2 उत्तरे
2
answers
दूरचा विचार कसा करावा? कामाचे मॅनेजमेंट कसे करावे?
9
Answer link
दूरचा विचार करण्यासाठी सद्यस्थितीचा आढावा आणि आवाका पूर्ण समजणे गरजेचे असते. काळाची पाऊले ओळखता अली पाहिजे. तुम्ही कोणत्या क्षेत्रात काम करत आहात याचा देखील दूरचा विचार करण्यावर परिणाम होऊ शकतो.
जसे कि तुम्ही राजकारणी असाल तर तुम्हाला येत्या काही दिवसांत समाजाचा कल कोणत्या क्षणी कुठे असणार आहे हे ओळखणे गरजेचे असते.
जर तुम्ही उद्योजक असाल तर येत्या काही दिवसांत बाजारपेठ कोणत्या गोष्टींसाठी खुली होणार आहे हे ओळखणे गरजेचे असते.
जर तुम्ही एखाद्या कंपनीत कामाला असाल, तर कंपनीचा येत्या काही दिवसातील फोरकास्ट कसा असणार आहे हे ओळखणे गरजेचे असते.
तुम्हाला नेमक्या कोणत्या हेतूने दूरचा विचार करायचा आहे ?? तुम्हाला स्वतःचे विश्व निर्माण करायचे आहे(उदा. नवीन राजकीय पक्ष काढायचाय) कि फक्त आहे त्या स्थितीतच सर्वोच पदावर जायचे आहे(उदा. एखाद्या पक्षातील कार्यकर्ता ते त्या पक्षातील एक कि प्लेयर हा प्रवास) हे देखील ठरवा.
एक लक्षात ठेवा, या उत्तरातून तुम्हाला फक्त एक आयडिया येईल, मात्र सर्व परिश्रम स्वतःलाच उचलावे लागतील. डॉ APJ अब्दुल कलाम, अलबर्ट आईन्स्टाईन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शरद पवार, नरेंद्र मोदी ही काही माणसे आहेत ज्यांनी दूरचा विचार केला. यामागे कुठलाही शॉर्टकट नव्हता. या सर्वांचे कष्ट अपार होते. सर्वांच्या लायब्ररीत हजारो पुस्तके होती जी त्यांनी वाचलेली होती. दररोज फक्त ४ ते ६ तास झोप त्यांनी घेतली. असे वेळापत्रक त्यांनी आयुष्यभर पाळले. ते कुठल्याही त्रयस्थ माणसाचा "यशस्वी कसे व्हावे" अशा विषयाचा ब्लॉग वाचून मोठे झाले नाही.
तुम्हाला जर खरेच असे काही करायचे असेल तर काय करायचे आहे ते पहिले ठरवा, कारण राजकारणी व्हायचे स्वप्न पाहत असाल तर बिझनेसविषयी अभ्यास करून काहीही फायदा होणार नाही. एकदा का तुम्ही तुमचा मार्ग ठरवला कि मग त्या विषयात प्रचंड अभ्यास करा, प्रचंड पुस्तके त्या संबंधात वाचा, संबंधित क्षेत्रातच कामाचा अनुभव ठेवा. आपोआप काळाची पाऊले ओळखली जाऊन दूरचा विचार तुम्ही करायला लागाल. याला शॉर्टकट नाही.
0
Answer link
दूरचा विचार कसा करावा आणि कामाचे मॅनेजमेंट कसे करावे याबद्दल काही सूचना:
दूरचा विचार कसा करावा:
- ध्येय निश्चित करा: तुम्हाला भविष्यात काय साध्य करायचे आहे ते ठरवा. तुमचे ध्येय SMART (Specific, Measurable, Achievable, Relevant, Time-bound) असावे.
- संशोधन आणि विश्लेषण करा: तुमच्या ध्येयांपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक माहिती गोळा करा. बाजारातील कल, तंत्रज्ञान बदल आणि सामाजिक बदल यांचा अभ्यास करा.
- विविध शक्यतांचा विचार करा: फक्त एकाच मार्गावर अवलंबून न राहता अनेक योजना तयार करा. प्रत्येक योजनेचे फायदे आणि तोटे माहीत असावेत.
- जोखीम व्यवस्थापन: भविष्यातील धोके ओळखा आणि त्यांचे व्यवस्थापन कसे करायचे याची तयारी करा.
- वेळेनुसार बदल: परिस्थितीनुसार आपल्या योजनेत बदल करण्याची तयारी ठेवा.
कामाचे मॅनेजमेंट कसे करावे:
- वेळेचे नियोजन: कामांसाठी वेळ ठरवा आणि त्यानुसार काम करा. To-do list चा वापर करा.
- प्रा priorities्यक्रम ठरवा: कोणत्या कामाला जास्त महत्त्व द्यायचे आहे ते ठरवा. महत्त्वाच्या कामांना प्रथम प्राधान्य द्या.
- कामाचे विभाजन: मोठे काम लहान भागांमध्ये विभाजित करा, ज्यामुळे ते सोपे वाटेल.
- Delegation: काही कामे इतरांना सोपवा, ज्यामुळे तुमचा वेळ वाचेल आणि तुम्ही महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करू शकाल.
- व्यत्यय टाळा: काम करताना distractions टाळा, जसे की सोशल मीडिया आणि अनावश्यक calls.
- तंत्रज्ञानाचा वापर: कामासाठी आवश्यक tools आणि apps चा वापर करा, ज्यामुळे काम अधिक सोपे आणि प्रभावी होईल.
- Self-care: कामाच्या दरम्यान ब्रेक घ्या, ज्यामुळे ताण कमी होईल आणि Productivity वाढेल.
अधिक माहितीसाठी तुम्ही खालील लिंक्स बघू शकता: