घर घरगुती उपाय कीटक नियंत्रण स्वयंपाकघर

घरातले चिलटे घालवण्यासाठी काय करावे?

4 उत्तरे
4 answers

घरातले चिलटे घालवण्यासाठी काय करावे?

6
चिलटे घालवण्याचा उपाय -
1) एक भांड्यात केळ्याचे काप करून टाका नंतर त्या भांड्याला वरून प्लास्टिक कागद लावा व त्या प्लास्टिक वार सुईने दोन तीन भोकं पाडा याने सर्व चिलटे त्या भांड्यात अडकले जातील.

2) शेराचं झाड  किंवा कांडवेल (युफोर्बिया टिरुकाली म्हणजे इंडियन ट्री स्पर्ज) म्हणजे चिलटं आकर्षित करून घेणारं मॅग्नेट आहे. त्याची लहान फांदी लटकवून ठेवा स्वयंपाकघराच्या कोपर्‍यात. चिलटं बसलेली फांदी संध्याकाळी बाहेर नेऊन झटकून परत लावता येते, आठवडाभर एक फांदी टिकते.

3) अ‍ॅपल सायडर व्हीनेगर एका उंच बाटलीत अर्ध भरून त्यात थोडासा लिक्वीड सोप टाकायचा. अ‍ॅपल सायडर व्हीनेगारच्या गोड-आंबुस वासाने चिलटं तिथे आकर्षित होतात आणि आत पडतात नी मरतात. ओंगळंवाणं दिसतं...पण उपाय लागू पडतो. १-२ दिवसानी ते फेकून परत नविन भरून ठेवायचे. 

मच्छरपासून बचावासाठी लसूण - 

स्वयंपाकघरात आवर्जून आढळणारे लसूण वासाला उग्र आहे. या उग्र वासामुळे मच्छर दूर राहण्यास मदत होते. यासाठी लसणाच्या काही पाकळ्या ठेचून पाण्यात उकळा. हे पाणी घरात स्प्रे करा.

मुंग्यांसाठी व्हाईट व्हिनेगर - 

ऋतू कोणताही असो स्वयंपाकघरात मुंग्याचा वावर हमखास दिसतो. मग आता तुम्हांला मुंग्या दिसल्या की त्यावर थोडे व्हाईट व्हिनेगर स्प्रे करा. पण कार्पेट किंवा एखाद्या कापडावर व्हाईट व्हिनेगर मारण्याआधी ते छोट्याशा कापडावर मारून पहा. मगच त्याचा वापर करा.

झुरळ्यांपासून बचाव करण्यासाठी बोरीक पावडर  - 

घरातून झुरळांना हटकण्यासाठी पेस्टकंट्रोलचा पर्याय निवड्याआधी हा प्रयोग नक्की करून पहा. चमचाभर गव्हाच्या पीठामध्ये बोरीक पावडर मिसळून तयार मिश्रणाचा गोळा मळा. त्याचे लहान लहान गोळे बनवून घरातील कोपर्‍यात ठेवा. या उपायामुळे झुरळांचा वावर कमी होण्यास  मदत होते.

सायट्रस सालींमुळे कोळी दूर राहतात - 

कोळ्यांचा घरातील वावर वाढला की कोपर्‍यांमध्ये जळमट वाढतात. म्हणूनच त्यांना दूर करण्यासाठी संत्र, लिंबू, मोसंबी अशा सायट्रस फळांच्या सालींचा वापर करा. घराची सफाई झाल्यानंतर जेथे कोळ्यांचे जाळे आढळू शकते अशा ठिकाणी या सायट्रस फळांच्या साली चोळा. बुकशेल्फ, कोपरे,दारं खिडक्यांच्या आसपास या साली चोळाव्यात.

कापूरामुळे माश्या दूर राहतील -

कापूरामुळे घरातील माश्यांचा त्रास दूर  होतो. घरातील कोपर्‍यांमध्ये काही कापरांचे तुकडे टाकून ठेवा. जर घरात माश्या खूपच असतील तर कापूर जाळा. त्याच्या धुरामुळे मश्या दूर होतात.
उत्तर लिहिले · 8/8/2017
कर्म · 8025
2
चिलट” घालवण्यासाठी एक भांड्यात पिकलेल्या केळ्याचे काप करून टाका नंतर त्या भांड्याला वरून प्लास्टिक कागद लावा व त्या प्लास्टिकच्या कागदाला सुईने दोन तीन छिद्र पाडा असे केल्याने सर्व चिलट त्या भांड्यात अडकले जातील. नंतर ते फेकून द्या. चिलट” घालवण्यासाठी एका उंच बाटली पाण्याने अर्धी भरून घ्या.
*घरातले चिलटे घालवण्यासाठी काय करावे ?* पावसाळा व सध्याचे दमट वातावरण या मुळे चिलटाचे प्रमाण खूपच वाढले आहे.

