घरगुती उपाय ढेकूण कीटक नियंत्रण घर आणि बाग

आमच्या घरामध्ये जरा जास्तच ढेकूण झाले आहेत, त्यावर काही उपाय?

5 उत्तरे
5 answers

आमच्या घरामध्ये जरा जास्तच ढेकूण झाले आहेत, त्यावर काही उपाय?

22
ढेकणांचा बंदोबस्त करण्याचा नैसर्गिक उपाय*
_____________________
घरातील ढेकूण अत्यंत त्रासदायक कीटक…अल्पावधीतच त्यांची फौज तयार होण्यास वेळ लागत नाही… रात्रीच्या वेळेस तर त्यांचा विशेष त्रास जाणवतो. ते चावले तर त्वचाविकार होतात.हा त्रास दूर करण्यासाठी नियमित पेस्ट कंट्रोल करणे हा उपाय असला तरी यामुळे काही दुष्परिणामही होऊ शकतात. याकरिता ढेकणांना घराबाहेर काढण्यासाठी काही सुरक्षित घरगुती उपाय…

*पुदिना*

ढेकणांना पुदिन्याचा वास असह्य होतो. त्यामुळे या वासाने ते दूर पळतात. यासाठी झोपताना अंथरुणाजवळ पुदिन्याची ताजी पानं पसरवून ठेवा. लहान मुलांच्या पाळण्यातही पुदिन्याची पानं ठेवू शकता. पुदिन्याची पानं चुरून त्याचा रस शरीराला लावून झोपल्यानेही ढेकूण लांब राहतील.

*कडुलिंबाचे तेल*

कडूलिंबामध्ये दाहशामक आणि कीटकनाशक क्षमता आहे. तसेच कडूलिंबातील ऍन्टी मायक्रोबायल गुणधर्म घरातील अनेक कीटकांचा त्रास कमी करण्यासाठी मदत करतात. ढेकणांवर कडूलिंबाच्या तेलाचा शिडकाव करा. या प्रयोगामुळे अवघ्या आठवडाभरात ढेकणांचा त्रास कमी होण्यास मदत होईल. कपडे धुताना डिटर्जंट पावडरसोबत कडुलिंबाच्या तेलाचा समावेश केल्याने ढेकणाचा त्रास कमी होईल.

*टी ट्री ऑईल*

टी ट्री ऑइलमध्ये ऍन्टी मायक्रोबियल गुणधर्म असतात. यामुळे ढेकणांचा त्रास दूर ठेवण्यास मदत होते. टी ट्री ऑईल पाण्यात मिसळून त्याचा स्प्रे बनवा. हा प्रे भिंती, पलंग, कपाटं, पडदे, फर्निचर गाद्यांवर शिंपडा. आठवडाभर जेथे ढेकणांचा हमखास वावर असतो तेथे टी ट्री ऑईलचा स्प्रे केल्याने ढेकणांचा त्रास कमी होईल.

*निलगिरी*

ढेकूण दिसल्यास त्यावर निलगिरीचे काही थेंब शिंपडा. यामुळे ढेकूण दूर जातील. शिवाय रोजमेरी, लॅवेंडर या तेलांमध्ये निलगिरीचे तेल मिसळून त्याचा वापर करा. सर्दी पडशाच्या त्रासाला दूर ठेवण्यासोबतच ढेकणांचा त्रास टाळण्यासाठीही निलगिरी फायद्याची आहे.

*लॅवेंडर तेल*

ढेकणांना दूर ठेवण्यासाठी लॅवेंडरच्या पानांचा वापर करा. लॅवेंडरची पाने कपडय़ांवर घासा. लॅवेंडर परफ्युम शिंपडल्यानेही ढेकूण दूर राहू शकतात. पुदिन्याप्रमाणेच लॅवेंडर तेलाचा वासही ढेकणांना सहन होत नाही. या तेलाच्या सुगंधामुळे प्रसन्नता वाटतेच. शिवाय डास, ढेकूण असे कीटकही दूर राहतात.
______________________
*

