3 उत्तरे
3
answers
आपल्या आशिया खंडात किती देश येतात?
6
Answer link
क्षेत्रफळाने व लोकसंख्येने जगातील पहिल्या क्रमांकाचे खंड. आशिया खंडाने पृथ्वीच्या एक अकरांश तसेच एकूण भूभागाच्या एक तृतीयांश व आफ्रिकेच्या दीडपट क्षेत्र व्यापले आहे. आशियाचे क्षेत्रफळ बेटांसह ४,४६,००,८५० चौ. किमी. व लोकसंख्या एकून पृथ्वीच्या लोकसंख्येच्या जवळजवळ दोन तृतीयांश, सु. १९८.८ कोटी (१९६९) आहे. विषुववृत्ताच्या एक अंश उत्तरेस आशियाचा मलेशिया भाग येतो, तेथपासून रशियाच्या केप चेल्यूस्किनपर्यंत (७८० उ.) आशियाचा दक्षिणोत्तर सलग भूभागाचा पसारा असून पूर्वपश्चिम पसारा २६० पू. ते १७०० प. इतका आहे. आशियाचा मध्यभाग महासागरांपासून सु. ३,२०० किमी. हून अधिक दूर आहे. ग्रीकांनी सूर्य उगवणाऱ्या बाजूचा म्हणून ‘आसू’ नांव दिले तेच खंडाला रूढ झाले असून त्यात जगातील सर्वात उंच शिखर (एव्हरेस्ट), सर्वात खोल भूभाग (मृतसमुद्र), सर्वात जास्त तपमानाचे स्थान (जेकबाबाद), सर्वात कमी तपमानाचे स्थान (व्हर्कोयान्स्क), सर्वात जास्त पावसाचे समजले जाणारे ठिकाण (चेरापुंजी), सर्वात कमी पर्जन्यमानाचा वाळवंटी प्रदेश, जास्तीत जास्त दाट लोकवस्तीचा भाग (इंडोनेशिया, चीन, भारत), अगदी विरळ लोकवस्तीचा भाग (वाळवंटे, सायबीरिया) आढळून येतात. विविध लोक, वनस्पती व खनिज पदार्थ यांनी खंड समृद्ध असून जगातील मानवाची उत्पत्ती तसेच अनेक धर्माचे मूलस्थान आशियातच मिळते. आशिया खंडाच्या उत्तरेस आर्क्टिक महासागर असून दक्षिणेस हिंदी महासागर आहे. पश्चिमेकडील अरबी समुद्र, तांबडा समुद्र व सुएझ कालवा यांनी आशिया आफ्रिकेपासून विभक्त झाला आहे. कॉकेशस पर्वत रांग, कॅस्पियन समुद्र, उरल नदी आणि उरल पर्वत ही यूरोप आणि आशिया यांमधील सीमा मानली जाते. पुष्कळदा यूरोप व आशिया मिळून एकच यूरेशिया खंड मानले जाते. भूमध्य, इजीअन, मार्मारा आणि काळा समुद्र हे नैऋत्य आशिया व यूरोप यांना विभागतात. पूर्वेकडे बेरिंग सामुद्रधुनीने आशिया व अमेरिका वेगळे झाले आहेत. आशिया खंडाच्या पूर्वेस कॅमचॅटका द्वीपकल्प, कूरील बेटे, सकालीन बेट, जपान, रिऊक्यू, कोरिया, फिलिपीन्स आणि इंडोनेशिया यांमुळे पॅसिफिकचे ओखोट्स्क, जपान, पूर्व चीन, दक्षिण चीन व इंडोनेशिया समुद्र बंदिस्त झाल्याप्रमाणे आहेत.
या खंडात भारत, श्रीलंका (सिलोन), पाकिस्तान, बांगला देश, ब्रह्मदेश, नेपाळ, भूतान, सिक्कीम, अफगाणिस्तान, इराण, इराक, कुवेत, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमीर राज्ये, कॉटार, बहरीन, ओमान, दक्षिण येमेन, येमेन, जॉर्डन, सिरिया, इझ्राएल, लेबानन, तुर्कस्तान, रशियाचा आशियांतर्गत भाग, मंगोलिया, चीन, तैवान, उत्तर व दक्षिण कोरिया, जपान, नाऊरू, फिलीपीन्स, उत्तर व दक्षिण व्हिएटनाम, लाओस, ख्मेर (कंबोडिया), थायलंड, मलेशिया, सिंगापूर, ब्रूनाइ, इंडोनेशिया व मालदीव हे देश असून, ब्रिटिश सत्तेखालील हाँगकाँग, पोर्तुगीज सत्तेखालील माकाऊ व तिमोर बेटांचा भाग आणि अरबस्तानातील काही अशासकीय प्रदेश यांचाही त्यात समावेश होतो. ईजिप्तचा सिनाई भाग आशियातच मोडतो; तसे काहींच्या मते सायप्रस बेटही आशियातच येते.