अत्यंत क्षुद्र माणसाला चिलटाची उपमा देऊन दुर्लक्षित करण्याची प्रथा असली, तरी चिलट हा सहजी दुर्लक्षित होणारा प्राणी नाही. कितीही हाकललं तरी गूं-गूं करत डोळ्यापुढं पिंगा घालणाऱ्या या चिलटाचं 'उपद्रवमूल्य' सध्या भल्याभल्यांना कळून चुकलंय. रक्त वगैरे न शोषता केवळ वारंवार डोळ्यांपुढं येऊन लक्षावधी चिलटं 'अस्तित्व' दाखवत आहेत. मच्छर आगरबत्ती, विषारी औषधं, लिक्विड मशीन असल्या कोणत्याही उपायांना न जुमानणाऱ्या या कीटकापुढं सगळ्यांनी हात टेकलेत. तरीसुद्धा त्याच्या आगमनाचे मार्ग समजून घेऊन ते बंद करणं, आलेल्या चिलटांना 'ट्रॅप'मध्ये पकडणं, असे काही मार्ग उपलब्ध आहेत. चिलटं फळांकडे आकर्षित होतात. आपल्या डोळ्यांवर ती सारखी सारखी येतात, कारण अंडी घालण्यासाठी त्यांना ओलावा लागतो आणि आपले डोळे सतत ओलसर असतात. ओलावा कमी करणं हाच चिलटं कमी करण्याचा उपाय होय.

* चिलटे घालवण्याचा उपाय. *

एक भांड्यात केळ्याचे काप करून टाका नंतर त्या भांड्याला वरून प्लास्टिक कागद लावा व त्या प्लास्टिक वार सुईने दोन तीन भोकं पाडा याने सर्व चिलटे त्या भांड्यात अडकले जातील.

शेराचं झाड किंवा कांडवेल (युफोर्बिया टिरुकाली म्हणजे इंडियन ट्री स्पर्ज) म्हणजे चिलटं आकर्षित करून घेणारं मॅग्नेट आहे. त्याची लहान फांदी लटकवून ठेवा स्वयंपाकघराच्या कोपर्यापत. चिलटं बसलेली फांदी संध्याकाळी बाहेर नेऊन झटकून परत लावता येते,संध्याकाळी बाहेर नेऊन झटकून परत लावता येते, आठवडाभर एक फांदी टिकते.

अॅपल सायडर व्हीनेगर एका उंच बाटलीत अर्ध भरून त्यात थोडासा लिक्वीड सोप टाकायचा. अॅपल सायडर व्हीनेगरच्या गोड-आंबुस वासाने चिलटं तिथे आकर्षित होतात आणि आत पडतात नी मरतात. ओंगळवाणं दिसतं... पण उपाय लागू पडतो. १-२ दिवसानी ते फेकून परत नविन भरून ठेवायचे. मंडईतून भाजी घेऊन आल्यावर.

भाज्या घेऊन घरात जाण्यापूर्वी बाहेरच त्या धुऊन वेगळ्या टोपलीतून घरात घेऊन जाव्यात. भाज्या धुतलेलं पाणी घरापासून दूर फेकून द्यावं. घरात आणल्यावर पुन्हा सिंक मध्ये धुऊन भाज्या थेट फ्रिजमध्ये ठेवाव्यात.

फळं आणली असतील तर त्यातील मऊ आणि पातळ सालीची फळं खाकी कागदाच्या पिशवीत ठेवून पिशवीचं तोंड बंद करावं. यामुळं अर्धपक्व फळं पिकायलाही मदत होते. आणलेली फळं बास्केटमध्ये ठेवण्यापूर्वी आधीची जास्त पिकलेली, खराब झालेली फळं घरापासून शक्य तितक्या दूर फेकून द्यावीत. स्वयंपाकघरातली दक्षता

ज्यूसचे जार, केचप-सॉसच्या बाटल्या उघडल्यानंतर पुन्हा बंद करताना त्यांची तोंडे स्वच्छ पुसून घट्ट झाकण लावा. मांसाहारी स्वयंपाक केल्यावर धुण्यासाठी वापरलेलं पाणी, मांसाचे अवशेष घरापासून दूर फेकून द्या. खरकटे अन्न, रस काढलेल्या फळांच्या साली थोड्या वेळासाठीही घरात ठेवू नका.

सिंकचे ड्रेनेज स्वच्छ राहील याची काळजी घ्या. सिंकचं पाणी वाहून नेणारी पन्हाळ सुस्थितीत ठेवा. बाटल्या गरमपाण्यानं, 'बोटल ब्रश वापरून साफ करा. सांडलवंड झाल्यास लगेच साफसफाई करा. फरश्या पुसल्यानंतर ते पाणी लगेच बाहेर फेका. 'कॅच अँड रिलीज मेथड'

बरणी किंवा अर्ध्या कापलेल्या प्लास्टिकच्या बाटलीत फळाची साल किंवा नासलेलं, अतिपक्व फळाचा तुकडा ठेवा. त्यावर थोडा व्हिनेगर टाकून ओलसर बनवा. कागदाचा शंकू करून तो बाटलीवर उलटा ठेवा. चिलटं शंकूतून फळाकडे आकर्षित होतात. एकदा आत गेल्यावर त्यांना पुन्हा बाहेर पडता येत नाही. भरपूर चिलटं बाटलीत गेली की त्याच शंकूतून पाणी ओतलं की चिलटांना बाटलीतच जलसमाधी!