उत्तर लिहिले · 1/8/2018
कर्म · 569225
8
ढेकूण हा रक्तपिपासू कीटक असून माणसांच्या अंगातली उष्णता आणि उछ्वासावाटे सोडलेला कार्बन डायॉक्साइड ह्यंच्यामुळे आपलं सावजबरोबर शोधतात. त्यांची रक्तपिपासू वृत्ती जास्ती करून रात्री उफाळून येते. दिवसा पलंगांच्या खाली असलेल्या लाकडी फ्रेमच्या बारीक फटींमध्ये ते लपून बसतात. माणसांचं रक्त (थोडंफार कुत्रे आणि मांजरांचंही) रक्त हा त्यांचा एकमेवआहार. तीन-चार महिने ढेकूण काही न खाता (पिता) जगू शकतात. त्यांचं आयुष्यमान जरी फार नसलं तरी त्यांचीप्रजा खूप झपाटय़ाने वाढते.
तुमच्या बिछान्याखाली पुदिन्याची पाने ठेवा, कांद्याचा रस फवारा, कांद्याचा रस ढेकणाला मारण्यासाठी नैसर्गिक औषधी आहे. याच्या वासाने त्यांचे श्वास बंद होतो आणि ते त्वरित मरतात. तसेच रॉकेल फवारा, एक वेळेस तुमचे बेड कडक उन्हात ठेवा, घरात स्वच्छता ठेवा.
उत्तर लिहिले · 17/8/2017
कर्म · 210095
0
घरात ढेकूण (Bed bugs) होणे ही एक सामान्य समस्या आहे, परंतु ती त्रासदायक नक्कीच आहे. ढेकणांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही खालील उपाय करू शकता:
  1. स्वच्छता:

    बिछाने आणि चादरी नियमितपणे धुवा: ढेकूण बहुतेक वेळा बिछान्यामध्ये आणि चादरींमध्ये लपलेले असतात. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी गरम पाण्यात (किमान 50°C) चादरी, उशीचे कव्हर आणि इतर कपडे धुवा.

    व्हॅक्यूम क्लिनरचा वापर: पलंग, गादी, कार्पेट आणि इतर ठिकाणी व्हॅक्यूम क्लिनरने नियमितपणे साफ करा. व्हॅक्यूम केल्यानंतर कचरा पिशवी त्वरित घराबाहेर फेकून द्या.

  2. घरगुती उपाय:

    नैसर्गिक तेल (Essential Oils): टी ट्री ऑईल (Tea tree oil), लैव्हेंडर ऑईल (Lavender oil) किंवा पेपरमिंट ऑईल (Peppermint oil) पाण्यात मिसळून स्प्रे बाटलीने फवारा. ढेकणांना या तेलांचा वास सहन होत नाही.

    बेकिंग सोडा: ढेकूण असलेल्या ठिकाणी बेकिंग सोडा (Baking soda) टाका आणि काही दिवसांनी व्हॅक्यूम क्लिनरने साफ करा.

  3. रासायनिक उपाय:

    कीटकनाशक (Insecticides): बाजारात ढेकणांसाठी खास कीटकनाशके मिळतात. पायरेथ्रॉइड (Pyrethroid) असलेले स्प्रे वापरा, पण ते वापरताना उत्पादनाच्या सूचनांचे पालन करा आणि सुरक्षा बाळगा. लहान मुले आणि पाळीव प्राणी यांच्यापासून दूर ठेवा.

    प्रोफेशनल पेस्ट कंट्रोल (Professional Pest Control): जर ढेकणांची समस्या खूपच गंभीर असेल, तर प्रोफेशनल पेस्ट कंट्रोल सर्विसची मदत घ्या. ते योग्य उपाययोजना करून ढेकणांपासून कायमची सुटका करू शकतात.

  4. इतर उपाय:

    फर्निचरची तपासणी: जुने फर्निचर किंवा सेकंड-हँड वस्तू खरेदी करताना ती नीट तपासा. ढेकूण फर्निचरमध्ये लपलेले असू शकतात.

    दरवाजे आणि खिडक्या सील करा: घरामध्ये ढेकूण येण्याची शक्यता कमी करण्यासाठी दरवाजे आणि खिडक्यांच्या crevices सील करा.

हे काही उपाय आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही घरातील ढेकणांपासून सुटका मिळवू शकता. नियमित स्वच्छता आणि योग्य उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे.

अधिक माहितीसाठी तुम्ही खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:
EPA - How to Control Bed Bugs
University of Minnesota Extension - Bed Bugs

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 980

Related Questions

कोणते उपाय ॲनिसीस (Anise) व त्यांना मारण्याचा रस निर्माण होतो?
घरात किडे आल्यावर काय करावे?
घरामध्ये सतत खूप लाल, काळ्या मुंग्या निघतात, काळ्या मुंग्या ठीक आहेत पण लाल मुंग्या खूप त्रास देत आहेत, हँगरच्या कपड्यांमध्ये पण घुसतात, चावतात. काय करू? काही खात्रीशीर उपाय आहे का? असेच चालू राहिले तर या मला घरातून हाकलून तरी देतील किंवा मारून टाकतील अशी भीती वाटत आहे. खडू, पावडर हे वापरून झाले आहे.
पेस्ट कंट्रोल : झुरळांसाठी औषध?
चिलटांवर उपाय काय?
गप्पी मासे पाळणे हे कोणत्या रोगांच्या नियंत्रणासाठी योग्य होईल?
मुंगळे कसे घालवावे?