2 उत्तरे
2 answers

मनुवाद म्हणजे काय?

3
हिंदू धर्मानुसार मनू म्हणजे पहिला मानवं जो ब्रह्मदेवाने निर्माण केला. ब्रह्मदेवाने मनुष्यचा वंश वाढवण्यासाठी आपले दोन भाग केले. ' का' म्हणजे मनू आणि 'या' म्हणजे मनूची पत्नी शतरूपा. यांची मुले म्हणजे मानव समाज. ( मनू = मानव = मॅन / adam = आदमी).
ब्रह्मदेवाच्या एका दिवसाला कल्प म्हणतात आणि एक कल्पात १४ मनू होतात.
महाभारतात ८ मनू चा उल्लेख आहे, जैन ग्रंथात १४ मनू चा उल्लेख आहे.
मनुस्मृती हा मनू ने ऋषींना केलेला उपदेश आहे ज्यात कर्तव्ये, आचार, गुण, नियम व अधिकार इ. बाबतीत चर्चा आहे.  ब्रिटीश काळात इ.स.१७९४ इंग्रजी भाषेत भाषांतर झालेला हा सर्वात पहिला ग्रंथ असून याच्यावरूनच ब्रिटिशांनी हिंदू कायदा तयार केला.मनुस्मृतीतील छंदबद्ध रचनेवरून ती इ.स.पू.२ रे शतक ते इ.स.३ रे शतक या काळातील असावी.
आजच्या नीती संकल्पनेनुसार यातली काही वचने चांगली असलेतरी काही विशेषतः जातीवाचक वचने अन्यायकारक होती म्हणूनच बाबासाहेबानी मनुस्मृतिची होळी केली होती.
आता मनुवाद म्हणजे नक्की काय. अगदी थोडक्यात सांगायचं तर एका राजकीय आघाडीला जसे त्यांचे विरोधक देशद्रोही वाटतात, तसेच एका आघाडीला उजवे, अतिराष्ट्रवादी मनुवादी वाटतात.
उत्तर लिहिले · 20/3/2018
कर्म · 99520
0

मनुवाद:

मनुवाद ही एक विचारधारा आहे जी 'मनुस्मृती' या प्राचीन ग्रंथावर आधारित आहे.

मनुस्मृतीमध्ये समाजाला वर्ण आणि जातींमध्ये विभागले गेले आहे, आणि त्या प्रत्येकासाठी विशिष्ट कर्तव्ये आणि अधिकार निश्चित केले आहेत.

मनुवादी विचारसरणी या वर्णव्यवस्थेचे समर्थन करते आणि काही विशिष्ट जातींना उच्च स्थान देते, तर इतरांना दुय्यम मानते.

मनुवादावर टीका:

मनुवादावर अनेकदा सामाजिक न्याय आणि समानतेच्या दृष्टिकोनातून टीका केली जाते.

टीकाकारांच्या मते, मनुस्मृतीतील विचार हे अन्यायकारक आणि भेदभावपूर्ण आहेत, ज्यामुळे समाजातील काही वर्गांवर अन्याय होतो.

अधिक माहितीसाठी काही स्रोत:

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 1780

Related Questions

वाढदिवसाच्या शुभेच्छा, भावी अधिकारी?
Birthday wishes line sathi kahi vakya?
खेड्यांच्या विकासासाठी ग्राम गौरव प्रतिष्ठानने कोणती उद्दिष्ट्ये बाळगली आहेत?
वृद्धाश्रम चालवण्यासाठी कोणती कौशल्ये आत्मसात करावी लागतात?
वृद्धांची सेवा क्षेत्रे किती आणि कोणती?
सामाजिक सुरक्षेचे स्वरूप स्पष्ट करा?
सामाजिक सुरक्षा काय आहे, स्पष्ट करा?