अन्न उपवास धार्मिक उपवास

हरतालिका उपवासाला राजगिरा चालतो का?

2 उत्तरे
2 answers

हरतालिका उपवासाला राजगिरा चालतो का?

0
हॅलो फ्रेंड्स,

*सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात*

*कर्मणः सुकृतस्याहुः सात्त्विकं निर्मलं फलम्‌ । रजसस्तु फलं दुःखमज्ञानं तमसः फलम्‌ ॥ १४-१६ ॥*

*_अर्थ_*
_श्रेष्ठ (सात्त्विक) कर्माचे सात्त्विक अर्थात सुख, ज्ञान आणि वैराग्य इत्यादी निर्मळ फळ सांगितले आहे. राजस कर्माचे फळ दुःख तसेच तामस कर्माचे फळ अज्ञान सांगितले आहे._ ॥ १४-१६ ॥
_

आपला दिवस आनंदी जाओ।।💐💐


  *श्री गणेश चतुर्थीच्या आपल्याला आणि आपल्या परिवाराला मित्रमंडळींना खुप खुप शुभेच्छा* ⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳

🙏🏼 *गणपती बाप्पाप्पा मोरया* 🙏🏼

हरितालिका हरिता म्हणजे जिला नेले ती, आणि आलि म्हणजे सखी.पार्वतीला शिव प्राप्तीसाठी सखी तपश्चर्येला घेवून गेली म्हणून पार्वतीला 'हरितालिका ' असे म्हणतात.
हरितालिका कथा ही भविष्य पुराणातील हरगौरीसंवादात आली आहे.शिवा भूत्वा शिवां यजेत् | या भावनेने हरितालिकेची पूजा करावी. 


कथा,आख्यायिका 

पूर्वकाली पर्वतराजाची कन्यापार्वती ही उपवर झाली व नारदाच्या सल्ल्याने तिच्या पित्याने तिचा विवाह विष्णूशी करण्याचा बेत केला. परंतु पार्वतीच्या मनात शंकराला वरण्याचे असलाने तिने आपल्या सखीकडून पित्यास निरोप पाठविला की, ‘तुम्ही मला विष्णूच्या पदरी बांधल्यास मी प्राणत्याग करीन’. इतक्यावरच ती थांबली नाही तर आपल्या सखीच्या मदतीने ती घरातून पळून गेली व शिवाचा लाभ व्हावा म्हणून एका अरण्यात जाऊन शिवलिंगाची पूजा आरंभली.त्या दिवशी भाद्रपद मासातील तृतीया होती व हस्त नक्षत्र होते.पार्वतीने शिवलिंगाची पूजा केली आणि दिवसभर कडकडीत उपवास करून जागरण केले.तिच्या तपाने शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीच्या विनंतीला मान देवून पत्नी म्हणून तिचा स्वीकार केला अशी आख्यायिका आहे. 

व्रतामागील आशय 

शिवपार्वती किंवा उमा महेश्वर ही जगताची माता-पिता म्हणून ओळखले जातात.स्त्रीतत्व आणि पुरुष तत्व यांच्या मेळणीतून विश्वाची निर्मिती झाली आहे म्हणून आपण या तत्वांचे पूजन करतो.आदिशक्तीच्या पूजनातून तेचे प्रकटन आपल्यात व्हावे म्हणून प्रार्थना करायची. 

पूजाविधी 

वाळूचे शिवलिंग करून त्याची पूजा करतात किंवा सखी आणि पार्वती यांची शिवलिंगासहित मूर्ती आणून त्यांचीही पूजा करण्याची पद्धती प्रचलित आहे.संकल्प,सोळा उपचार पूजन,सौभाग्यलेणी अर्पण, नैवेद्य,आरती व कथावाचन असे या पूजेचे सामान्यत: स्वरूप असते.व्रतराज या ग्रंथामध्ये या व्रताचे वर्णन आढळते. दुस-या दिवशी रुईच्या पानाला तूप लावून ते चाटता आणि नंतर महिला आपला उपवास सोडतात. 

प्रांतानुसार 

पार्वतीसारखाच आपल्यालाही चांगला नवरा मिळावा म्हणून दक्षिण भारतात अनेक ब्राह्मण कुमारिका हे व्रत करतात. हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेला केले जाते. या दिवशी उपास करून गौरी आणि तिची सखी यांच्या मातीच्या मूर्तींची पूजा केली जाते. गुजराथमध्ये किंवा बंगालमध्ये हरितालिका नसते. तमिळनाडूमध्ये माघ शुद्ध द्वितीयेपासून तीन दिवस गौरी उत्सव चालतो. तेथे कुमारिका आभि सौभाग्यवती स्त्रियाही हे व्रत करतात.महाराष्ट्रामध्ये अनेक विवाहित स्त्रियां आणि विधवा स्त्रियांही हे व्रत करतात. श्रावण शुद्ध तृतीयेला सुवर्णगौरी (मधुश्रावणिका), श्रावण कृष्ण तृतीयेला कज्‍जली गौरी आणि भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरितालिका ही व्रते करून सौभाग्यवती स्त्रियांनी तीनदा गौरी पूजा करावी असे शास्त्र सांगते.
उत्तर लिहिले · 25/8/2017
कर्म · 28530
0

हरतालिका उपवासाला राजगिरा चालतो. अनेक लोक उपवासाला राजगिऱ्याचा वापर करतात. राजगिरा हे पौष्टिक अन्न आहे आणि ते उपवासाच्या नियमांनुसार योग्य आहे.

टीप: उपवास करताना तुमच्याkey आरोग्य आणि परंपरेनुसार बदल होऊ शकतात. त्यामुळे आपल्या घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला घेणे योग्य राहील.

Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे आणि ती केवळ माहितीच्या उद्देशाने आहे.

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 2760