व्यवसाय बाजारहाट विक्री कौशल्ये

विक्रीचे महत्त्व आणि विक्री कलेसाठी लागणारे गुण ह्यावर माहिती मिळू शकेल का?

2 उत्तरे
2 answers

विक्रीचे महत्त्व आणि विक्री कलेसाठी लागणारे गुण ह्यावर माहिती मिळू शकेल का?

4
विक्री ही प्रत्येक छोट्या मोठ्या व्यापारी संस्थेत खूप महत्वाची असते.कुठल्याही व्यापारी संस्थेचा प्रमुख उद्देश असतो की जास्तीत जास्त नफा, आणि तो नफा विक्री केल्याशिवाय साध्य होऊ शकत नाही.जर व्यापारात विक्री नसेल तर बाकी सगळ्या गोष्टी नगण्य ठरतात, म्हणून प्रत्येक व्यापारात चांगले विक्रेता असणे फार गरजेचे असते.खालील दिलेल्या माहितीमध्ये विक्रीचे महत्व आणि कला नमूद केल्या आहेत...........

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विक्रेत्यांमध्ये स्पर्धा सुरु असते. वस्तूंचे आर्थिक विनियोग घडवून आणण्यासाठी विक्रेता जी कौशल्यपूर्ण कला वापरतो. त्याला *'विक्रीची कला’* म्हणतात. व्यापारी कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन तयार करतात. विक्रेता हा माल किंवा वस्तू प्रभावीपणे ग्राहकांपर्यंत पोचवतात.                                        
विक्रेत्याला वस्तूची विक्री करण्यासाठी ग्राहकांशी संपर्क, प्रदर्शन, मालाचे सादरीकरण, वस्तूची उपयुक्तता आणि कमीत कमी किमतीत वस्तूंची खात्री द्यायला लागते. उत्पादनाची जाहिरात ही वर्तमानपत्र-साप्ताहिके-मासिके-अंक, टीव्ही चॅनल्स, होर्डिंग्ज, पत्रके, सवलती किंवा योजना, कार्यक्रमाचे प्रायोजकत्व (स्पॉन्सरशिप) घेणे, फ्री सॅम्पल अशा अनेक प्रकारे जाहिरात केली जाते. जाहिरातीने विक्रेते आपली वस्तू इतरांपेक्षा चांगली आहे, याचा प्रसार आणि प्रचार केला जातो.
विक्रीची कला यामध्ये वस्तूची जाहिरात महत्त्वाची  मानली जाते. ग्राहकांचे मन जिंकण्याचे प्रयत्न विक्रेता करतो. ग्राहक उत्पादनाशी जोडला तर तो ग्राहक टिकवून विक्रेता दुसरे ग्राहक शोधात असतो. ग्राहकाचे वस्तूशी समाधान झाले की तो ग्राहक पुन्हा खरेदीसाठी येईल याची विक्रेता काळजी घेतो.

• विक्री कलेतील वैशिष्ट्यपूर्ण घटक :
• विक्रीचा प्रामाणिक प्रयत्न करणे.
• ग्राहकांचे मत जाणून त्यांना खरेदीकडे वळवणे.
• ग्राहकांचा विश्वास साधणे.
• ग्राहक आणि विक्रेत्याचा फायदा हा चांगली सेवा देऊन करणे.
• वस्तूंची संपूर्ण माहिती देऊन निर्यात करणे.

          • *विक्री कलेची तंत्रे :*
• मालाची, उत्पादनाची आणि वस्तूंची चांगल्या आणि आकर्षक पद्धतीने मांडणी करणे.
• ग्राहकांना वस्तूंची सविस्तर माहिती देणे.
• रेडिओ, टीव्ही, इंटरनेट यांच्या माध्यमातून आकर्षक जाहिरात तयार करून त्यांचा प्रसार करणे.
• गॅरंटी, वॉरंटी, सर्व्हिस, संपर्क अशी माध्यमे वापरून ग्राहकांशी संपर्क वाढवून उत्तम सेवा देणे.
• फ्री सॅम्पल सारख्या योजना देऊन ग्राहकांना आकर्षित करणे.
• ग्राहकांच्या शंकांचे समाधान करणे आणि तक्रारींचे निवारण करणे.
अशा प्रकारे विक्रीची कला ही प्रत्येक विक्रेत्याला अवगत झाली पाहिजे.
उत्तर लिहिले · 29/8/2017
कर्म · 20545
0

