जीवशास्त्र प्राणी

सापाला कान असतात का?

2 उत्तरे
2 answers

सापाला कान असतात का?

8
सापाला कान नसतात आणि त्याला ऐकू हि येत नाही.  हिंदी चित्रपटात तुम्ही साप पुंगीच्या तालावर नाचताना बघितला असेल मात्र साप केवळ  गारुडी वाजवताना जशी पुंगी हलवत असतो त्यानुसार हलतो.

सापाबद्दलच्या गैरसमजुती किंवा (अंधश्रद्घा).

(१) सापाच्या नर-मादीच्या जोडीपैकी एकाची हत्या केली, तर दुसरा त्याचा सूड घेतो. (२) सापाला दूध आवडते. (३) सापाला संगीत आवडते. (४) सापाच्या डोक्यावर रत्न किंवा मणी असतो. (५) सापाच्या डोक्यावर केस किंवा कोंबड्यासारखा तुरा असतो. (६) नाग गुप्तधनाचे संरक्षण करतो. (७) वेल्या साप माणसाच्या डोक्यावर आघात करतो किंवा कपाळावर दंश करतो. (८) मांडवळ जातीच्या सापाने एखाद्याचे अंग चाटले ,तर त्याला कुष्ठरोग होतो. (९) सापाने दंश केलेल्या व्यक्तीची प्रेतयात्रा व दहन संस्कार तो साप झाडावरून पाहत असतो, अशी दक्षिण भारतातील लोकांची धारणा आहे. (१०) धामण पाहिल्यावर म्हैस अथवा गाय दूध देत नाही व ती मरते. (११) अंगावर कडे असलेल्या सापाने एखाद्या व्यक्तीला दंश केला, तर त्या व्यक्तीच्या अंगावर तसेच कडे उमटते. (१२) मण्यार साप झोपलेल्या माणसाचा श्वास शोषून घेत असतो. (१३) फुरसे जमिनीवरून सु. २ मी. किंवा त्यापेक्षा जास्त उंच उडी घेऊ शकतात. (१४) नागाचा समागम धामणीशी होतो. (१५) मंत्रतंत्रांनी सर्पविष उतरविता येते. (१६) तांबडा मांडवळ साप दुतोंडी असतो. (१७) सापांना सुगंधाचे आकर्षण असते. (१८) साप व मुंगसाची भांडणे होताना, सापाने चावा घेतला, तरी मुंगसाला विषबाधा होत नाही. (१९) सापाला जखम झाल्यास त्याला मुंग्या लागून साप मरतो. (२०) साप इच्छेनुसार रूप धारण करू शकतो. (२१) दंश झालेल्या व्यक्तीस कडुलिंबाचा पाला खायला देतात, त्यामुळे विष उतरते. (२२) सापाचे विषारी दात काढल्यास त्यापासून कोणताही धोका नसतो. (२३) कुष्ठरोग (महारोग) झालेल्या व्यक्तीस नागाने दंश केल्यास कुष्ठरोग बरा होतो. (२४) नुकत्याच मारलेल्या सापावर रॉकेल ओतल्यास तो साप जिवंत होतो. (२५) पट्टेदार साप चावल्यास व्यक्तीच्या अंगावर चट्टेपट्टे उमटतात. या सर्व गैरसमजुती वा अंधश्रद्घा असून त्यांस कोणताही वैज्ञानिक आधार नाही.
स्रोत :विकासपीडिया
उत्तर लिहिले · 16/8/2017
कर्म · 99520
0
सर्पांना बाह्य किंवा मध्यकर्ण नसतात, पण त्यांच्या जबड्याच्या हाडांच्या आणि कवटीच्या माध्यमातून कंपनं जाणवतात. त्यामुळे त्यांना जमिनीतील कंपने आणि काही प्रमाणात हवेतील आवाज ऐकू येतात.

सापाला कान असतात का?

उत्तर:

  • सापांना बाह्य किंवा मध्यकर्ण नसतात.
  • ते जबड्याच्या हाडांच्या मदतीने जमिनीतील कंपने जाणवतात.
  • त्यामुळे त्यांना काही प्रमाणात आवाज ऐकू येतो.

संदर्भ: Snakesforpets.com

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 980

Related Questions

अतिनील किरणांना बघून डास आकर्षित होतात का?
"बांडगुळ" म्हणजे काय? त्याच्या किती जाती असतात?
जंगलात सापडणारी नरभक्षक झुडपे?
मानवी शरीर मानवाचे नाही म्हणतात ते कितपत खरे आहे?
मरण म्हणजे नेमकं काय होतं?
फुलपाखरू जीवशास्त्राच्या सिद्धांतानुसार उडू शकत नाही? तर मग ते का उडते?
मानवी शरीरात हाडे असतात?