भूवर्णन
आशिया खंडाची घडण अतिशय जटिल स्वरूपाची समजली जाते. आशिया व आफ्रिका खंडे पूर्वी जोडलेली होती. तुर्कस्तान ते जपानपर्यंत गेलेल्या अनेक पर्वतरांगांच्या ठिकाणी पुराजीव व मध्यजीव कालखंडांत टेथिस हा मोठा समुद्र होता. टेथिसच्या उत्तरेस अंगाराभूमी हा प्रतिकारी खडकाचा भूभाग होता तर दक्षिणेकडे गोंडवनभूमी हाही तसाच प्रदेश होता. टेथिसच्या भूद्रोणीमध्ये गाळाचे थर साठले आणि गिरिजनक हालचालींमुळे मध्यजीव कालखंडाच्या अखेरीस व विशेषत: नूतनजीव कालखंडात त्या भागावर दाब पडून तेथे वलीपर्वतांच्या अनेक मालांचा जटिल भूभाग तयार झाला. आफ्रिका व आशिया विभागले जाऊन अंगारा व गोंडवनभूमी एकत्र जोडल्या गेल्या. अरबस्तान, दक्षिण आफ्रिका व दख्खनचे पठार ह्या भागांना मात्र धक्का लागला नाही; त्यांवर नंतरच्या काळातील थर साचले तरी मूळ गाभा कायम राहिला. तुर्कस्तानपासून पूर्वेकडे गेलेल्या पर्वतरांगांच्या दरम्यान विस्तीर्ण पठारे निर्माण झालेली आहेत. तुर्कस्तानच्या उत्तरेस पाँटस व दक्षिणेस टॉरस पर्वत असून त्यांच्यामध्ये ॲनातोलियाचे पठार आहे. पाँटस व टॉरस हे आर्मेनिया पर्वतमंडलात एकत्र येतात. तेथून पुढे उत्तरेकडून एल्बर्झ, खुरासान व दक्षिणेकडून झॅग्रॉस, मकरान पर्वतरांगा जातात. या दोन्हींच्या दरम्यान इराण-अफगाणिस्तानचे पठार आहे. अफगाणिस्तानच्या पूर्वेस जगाचे छप्पर म्हटले जाणारे पामीरचे पठार आहे. हे वस्तुत: एक पर्वतमंडलच आहे. याच्या सर्व दिशांस अजस्त्र पर्वतरांगा दूरवर पसरल्या आहेत; नैऋत्येस हिंदुकुश, त्याच्या दक्षिणेस सुलेमान, आग्नेयीस हिमालय व त्याच्या उत्तरेस काराकोरम, पूर्वेस कुनलुन व आस्तिन ता, ईशान्येस तिएनशान आणि वायव्येस ट्रान्सआलाई व हिस्सार या पर्वतरांगा आहेत. कुनलुन व हिमालय यांच्या दरम्यान तिबेटचे विस्तीर्ण पर्वतांतर्गत पठार आहे. तसेच कुनलुन व तिएनशान यांच्या दरम्यान ताक्ला माकान हे वाळवंटी पठार आहे. तिएनशानच्या ईशान्येस अल्ताई, सायान, याब्लोनाय, स्टॅनोव्हॉय, व्हर्कोयान्स्क, चेर्स्की, कोलीमा आणि अनादीर या पर्वतशाखा जवळजवळ बेरिंग समुद्रापर्यंत गेल्या आहेत. हिमालयाची रांग आग्नेयीकडे इंडोनेशियापर्यंत पसरली आहे; ईशान्य भारतातील गारो, खासी, जैंतिया वगैरे टेकड्या, तसेच उत्तर ब्रह्मदेशातील, अंदमाननिकोबारमधील व इंडोनेशियातील पर्वत हे हिमालयाचेच विस्तार होत. कुनलुनचे फाटे चीनमध्ये गेले आहेत; चीनमध्ये त्याला चिनलिंग (त्सिनलिंग) नाव आहे. आस्तिन ताच्या चीनमधील फाट्यास नानशान व मंगोलियातील फाट्यास शिंगान पर्वत म्हणतात. चीनमध्ये यूनान, सेचवान आणि मंगोलियात गोबी वाळवंट हे पठारी प्रदेश वरील पर्वतरांगांनी व्यापले आहेत.
0
Answer link
आपल्या आशिया खंडात एकूण 48 देश येतात.
हे देश भौगोलिक, सांस्कृतिक आणि आर्थिकदृष्ट्या विविध आहेत.
आशिया खंडातील काही प्रमुख देश:
- भारत
- चीन
- जपान
- इंडोनेशिया
- पाकिस्तान
या देशांव्यतिरिक्त, आशिया खंडात अनेक लहान आणि मोठे देश आहेत.