विक्री कौशल्ये
0
Answer link
विक्रय कला (Sales Art) म्हणजे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांना एखादे उत्पादन किंवा सेवा खरेदी करण्यास प्रवृत्त करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तंत्रांचा आणि कौशल्यांचा समूह.
विक्रेत्यांचे गुण:
- उत्कृष्ट संवाद कौशल्ये (Excellent Communication Skills): विक्रेत्यामध्ये लोकांना प्रभावीपणे बोलण्याची आणि समजून घेण्याची क्षमता असावी.
उदाहरण: ग्राहकाला उत्पादन व्यवस्थित समजावून सांगणे.
- उत्पादन ज्ञान (Product Knowledge): विक्रेत्याला आपल्या उत्पादनांची सखोल माहिती असणे आवश्यक आहे.
उदाहरण: उत्पादनाचे फायदे, तोटे आणि ते कसे वापरावे हे माहित असणे.
- संयम (Patience): ग्राहकांच्या प्रश्नांची उत्तरे देताना आणि त्यांच्या शंकांचे निरसन करताना संयम आवश्यक आहे.
उदाहरण: ग्राहक अनेक प्रश्न विचारत असेल, तरी त्याला शांतपणे उत्तरे देणे.
- आत्मविश्वास (Confidence): विक्रेत्यामध्ये आत्मविश्वास असणे फार महत्वाचे आहे, ज्यामुळे तो ग्राहकांना खात्री देऊ शकतो.
उदाहरण: 'हे उत्पादन तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे' असे आत्मविश्वासाने सांगणे.
- सकारात्मक दृष्टिकोन (Positive Attitude): विक्रेत्याचा दृष्टिकोन नेहमी सकारात्मक असावा.
उदाहरण: नकारात्मक परिस्थितीतही सकारात्मक राहून काम करणे.
- ग्राहक-केंद्रित (Customer-centric): ग्राहकांच्या गरजा आणि अपेक्षा समजून घेऊन त्यांना योग्य उपाय देणे.
उदाहरण: ग्राहकाला काय हवे आहे हे ऐकून घेणे आणि त्यानुसार त्याला पर्याय देणे.
- समस्या-समाधान कौशल्ये (Problem-solving skills): ग्राहकांच्या समस्यांवर त्वरित आणि प्रभावी उपाय शोधण्याची क्षमता.
उदाहरण: उत्पादनात काही समस्या असल्यास, त्याचे निराकरण करणे.
- वेळेचे व्यवस्थापन (Time Management): आपल्या वेळेचा योग्य वापर करून जास्तीत जास्त काम करणे.
उदाहरण: भेटींचे नियोजन वेळेनुसार करणे.
4
Answer link
विक्री ही प्रत्येक छोट्या मोठ्या व्यापारी संस्थेत खूप महत्वाची असते.कुठल्याही व्यापारी संस्थेचा प्रमुख उद्देश असतो की जास्तीत जास्त नफा, आणि तो नफा विक्री केल्याशिवाय साध्य होऊ शकत नाही.जर व्यापारात विक्री नसेल तर बाकी सगळ्या गोष्टी नगण्य ठरतात, म्हणून प्रत्येक व्यापारात चांगले विक्रेता असणे फार गरजेचे असते.खालील दिलेल्या माहितीमध्ये विक्रीचे महत्व आणि कला नमूद केल्या आहेत...........
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विक्रेत्यांमध्ये स्पर्धा सुरु असते. वस्तूंचे आर्थिक विनियोग घडवून आणण्यासाठी विक्रेता जी कौशल्यपूर्ण कला वापरतो. त्याला *'विक्रीची कला’* म्हणतात. व्यापारी कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन तयार करतात. विक्रेता हा माल किंवा वस्तू प्रभावीपणे ग्राहकांपर्यंत पोचवतात.
विक्रेत्याला वस्तूची विक्री करण्यासाठी ग्राहकांशी संपर्क, प्रदर्शन, मालाचे सादरीकरण, वस्तूची उपयुक्तता आणि कमीत कमी किमतीत वस्तूंची खात्री द्यायला लागते. उत्पादनाची जाहिरात ही वर्तमानपत्र-साप्ताहिके-मासिके-अंक, टीव्ही चॅनल्स, होर्डिंग्ज, पत्रके, सवलती किंवा योजना, कार्यक्रमाचे प्रायोजकत्व (स्पॉन्सरशिप) घेणे, फ्री सॅम्पल अशा अनेक प्रकारे जाहिरात केली जाते. जाहिरातीने विक्रेते आपली वस्तू इतरांपेक्षा चांगली आहे, याचा प्रसार आणि प्रचार केला जातो.
विक्रीची कला यामध्ये वस्तूची जाहिरात महत्त्वाची मानली जाते. ग्राहकांचे मन जिंकण्याचे प्रयत्न विक्रेता करतो. ग्राहक उत्पादनाशी जोडला तर तो ग्राहक टिकवून विक्रेता दुसरे ग्राहक शोधात असतो. ग्राहकाचे वस्तूशी समाधान झाले की तो ग्राहक पुन्हा खरेदीसाठी येईल याची विक्रेता काळजी घेतो.
• विक्री कलेतील वैशिष्ट्यपूर्ण घटक :
• विक्रीचा प्रामाणिक प्रयत्न करणे.
• ग्राहकांचे मत जाणून त्यांना खरेदीकडे वळवणे.
• ग्राहकांचा विश्वास साधणे.
• ग्राहक आणि विक्रेत्याचा फायदा हा चांगली सेवा देऊन करणे.
• वस्तूंची संपूर्ण माहिती देऊन निर्यात करणे.
• *विक्री कलेची तंत्रे :*
• मालाची, उत्पादनाची आणि वस्तूंची चांगल्या आणि आकर्षक पद्धतीने मांडणी करणे.
• ग्राहकांना वस्तूंची सविस्तर माहिती देणे.
• रेडिओ, टीव्ही, इंटरनेट यांच्या माध्यमातून आकर्षक जाहिरात तयार करून त्यांचा प्रसार करणे.
• गॅरंटी, वॉरंटी, सर्व्हिस, संपर्क अशी माध्यमे वापरून ग्राहकांशी संपर्क वाढवून उत्तम सेवा देणे.
• फ्री सॅम्पल सारख्या योजना देऊन ग्राहकांना आकर्षित करणे.
• ग्राहकांच्या शंकांचे समाधान करणे आणि तक्रारींचे निवारण करणे.
अशा प्रकारे विक्रीची कला ही प्रत्येक विक्रेत्याला अवगत झाली पाहिजे.