विक्रीचे महत्त्व:

  • महसूल निर्मिती: विक्री ही व्यवसायासाठी महसूल मिळवण्याचा प्राथमिक मार्ग आहे. वस्तू आणि सेवा विकून, कंपन्या त्यांच्या खर्चाचे व्यवस्थापन करू शकतात आणि नफा कमवू शकतात.
  • आर्थिक विकास: विक्रीमुळे आर्थिक विकास होतो. जेव्हा कंपन्या यशस्वीरित्या विक्री करतात, तेव्हा ते अधिक लोकांना रोजगार देऊ शकतात आणि नवीन उत्पादने आणि सेवांमध्ये गुंतवणूक करू शकतात.
  • ग्राहक संबंध: विक्री प्रक्रिया कंपन्यांना त्यांच्या ग्राहकांशी संबंध निर्माण करण्यास मदत करते. चांगल्या ग्राहक संबंधामुळे निष्ठा वाढते आणि वारंवार विक्री होते.
  • बाजारपेठ माहिती: विक्री कर्मचाऱ्यांना बाजारपेठेतील ट्रेंड आणि ग्राहकांच्या गरजांची माहिती मिळते. या माहितीचा उपयोग उत्पादने आणि विपणन धोरणे सुधारण्यासाठी होतो.
  • स्पर्धात्मकता: प्रभावी विक्री कंपन्यांना त्यांच्या प्रतिस्पर्धकांपेक्षा अधिक चांगली कामगिरी करण्यास मदत करते. मजबूत विक्री धोरणे कंपन्यांना बाजारात टिकून राहण्यास आणि वाढण्यास मदत करतात.

विक्री कलेसाठी आवश्यक गुण:

  • उत्कृष्ट संवाद कौशल्ये: प्रभावीपणे बोलण्याची आणि लिहिण्याची क्षमता. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांची समजूत काढण्यासाठी हे आवश्यक आहे.
  • संवादात्मक बुद्धिमत्ता (Emotional Intelligence): ग्राहकांच्या भावना समजून घेण्याची आणि त्यांच्याशी सहानुभूती दर्शवण्याची क्षमता.
  • उत्पादन ज्ञान: विकल्या जाणाऱ्या वस्तू किंवा सेवेबद्दल संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे.
  • समस्या निवारण कौशल्ये: ग्राहकांच्या समस्या आणि शंकांचे निरसन करण्याची क्षमता.
  • धैर्य आणि चिकाटी: नकार पचवण्याची आणि सतत प्रयत्न करत राहण्याची तयारी.
  • वेळेचे व्यवस्थापन: भेटी आणि कामांची योजना बनवून वेळेचा प्रभावीपणे वापर करण्याची क्षमता.
  • आत्मविश्वास: स्वतःच्या क्षमतेवर आणि उत्पादनावर विश्वास असणे.
  • शिकण्याची तयारी: नवीन तंत्रज्ञान आणि विक्रीच्या पद्धती आत्मसात करण्याची इच्छा.
  • नेटवर्किंग कौशल्ये: संबंध निर्माण करण्याची आणि टिकवण्याची क्षमता.
  • ग्राहक-केंद्रित दृष्टीकोन: ग्राहकांच्या गरजा आणि अपेक्षा पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करणे.

हे गुण Sales (विक्री) कलेला अधिक प्रभावी बनवतात आणि व्यवसायाच्या वाढीस मदत करतात.

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 5220

Related Questions

विक्रय कला म्हणजे काय? ते सांगून विक्रेत्यांचे गुण सविस्तर सांगा.