'जार ट्रॅप'

एका फळाच्या बाऊलमध्ये साल काढलेलं फळ आणि व्हिनेगर किंवा वाइन ठेवा. 'व्हाइट वाइन' आणि धणे यांचं मिश्रण अत्यंत उपयुक्त. या बाऊलला प्लास्टिकचा कागद वरून ताणून बांधा. सुरकुत्या पडू देऊ नका. या कागला सुईनं छोटी छिद्रं पाडा. त्यातून चिलटं आत जातील आणि तिथंच अडकून राहतील. त्यांना पुन्हा बाहेर पडता येऊ नये, इतकी छिद्रं लहान असायला हवीत. कंपोस्ट खड्ड्याचा पर्याय

घराजवळ जागा असल्यास खोल खड्डा खणून खरकटे अन्न, खराब फळं, फळांच्या साली त्या खड्ड्यात टाकून पालापाचोळा किंवा मातीनं झाकून टाका. एक कप अमोनिया दोन गॅलन पाण्यात मिसळून त्यावर शिंपडा. अशा रीतीनं बागेसाठी खतही तयार होईल आणि चिलटांचा उपद्रवही कमी होईल. दारं-खिडक्यांना बारीक जाळ्या लावण्याचाही पर्याय आहेच.
उत्तर लिहिले · 8/2/2022
कर्म · 121765
0
घरातील चिलटे घालवण्यासाठी काही उपाय खालीलप्रमाणे आहेत:
  • स्वच्छता राखा:
    • घरातील कचरा नियमितपणे साफ करा.
    • शिळे अन्न आणि उघडे अन्नपदार्थ ठेवणे टाळा.
    • सिंक आणि ड्रेनेज नियमितपणे स्वच्छ करा.
  • साफसफाई:
    • फर्निचर आणि इतर वस्तू नियमितपणे पुसून घ्या.
    • ओल्या कपड्याने पृष्ठभाग पुसून घ्या, जेणेकरून चिलट आकर्षित होणार नाहीत.
  • नैसर्गिक उपाय:
    • लिंबू आणि लवंग: लिंबाच्या अर्ध्या भागांमध्ये लवंग टोचा आणि ते चिलटे असलेल्या ठिकाणी ठेवा.
    • व्हिनेगर: एका वाटीत ऍपल सायडर व्हिनेगर (apple cider vinegar) ठेवा आणि त्यात काही थेंब डिश सोप टाका. चिलटे आकर्षित होऊन त्यात बुडतील.
    • कपूर: घरात कपूर जाळा, त्याच्या वासाने चिलटे दूर होतात.
  • स्प्रे:
    • कीटकनाशक स्प्रे: बाजारात मिळणारे कीटकनाशक स्प्रे वापरा, पण ते वापरताना सुरक्षितता बाळगा.
    • तेल: निलगिरी तेल (eucalyptus oil) किंवा पेपरमिंट तेल (peppermint oil) पाण्यात मिसळून स्प्रे केल्याने चिलटे कमी होतात.
  • इतर उपाय:
    • घरात डासांना प्रतिबंध करणारे जाळे (mosquito net) लावा.
    • खिडक्या आणि दरवाजांना जाळ्या लावा जेणेकरून चिलटे घरात येणार नाहीत.
हे काही उपाय आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही घरातील चिलटे कमी करू शकता.
उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 1680

Related Questions

कोणते उपाय ॲनिसीस (Anise) व त्यांना मारण्याचा रस निर्माण होतो?
घरात किडे आल्यावर काय करावे?
घरामध्ये सतत खूप लाल, काळ्या मुंग्या निघतात, काळ्या मुंग्या ठीक आहेत पण लाल मुंग्या खूप त्रास देत आहेत, हँगरच्या कपड्यांमध्ये पण घुसतात, चावतात. काय करू? काही खात्रीशीर उपाय आहे का? असेच चालू राहिले तर या मला घरातून हाकलून तरी देतील किंवा मारून टाकतील अशी भीती वाटत आहे. खडू, पावडर हे वापरून झाले आहे.
पेस्ट कंट्रोल : झुरळांसाठी औषध?
चिलटांवर उपाय काय?
गप्पी मासे पाळणे हे कोणत्या रोगांच्या नियंत्रणासाठी योग्य होईल?
मुंगळे कसे घालवावे?