथा, दंतकथा की वास्तवातली, याविषयी वर्षानुवर्षे वाद चालू आहे.. शाहिरांनी आणि पिंगळ्यांनी तिला भाकितांतून वर्षानुवर्षं जिवंत ठेवलंय.. अध्यात्म, चमत्कार, जादूटोणा आदी अनेक संदर्भात तिचं नाव घेतलं जातं.. विशेष म्हणजे निळावंती वाचल्यानंतर माणूस वेडा होतो किंवा सहा महिन्यांत मरतो किंवा जादूटोण्याच्या मार् अशा अफवाही वर्षानुवर्षं टिकून आहेत.. सरनोबतांनी जेपुस्तक काढलंय, त्यातही याचा उल्लेख आहे. ते कोल्हापूरचे असल्यानं त्यांनी”वेड्या’ऐवजी”खुळा’शब्द वापरलाय.. गुप्तधन शोधण्याचा एक मोठा मार्ग म्हणूनही काही जण या पुस्तकाकडं पाहतात.. दिव्यशक्ती म्हणूनही पाहतात.. ळावंतीला पक्षी, कीटक, प्राणी यांची भाषा अवगत असते. यातील अनेक पक्षी,कीटक तिला गुप्तधनाचे अड्डे सांगतात.. गुप्तधनाची तंतोतंत माहिती पक्ष्यांनाच असते.. कुबेराचं वाहन मुंगूस आहे.. या मुंगसाला सारे धनाचे साठे माहीत असतात.. सापाच्या फण्यात कसला तरी मणी असतो तो सापडला, की धनाचे साठेही शोधता येतात.. काय काय कल्पना आपल्या लोकांनी करून ठेवल्या आहेत.. मुंगसाचं ऐकून धनसाठा सापडलाअसं सांगणारं कोणी भेटत नाही.. साप-मुंगसाची लढाई लावणाऱ्या गारुड्यालाही असे धनाचे साठे कुठं सापडलेले नाहीत.. सापडले असते, तर साप आणि मुंगसाच्या लढाईचा बहाणा त्य कशाला केला असता..? ज्येष्ठ विचारवंत दुर्गाबाई भागवतयांनीही निळावंतीची मूळ पोथी शोधण्याचा प्रयत्न केला..”प्रासंगिका’या पुस्तकात त्यांनी न मिळालेल्या निळावंतीच्या पोथीवर एक लेख लिहिलाय.. स्वामी विवेकानंदांनी ही पोथी वा पुढे सहा महिन्यांत त्यांचा मृत्यू झाला, अशी त्या वेळची एक अफवाही त्यांच्या लेखात आलीय.. …तर ही निळावंती एका धनवंताची कन्या.. लग्नानंतर मध्यरात्री कोल्ह्याची कुई कुई तिच्या कानावर येते. कोल्हे सांगत होते, की नदीतून एक प्रेत वाहत येतं आहे. त्याच्या कमरेला दोन लाल चिंध्या किंवा दोऱ्याच्या गाठी आरात्री ती नदीच्या दिशेनं गेली. तिला प्रेत दिसलं. त्याच्या कमरेला गाठी दिसल्या, तिनं हातानं त्या सोडवण्याचा प्रयत्न केला; पण शक्य झालं नाही… तिनं त्या दातानं कुरतडल्या, नवऱ्याला वाटलं ती प्रेत खातेय वगैरे वगैरे… नवऱ्यानं हे स्वतः पाहिलं. त्यानं तिला सोडून दिलं. या निळावंतीला कावळा, चिमणी, टिटवी, पाल, घुबड, कोकिळा, बगळा आदी सर्वांच्या भाषा अवगत होत्या.. ती त्यांच्याशी संवाद करायची.. ती शाहिरांचा विषय बनली.. अध्यात्माचा विषय बनली.. पहाटे फिरणाऱ्या पिंगळ्यांचा विषय बनली.. चित्रविचित्र शक्तीचा विषय बनली.. गूढतेचा विषय बनली.. महाकल्पनेचा, प्रतिभेचा आणि धनशोधाचा विषय बनली. अनेकांनी त्याचा वेध घेतला.. जे कल्पनेच्या पलीकडचं असतं ते वाचलं, की माणूस भ्रमात जातो.. तसं झाली की तो खुळा होतो, असं म्हणतात.. अनेक तांत्रिकांकडं निळावंतीचं नाव निघतंच… मी चालता चालता पुस्तकाची काही प चाळली.. रंकाळ्याच्या काठावर बसून काही चाळली.. प्रवासात काही वाचली.. कल्पनेची उत्तुंग भरारी मला आवडली.. माणूस किती कल्पना करू शकतो..? या कल्पनांना अंत नाही.. एका कल्पनेच्या डोहात पडलं, की भोवरा तयार होतो. तो खोलखोल जातगोलगोल फिरायला लागतो.. स्वतःबरोबर आपल्याला खोलवर न्यायला लागतो. आपण भोवऱ्याच्या काठावर थांबणार, की त्याच्या बरोबर जाणार, हा आपला प्रश्न असतो. या”निळावंती’च्या मूळ पोथीत अनेक श्लोक आहेत, असं सांगतात.कोणत्या तरी श्लोकानं कोणत्या तरी पशू- पक्ष्यांची भाषा समजते, असंही सांगतात. अध्यात्मातल्या शाहिरीमध्ये सर्वश्रेष्ठ गणल्या जाणाऱ्या हैबतीबाबा पुसे यांनी निळावंतीवर 1750च्या आसपास शाहिरी लिहिली आहे. श्रेष्ठ पतिव्रता म्हणूनही तिचा उल्लेख होतो. सासऱ्याबरोबर ती माहेरी जात असता तिला मुंगसाची जोडी दिसली. नवरा-बायको होते ते. त्यातील मुंगशिणीशी निळावंतीनं संवाद साधला. मुंगसाची बायको म्हणाली, “माझा मुंगूस नवरा आंधळा आहे.” मग निळावंती उपाय सांगते.. लाल तुकडा लावून त्याला डोळे देते.. त्यांच्याबरोबर राहते.. मग पिंगळा भेटतो.. तो सापाचीगोष्ट सांगतो.. त्याचा मणी मिळवा म्हणतो.. मुंगसांचा फौजफाटा घेऊन ती मणी शोधायला जाते.. मण्याच्या उजेडात साप भक्ष्य शोधत असतो.. हे सारे जण मणी उचलतात.. खजिन्याच्या शोधात निघतात… निळावंतीवरील आख्यायिका चालूच राहते…
0
Answer link
निळवंती हा एक प्राचीन मराठी भाषेतील ग्रंथ आहे. या ग्रंथात मंत्र, तंत्र, आणि काही गूढ विधींबद्दल माहिती दिलेली आहे, ज्यामुळे अनेक प्रकारचे फायदे होऊ शकतात, असे मानले जाते.
या ग्रंथाच्या लेखकाचे नाव अज्ञात आहे. काही लोकांच्या मते, हा ग्रंथ नाथ संप्रदायातील साधकांनी लिहिला आहे.
या ग्रंथात अनेक विषयांवर माहिती आहे, त्यापैकी काही खालीलप्रमाणे:
- मंत्र आणि त्यांचे उपयोग: विविध प्रकारच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी मंत्रांचा वापर कसा करावा.
- तंत्र-विद्या: काही विशिष्ट विधी आणि उपाय ज्यांच्या साहाय्याने इच्छित परिणाम साधता येतात.
- आयुर्वेद: काही वनस्पती आणि औषधींच्या मदतीने शारीरिक आणि मानसिक आरोग्य कसे सुधारावे.
- ज्योतिष: ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीनुसार भविष्य कसे जाणून घ्यावे.
टीप: निळवंती ग्रंथातील माहिती ही पारंपरिक आणि अनुभवांवर आधारित आहे. त्यामुळे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता: